200

Followers

Saturday, 3 September 2022

मंठा शहरातील बस स्थानक बनले खाजगी वाहन पार्किंगचे ठिकाण..


मंठा प्रतिनिधी: मंठा येथे रेल्वे स्टेशन नसल्याने बस स्थानकात मोठ्या प्रमाणात एसटी बसची वर्दळ असते.तसेच प्रवाशांची संख्या पण मोठ्या प्रमाणात असते.मात्र मंठा बस स्थानकात खाजगी वाहन अवैधरित्या बस स्थानकात येऊन गाडी पार्किंग करत असल्याने बस चालक तसेच प्रवासीयांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.एसटी बस येण्या जाण्याच्या दोन्ही प्रवेशद्वारासह आतील परिसरात अनेक खाजगी वाहने उभी केली जातात.यामुळे बसस्थानकात ये-जा करणाऱ्या एसटी च्या गाड्यांना अडचण निर्माण होते.काही खाजगी वाहन चालक बस स्थानकात वेगाने वाहन चालवीत असल्याने प्रवाशांनाही बस पकडताना सावध जावे लागते स्थानक परिसरात अवैध व मनमानी पद्धतीने पार्किंग केलेली खाजगी  चारचाकी व दुचाकी वाहने बस स्थानकात ये-जा करणाऱ्या एसटी गाड्या व प्रवाशांची वाट आडवत असल्याने यावेळी अपघात होण्याची फार शक्यता आहे.वाहतूक नियंत्रक वेळोवेळी खाजगी वाहन आवारात उभी करू नयेत अशा सूचना देत असतात मात्र याकडे खाजगी वाहन चालक दुर्लक्ष करून बेशिस्तपणे आपली वाहने उभे करतात.यावेळी वाहतूक शाखेने एसटीचे चालक व प्रवाशांचा होणारा त्रास लक्षात घेऊन खाजगी वाहनावर कारवाई करण्याची मागणी होत आहे...

No comments:

Post a Comment