200

Followers

Wednesday, 21 September 2022

शासनाने शेतकऱ्यांचा अंत पाहू नये -- किसनराव मोरे

मंठा तालुक्यात मागील दोन महिन्यापासून संततधार पाऊस...

मोसीन कुरेशी
मंठा प्रतिनिधी:मंठा तालुक्यात मागील दोन महिन्यापासून संततधार सुरू असल्यामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले असून शेतकरी शासनाच्या मदतीच्या प्रतीक्षेत आहेत. मंठा तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना सरसकट मदत करावी अशी मागणी जिल्हा काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष तथा पंचायत समिती सदस्य किसनराव मोरे यांनी केली आहे. शिंदे -  फडणवीस सरकारने सत्ता मिळविण्यासाठी करोडो रुपयांची उधळपट्टी केली मात्र, शासनाने संकटात असलेल्या शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडले आहे. अतिवृष्टीमुळे सोयाबीन, तूर, उडीद आणि कापूस पिके सडून गेली, सोयाबीनच्या शेंगांना कोंबे फुटली, सध्या सर्व पिके पाण्यात आहेत. त्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त झाला असून शासन शेतकऱ्यांना मदत द्यायला तयार नाही. आर्थिक विवचनेत सापडलेल्या शेतकऱ्यांना आत्महत्यापासून रोखण्यासाठी तालुक्यातील प्रत्येक शेतकऱ्यांना शासनाने प्रती हेक्टरी 25 हजार रुपये तात्काळ मदत करावी अशी मागणी किसनराव मोरे यांनी केली आहे.

No comments:

Post a Comment