200

Followers

Wednesday, 7 December 2022

सकल मराठा समाजाच्या बंदला मंठा तालुक्यात उस्फुर्त प्रतिसाद...

मोसीन कुरेशी
मंठा प्रतिनिधी:महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज व महात्मा फुले दाम्पत्य यांच्या विषयी केलेल्या अवमानकारक वक्तव्याचा निषेध म्हणून जालना जिल्हा बंद च्या धरतीवर सकल मराठा समाजाच्या वतीने मंठा तालुका बंदचे आव्हान करण्यात आले होते . या बंदला मंठा तालुक्यात उस्फुर्त प्रतिसाद मिळाला आज सकाळी छत्रपती संभाजी राजे चौक (मंठा फाटा) येथून निषेध रॅलीला सुरुवात करण्यात आली .राज्यपाल भगतसिंग कोश्यारी हटाव असे नारे देण्यात आले व छत्रपती शिवाजी महाराज चौकात रॅलीचा समारोप करण्यात आला. या निषेध रॅलीला अनेक मान्यवरांनी संबोधित केले. त्यात मराठा सेवा संघ परतूरचे तालुकाप्रमुख प्रा. संभाजी तिडके यांनी या रॅलीला संबोधित करताना सांगितले की महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज व फुले दांपत्ये यांच्या विषयी केलेल्या अवमानकारक वक्तव्याच्या निषेध म्हणून ही रॅली काढण्यात येत आहे. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी हे महाराष्ट्रात सांस्कृतिक व सामाजिक दहशतवाद पसरवत आहेत.असे त्यांनी सांगितले.त्यानंतर अशोक नाना वायाळ यांनी राज्यपाल व जे कोणी महापुरुषांचा आवमान करीत आहेत.त्यांना महाराष्ट्रात राहण्याचा अधिकार नाही असे सांगितले.त्यानंतर अण्णासाहेब खंदारे यांनी आपले मत व्यक्त करताना राज्यपालाचा खरपूस समाचार घेतला.त्यानंतर जालना शिवसेना जिल्हाप्रमुख ए.जे. पाटील बोराडे यांनी मत व्यक्त करताना सांगितले की महाराष्ट्राचे राज्यपाल यांनी या आधी बऱ्याच वेळा महापुरुषांचा आवमान केला आहे.त्यामुळे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची जोपर्यंत हकालपट्टी होत नाही तो पर्यंत जालना जिल्ह्यामध्ये आंदोलने थांबणार नाहीत असे सांगून त्यांनी सर्व समाजाचे आभार व्यक्त केले या बंदला मंठा तालुक्यातील सर्व संघटनांनी व  समाजातल्या सर्व घटकांनी आपला पाठिंबा पत्र देऊन व्यक्त केला होता.त्यामध्ये बहुजन क्रांती मोर्चा ,समस्त मुस्लिम समाज,एमआयएम पक्ष,टिपू सुलतान युवा मंच, जय भीम सेना, सारनाथ युथ ग्रुप ,नाभिक महामंडळ मंठा,व्यापारी असोसिएशन मंठा तालुका ,समता परिषद, नॅशनल काँग्रेस वफ्फ कमिटी ,भीमशक्ती संघटना जालना ,जय मल्हार संघटना मंठा ,मुस्लिम कमिटीचे लाला खानसाब व त्यांची संघटना व सर्व मुस्लिम समाज, सर्व व्यापारी, पत्रकार बंधू ,पोलीस मित्र व समाजातील सर्व समाज बांधव यांनी मंठा बंदला उस्फुर्त पाठिंबा देऊन मंठा तालुका बंद यशस्वी केला व मंठा तालुक्याचे तहसीलदार यांना राज्यपाल हटाव चे निवेदन देण्यात आले व निषेध रॅली कार्यक्रमाचे प्रास्ताविक एकनाथ काकडे यांनी केले व मंठा बंद यशस्वीतेसाठी समाजातल्या सर्व तरुण व सर्व पक्षातल्या नेते मंडळींनी सहकार्य केले.

Saturday, 5 November 2022

अ‍ॅड. वसीम जमीनदार यांची महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस महाराष्ट्र सचिव कक्ष पदी नियुक्ती...

मोसीन कुरेशी
मंठा प्रतिनिधी:परतुर तालुका वकिल संघाचे सचिव,आष्टीचे उपसरपंच अँड़ वसीम भाई जमींदार यांची महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या विधी विभागच्या प्रदेश सचिव पदी निवड करण्यात आली काँग्रेस पार्टी व संघटना मजबूत करण्यासाठी तसेच पक्षाची ध्येय धोरणे सर्व सामान्य पर्यंत पोहोचविण्यासाठी महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस  विधि कक्ष महाराष्ट्र सचिव आणि राज्यविधी कक्ष विभागाच्या नुकत्याच नियुक्त्या करण्यात आल्या आहेत या मध्ये युवक काँग्रेसचे पदाधिकारी म्हणून भविष्यात आपल्यासमोर गंभीर आव्हाने आहेत असे काँग्रेसचे अध्यक्ष  मल्लिकार्जुन खर्गे  सोनिया गांधी राहुलजी गांधी यांनी दिलेल्या
नियुक्तीपत्रामध्ये म्हटले आहे की पक्षाचा वाढ आणि विस्तार आपल्या जिल्हा विधी कक्षाच्या माध्यमातून करण्यात यावा व आपण हे काम परिपूर्ण कराल ही आम्हाला खात्री आहे असे दिलेल्या नियुक्ती पत्रात म्हटले आहे.या निवडी बदल काँग्रेस जिल्हाध्यक्ष राजे भाऊ देशमुख मा आ सुरेशकुमार जेथलिया अन्वर देशमुख संतोष दिंडे बाबासाहेब गाडगे इंद्रजित घनवट शकेर मापेगांवकर मंजुळदास सोळंके आदी एजाज जमीनदार वकील संघ परतूर सर्वांनी अभिनंदन पर शुभेच्छा दिले

Wednesday, 21 September 2022

शासनाने शेतकऱ्यांचा अंत पाहू नये -- किसनराव मोरे

मंठा तालुक्यात मागील दोन महिन्यापासून संततधार पाऊस...

मोसीन कुरेशी
मंठा प्रतिनिधी:मंठा तालुक्यात मागील दोन महिन्यापासून संततधार सुरू असल्यामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले असून शेतकरी शासनाच्या मदतीच्या प्रतीक्षेत आहेत. मंठा तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना सरसकट मदत करावी अशी मागणी जिल्हा काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष तथा पंचायत समिती सदस्य किसनराव मोरे यांनी केली आहे. शिंदे -  फडणवीस सरकारने सत्ता मिळविण्यासाठी करोडो रुपयांची उधळपट्टी केली मात्र, शासनाने संकटात असलेल्या शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडले आहे. अतिवृष्टीमुळे सोयाबीन, तूर, उडीद आणि कापूस पिके सडून गेली, सोयाबीनच्या शेंगांना कोंबे फुटली, सध्या सर्व पिके पाण्यात आहेत. त्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त झाला असून शासन शेतकऱ्यांना मदत द्यायला तयार नाही. आर्थिक विवचनेत सापडलेल्या शेतकऱ्यांना आत्महत्यापासून रोखण्यासाठी तालुक्यातील प्रत्येक शेतकऱ्यांना शासनाने प्रती हेक्टरी 25 हजार रुपये तात्काळ मदत करावी अशी मागणी किसनराव मोरे यांनी केली आहे.

Saturday, 3 September 2022

मंठा शहरात ढोल ताशांच्या गजरात गणपती बाप्पांचे आगमन

मोसीन कुरेशी
मंठा प्रतिनिधी:शहरातील मोठ्या उत्साहात घरोघरी बाप्पाचं आगमन झाले आहे. गेली दोन वर्ष कोविडचे संसर्ग निर्बंधामुळे गणेश उत्सव वर मर्यादा होते पण आता सर्व निर्बंध हटविल्यामुळे पुन्हा एकदा जल्लोषात थाटात बाप्पांचे वाजत गाजत आगमन होत आहे. बाप्पांच्या स्वागतसह पुजेसाठी सकाळ पासून दुकानात साहित्य खरेदीसाठी मुख्यऱस्त्यांवर गर्दी होती.तर या वर्षी 
हार फुले आकर्षक लाइट्सने सजावटीचे साहित्याने दुकाने सजली.तसेच शहरातील शिवसेना पुरस्कृत जय भवानी गणेश मंडळांनी मोठ्या थाटात गणपती बाप्पांची मिरवणूक काढली यात हलगी वाजणाऱ्या पथकाने सर्वच नागरिकांचे लक्ष वेधून घेतले होते ढोलकी वाजणाऱ्या पथकांनी वेगवेगळ्या प्रकारचा देखावा करून ढोलकी वाजवली.मंठा फाट्यावरून ते जिल्हा परिषद शाळा पर्यन्त मोठ्या उत्साहात मिरवणूक काढण्यात आली.गणरायाच्या भव्य मूर्ती व आगमण साेहळ्याचे क्षणाचे छायाचित्र माेबाईलमध्ये टिपण्यासाठी भाविकांनी एकच गर्दी केली हाेती.यावेळी शेकडो भाविकांनी मिरवणुकीत सहभागी होत दर्शनाचा लाभ घेतला.यावेळी बाप्पांची आरती पोलीस निरीक्षक संजय देशमुख साहेब यांच्या हस्ते करण्यात आली. याप्रसंगी शिवसेना जिल्हाप्रमुख ऐ.जे बोराडे गणेश उत्सवसमितीचे अध्यक्ष बाजीराव अप्पा बोराडे.अंकुशराव तात्या,बालासाहेब बोराडे,जमीर कुरेशी,नगरसेवक प्रदीप बोराडे,नितिन राठोड, वैजनाथ बोराडे,अरुण वाघमारे,संजय गायकवाड,अचित नाना बोराडे,संतोष वरकड,पप्पू दायमा,विकास सूर्यवंशी,उबेद भाईजी,भारत बोराडे,अजय अवचार,हरीभाऊ चव्हाण,सर्व पत्रकार मंडळी नगरपंचायतचे सर्व सन्माननीय नगरसेवकसह मोठ्या संख्येत नागरिकांची उपस्थिती होती.

मंठा शहरातील जवाहर कॉलनीत गणपती बाप्पाची पहिलीच रात्र अंधारात...

गणेश भक्तांकडून महावितरण कार्यालयत तोडफोड करण्यात आली...

मोसीन कुरेशी
मंठा प्रतिनिधी:दोन वर्ष कोरोनात गेल्यानंतर पहिल्यांदाच गणेश उत्सव निर्बंध मुक्त साजरा करण्यात येत आहे बाप्पाला शहरातील जवाहर कॉलनी येथे गणपती बाप्पाचे आगमन मोठ्या थाटात उशिरापर्यंत डीजेच्या तालावर गणेश भक्तांनी बाप्पांचे स्वागत केले परंतु बाप्पाला पहिलीच रात्र अंधारात काढावी लागली वार्ड क्रमांक सहा येथील कब्रस्तान समोरील डीपीला आग लागल्याने मोठा आवाज येऊन डीपी जळाली असल्याने ३१ ऑगस्ट पासून जवाहर कॉलनीसह काही भागातील वीज पुरवठा खंडित करण्यात आला होता.गणेश भक्तांनी व वार्ड क्रमांक सहाचे नगरसेवक शेषनारायण दवणे एन डी  यांनी वारंवार महावितरण कार्यालयत संपर्क करूनही.डीपी दुरुस्त केली नसल्याने बाप्पाला रात्र अंधारात काढावी लागल्याने गणेश भक्तांनी संताप व्यक्त करत आज 1 सप्टेंबर सायंकाळी चार वाजता महावितरण कार्यालात जाऊन तोडफोड केली.या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडिया व्हाट्सअप ग्रुप मध्ये व्हायरल होत आहे या व्हिडिओ मध्ये नगरसेवक शेषनारायण दवणे हे कार्यालयातील खुर्ची फेकून देतांना दिसत आहे.

मंठा शहरातील बस स्थानक बनले खाजगी वाहन पार्किंगचे ठिकाण..


मंठा प्रतिनिधी: मंठा येथे रेल्वे स्टेशन नसल्याने बस स्थानकात मोठ्या प्रमाणात एसटी बसची वर्दळ असते.तसेच प्रवाशांची संख्या पण मोठ्या प्रमाणात असते.मात्र मंठा बस स्थानकात खाजगी वाहन अवैधरित्या बस स्थानकात येऊन गाडी पार्किंग करत असल्याने बस चालक तसेच प्रवासीयांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.एसटी बस येण्या जाण्याच्या दोन्ही प्रवेशद्वारासह आतील परिसरात अनेक खाजगी वाहने उभी केली जातात.यामुळे बसस्थानकात ये-जा करणाऱ्या एसटी च्या गाड्यांना अडचण निर्माण होते.काही खाजगी वाहन चालक बस स्थानकात वेगाने वाहन चालवीत असल्याने प्रवाशांनाही बस पकडताना सावध जावे लागते स्थानक परिसरात अवैध व मनमानी पद्धतीने पार्किंग केलेली खाजगी  चारचाकी व दुचाकी वाहने बस स्थानकात ये-जा करणाऱ्या एसटी गाड्या व प्रवाशांची वाट आडवत असल्याने यावेळी अपघात होण्याची फार शक्यता आहे.वाहतूक नियंत्रक वेळोवेळी खाजगी वाहन आवारात उभी करू नयेत अशा सूचना देत असतात मात्र याकडे खाजगी वाहन चालक दुर्लक्ष करून बेशिस्तपणे आपली वाहने उभे करतात.यावेळी वाहतूक शाखेने एसटीचे चालक व प्रवाशांचा होणारा त्रास लक्षात घेऊन खाजगी वाहनावर कारवाई करण्याची मागणी होत आहे...

मंठा तालुक्यात दोन ठिकाणी जुगार अड्ड्यावर धाड...


मोसीन कुरेशी
मंठा प्रतिनिधी: मंठा तालुक्यात पोलिसांनी दी.2 शुक्रवार रोजी दोन ठिकाणी जुगार अड्ड्यावर धाड मारली आहे पहिली धाड
शहरातील जवाहर कॉलनीत तर दुसरी धाड मंठा तालुक्यातील टोकवाडी येथे टाकण्यात आली आहे. पहिल्या धाडीत जवाहर कॉलनी परिसरातील देशी दारू समोरील मैदानात मंठा पोलीस व परतूरच्या पथकाने छापा मारून नऊ जणांना जेरबंद केले आहे.देशीदारू दुकानासमोरील  मैदानात बाभळीच्या झाडाखाली काही लोक गोलकार बसून छन्ना मन्ना जुगार खेळवितांना मिळून आल्याने पोलीस निरीक्षक संजय देशमुख साहेब यांचे आदेशाने नऊ आरोपींना जेर बंद करून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यात दत्ता निर्वती बोराडे वय ३० राहणार बोराडे गल्ली मंठा, सुशील विष्णू बोराडे वय ३३ राहणार बोराडे गल्ली मंठा, ज्ञानेश्वर उत्तम मुळे वय ३१ राहणार तुकाराम नगर मंठा, दीपक बाबुराव दळवे वय ४८ राहणार शिवाजी चौक मंठा, शेख आसिफ शेख बशीर वय ३० राहणार अहमदपूरा मंठा, शेख शेखअली अहमद वय ३५ राहणार अहमदपूरा मंठा, लक्ष्मण लिंबाजी वय २६ राहणार जवाहर कॉलनी मंठा, श्रीराम बाबासाहेब बनकर वय ३४ राहणार ठेंगेवडगाव तालुका मंठा जिल्हा जालना, रणजीत आनंदराव गायकवाड वय ३८ राहणार जवाहर कॉलनी मंठा असे एकूण नऊ जणांना मंठा पोलीस व परतूरच्या पथकाने छन्ना मन्ना जुगार खेळताना रंगेहात पकडले त्यांच्याकडून सहा हजार तीनशे नव्वद रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून मंठा पोलिसांनी जुगारयांना अटक केली आहे यावेळी पोलीस पथकाने छापा टाकला यामध्ये मंठा पोलीस ठाण्याचे ढवळे साहेब,हगवने साहेब,काढे साहेब,आढे साहेब तसेच परतुर एस.डी.पि.ओ.पथकचे खरात साहेब पवार साहेब तडवी साहेब वाघमारे साहेब यांचा समावेश होता.तर दुसरीधाड मंठा तालुक्यातील टोकवाडी या गावी भगवानराव लक्ष्मणराव गाडेकर यांच्या घरासमोरील लिंबाचा झाडाखाली गोलकार बसून छन्ना मन्ना जुगार पैसा लावून खेळत असल्याची गोपनीय माहिती मंठा पोलिसांना मिळाली.या माहितीच्या आधारे पोलीस निरीक्षक संजय देशमुख साहेब.यांच्या आदेशाने पोलीस उपनिरीक्षक राऊत साहेब,ढवळे साहेब,प्रशांत काढे साहेब,आढे साहेब,रजाडे साहेब,जुंबडे साहेब यांनी टोकवाडी येथे जाऊन माहिती मिळालेल्या ठिकाणी शुक्रवारी रात्री नऊ वाजता धाड टाकली. तेव्हा सात जन पैसे लावून जुगार खेळतांना आढळून आले. या आरोपींना ताब्यात घेऊन त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.यात गणेश बाबासाहेब वायाळ वय ४५ राहणार टोकवाडी तालुका मंठा, रोहिदास शेषराव गाडेकर वय ३५ राहणार टोकवाडी तालुका मंठा,आबासाहेब दत्ताराव गाडेकर वय ४१ राहणार टोकवाडी तालुका मंठा,लक्ष्मण रामराव वायाळ वय ४८ राहणार टोकवाडी तालुका मंठा, रमेश सखाराम जाधव वय  ४८ राहणार टोकवाडी तालुका मंठा, सुरेश सिताराम जाधव वय ३० राहणार टोकवाडी तालुका मंठा, महादेव ज्ञानदेव गाडेकर वय २५ राहणार टोकवाडी तालुका मंठा,असे एकूण सात जणांना मंठा पोलिसांनी जुगार खेळताना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून सहा हजार रुपयेचा मुद्देमाल जप्त केला.असून पोलीस निरीक्षक संजय देशमुख साहेब यांचे आदेशाने पोलीस राठोड साहेब यांच्या तक्रारीवरून सात जणांविरुद्ध पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.पुढील तपास के एस चव्हाण साहेब करत आहे.


Friday, 26 August 2022

मंठयात बैलपोळा सण उत्साहात साजरा...

शेतकऱ्यांनी वाजत गाजत काढली आपले बैलाची मिरवणूक...

मोसीन कुरेशी
मंठा प्रतिनिधी:दोन वर्षापासून बैलपोळा सणावर कोरोनाचे सावट होते. परंतु यावर्षी मोठ्या उत्साहात सर्जा-राजाच्या मंठा शहरात वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली.परंपरागत शहरातील गाव येथून  बैलाची पूजा करण्यात आली.यावेळी विविध रंगबेरंगी झुला सजवून अनेक शेतक-यांनी बैलांच्या शिंगांना आकर्षक रंग देवून अंगावर रंगांनी सजवून छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे बैलांचा पोळा भरला होता.
पोळा पाहण्यासाठी बच्चे कंपनी,नागरिकांनी एकच गर्दी केली होती.अनेकांनी आपल्या मोबाईलमध्ये पोळ्याचे क्षण टिपले. याप्रसंगी अनेक मान्यवरांची उपस्थिती होती तसेच पोलिसांचा मोठा बंदोबस्त होता...

Wednesday, 24 August 2022

सर्व सन आनंदात शांततेत साजरा करा..पोलीस अधिक्षक डॉ.अक्षय शिंदे साहेब,

मंठा पोलीस ठाण्यात शांतता बैठक संपन...
 
मोसीन कुरेशी
मंठा प्रतिनिधी:गणेशोत्सवासह विविध सणांच्या निमित्ताने मंठा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सर्व गणेश मंडळांच्या पदाधिकाऱ्यांची शांतता कमिटी बैठक  पोलिस अधिक्षक डॉ.अक्षय शिंदेसाहेब
यांच्या अध्यक्षतेखाली मंठा येथील पोलीस ठाण्यात दी.२४ बुधवार रोजी घेण्यात आली.
गणेशोत्सवानिमित्त शासनाने लागू केलेल्या नियमांचे काटेकोरपणे पालन करावे. सर्व समाजाने एकत्र येऊन सर्व सण आनंदात व शांततेत साजरा करावे व युवकांनी सोशल मीडियावर समाजात तेढ निर्माण होईल असे पोष्ट फेसबुक,व्हाट्सअप,इंस्टाग्राम वर टाकू नये असे आवाहन शहरातील युवकांना केले.तसेच शांतता कमिटीचे सदस्य व मोहल्ला कमिटीचे सदस्य यांनी पोलिसांची मदत करावी व जिथे गैरप्रकार होत आहे. त्याची माहिती पोलीस ठाण्यात द्यावी असे पोलीस अधीक्षकांनी आपले भाषनात सांगितले. तसेच शिवसेना जिल्हाप्रमुख ए.जे भाऊ बोराडे यांनी आपले भाषणात बोलताना सांगितले की मंठा शहरात ईद,दिवाळी, शिवजयंती,डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती सर्व सण सर्व समाज एकत्र येऊन साजरा करीत आहे. तसेच शहरातील मुस्लिम समाज काही वर्षापासून  जामा मशीद वरून मिरवणुकीवर पुष्पवृष्टी करत आहे. शहरातील सर्व समाज सर्व सन एकत्र साजरा करतात असे आपले भाषणनात सांगितले तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी राजू मोरे,उपविभागीय अधिकारी जाधव यांनी मार्गदर्शन भाषणे केली यानिमित्त, उपविभागीय पोलीस अधिकारी राजू मोरे,उपविभागीय अधिकारी जाधव साहेब ,शिवसेना जिल्हाप्रमुख ए.जे भाऊ बोराडे,.पोलीस निरीक्षक संजय देशमुख, उप निरीक्षक  शिंदेसाहेब, राऊतसाहेब,शिंदे मैडम नगरपंचायत मुख्य अधिकारी रितेश बैरागी साहेब, नायबतहसीलदार दवणे साहेब,पंचयत समिती सदस्य किसानराव मोरे जे.के कुरेशी,नगरसेवक प्रदीप बोराडे, वैजनाथ बोराडे उबेद भाईजी, बास खान पठाण,
नारायण दवणे,अरुण वाघमारे,राजा खंदारे,प्रसाद बोराडे,सचिन बोराडे,कय्यूम भाई,मुसा भाई,प्रकाश अण्णा घुले,अजय अवचार, खलील पाशा अंसारी,अप्पा बोराडे,शबाब कुरेशी, इसमोद्दीन पटेल गणेश शहाणे,अंसाबाई राठोड,जयश्री बाई,अली कुरेशी,अंसार कुरेशी,सादेख भाई,इरफ़ान अली,कबीर तांबोली,तलाठी युनुस भाई,सह शहरातील सर्वजनिक गणेश उत्सव मंडळाचे सदस्य, प्रतिष्ठित नागरिक व मोठ्या संख्येत नागरिकांची उपस्थिती होती यावेळी सूत्रसंचालन प्रशांत काळे,मुस्तफा पठान यांनी केले.तर आभार प्रकट उपविभागीय अधिकारी राजू मोरे साहेब यांनी मांनले




Tuesday, 16 August 2022

७५ स्वातंत्र्य दिनानिमित्त मंठा शहरात भव्य तिरंगा मोटारसायकल रॅली..

( मुस्लिम हेल्प ऍक्टिव्हिस्ट फोरमने केले यारॅलीचे आयोजन )

मोसीन कुरेशी
मंठा प्रतिनिधी,शहरातील सामाजिक संघटना मुस्लिम मुस्लिम हेल्प ऍक्टिसिस्ट फोरम च्या वतीने अमृत महोत्सव निमित्त  देशप्रेम वाढवण्याच्या हेतूने तसेच स्वतंत्रवीर शाहिदांच्या स्मरणार्थ शहरात भव्य तिरंगा मोटारसायकल रैली चे आयोजन करण्यात आले होते. यारैली ची सुरुवात विश्रांतीगृह पासून सुरू करण्यात आली होती ही तिरंगा मोटारसायकल रैली मंठा फाटा- बस स्टॉप, टिपू सुलतान कॉर्नर- डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा पासून छत्रपती शिवाजी महाराज चौक पर्यंत काढण्यात आली होती. 
याप्रसंगी छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये पोलीस निरिक्षक संजयजी देशमुख यांनी  स्वतंत्र दिनानिमित्ताने सर्व नागरिकांना  शुभेच्या दिल्या तसेच शेवट यारैलीचे समारोप राष्ट्रगीताने करण्यात आले.तिरंगा रॅली यशस्वी करण्यासाठी मुस्लिम हेल्प ऍक्टिव्हिस्ट फोरमचे सदस्य इब्राहीम तांबोली, जावेद अंसारी, इस्माईल राज,  साजिद पिंजारी, सोफियान बागवान, जावेद पठाण,मोसीन शेख, कलीम शेख, खालेद पठान, इदरीस कुरेशी, सय्यदरफीक,बदरुद्दीन अत्तार, इरफान पठान, अज्जू राज, सय्यद अज़मत, नवीद सय्यद, जब्बार शेख, मतीन शेख, असलम बागवान यांनी  परिश्रम घेतले. व रॅलीला यशस्वी केले.शेवटी रॅलीत सहभाग झालेले सर्व नागरिकांचे  इस्माइल राज यांनी आभार मानले .या तिरंगा महा मोटरसायकल रॅलीमध्ये मुस्लिम तरुण मोठ्या संख्यने उपस्थित होते.

Sunday, 14 August 2022

'हर घर तिरंगा' जनजागृती मंठा नगरपंचायत वतीने तिरंगा रॅली...

मोसीन कुरेशी
मंठा प्रतिनिधी: स्वतंत्र्याचा अमृत महोत्सव निमित्त घरोघरी तिरंगा हे अभियान राबविण्यात येत असून या अभियाना मार्फत 14 ऑगस्ट रोजी मंठा शहरात नगरपंचायत च्या वतीने मंठा शासकीय विश्रामगृह ते छत्रपती शिवाजी महाराज चौक पर्यंत तिरंगा रॅली काढण्यात आली.या रॅलीत अग्निशमन दल, स्वच्छता कर्मचारी,अंगणवाडी सेविका,महिला तसेच जिल्हा परिषद उर्दू-मराठी शाळांचे विद्यार्थ्यांनी पुढाकार घेतला,यामध्ये भारत माता की जय,जय जवान जय किसान, वंदे मातरम, आदी देशभक्तीची घोषणा देत शासकीय विश्रामगृह ते मुख्य मार्ग वरून मार्केट यार्ड,बस स्टॅन्ड, टिपू सुलतान कॉर्नर, आंबेडकर पुतळा पर्यंत तर  रॅली ची समारोप छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे करण्यात आले. याप्रसंगी डॉ. बाबासाहेब व छत्रपती शिवाजी महाराज यांचे पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आले.व डॉ.कमळकर सर,थिटे सर व शिवसेना जिल्हाप्रमुख ए.जे बोराडे यांनी स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव निमित्त आपली मनोगत व्यक्त केले. यावेळी रॅलीत शिवसेना जिल्हाप्रमुख ए.जे बोराडे,नगरध्यक्ष बालासाहेब, बोराडे,पोलीस निरीक्षक संजय देशमुख साहेब,जमीर कुरेशी, नगरसेवक अचित नाना बोराडे, विकास सूर्यवंशी, दीपक बोराडे, उबेद भाईजी, राजा खंदारे,अरुण वाघमारे, शबाब भाई कुरेशी, इलियास कुरेशी संजय गायकवाड, हरिभाऊ चव्हाण, पत्रकार मोहसीन कुरेशी,संतोष दायमा,पप्पू दायमा सह मोठ्या संख्येत नागरिकांची उपस्थिती होती.

Friday, 10 June 2022

नुपुर शर्मा आणि नवीन कुमार जिंदल विरोधात मंठा शहरातील मुस्लिम समाज आक्रमक...

नुपुर शर्मा यांनी पैगंबर मोहम्मद यांच्यावरील वादग्रस्त टिप्पणी केली होती...

मुस्लिम समाजाने दुकाने बंद ठेवून निषेध व्यक्त केला.

मोसीन कुरेशी
मंठा प्रतिनिधी:भाजपची माजी प्रवक्ता नुपूर शर्माच्या पैगंबर मोहम्मद यांच्यावरील वादग्रस्त विधानानंतर देशासह विदेशातूनही जोरदार विरोध होताना दिसत आहे. पैगंबर मोहम्मद यांच्यावरील वक्तव्यामुळे मुस्लिम समाजामध्ये नाराजी पसरली आहे.भाजपच्या निलंबित प्रवक्त्या नुपूर शर्माने
एका टीव्ही डिबेटमध्ये पैगंबर मोहम्मद यांच्यावर वादग्रस्त टिप्पणी केली होती.नुपूर शर्मा यांच्या वक्तव्याचा  देश-विदेशातून मुस्लिम समाजाच्या वतीने निषेध व्यक्त करण्यात येत आहे.दरम्यान मंठा येथे १० जून रोजी शहरातील जमा मशीद मध्ये जुमाची नमाज पठन करुण जामा मशिद बाहेर मोठ्या संख्येने मुस्लिम बांधव जमा झाले. यावेळी त्यांनी पोस्टर दाखवत छत्रपती शिवाजी महाराज चौक पर्यंत शांततेत मोर्चा काढण्यात आला.यावळी निदर्शकांनी नुपूर शर्मा आणि नवीन जिंदाल यांच्यावर कारवाही व अटकेची  तहसीलदार वाघमारे साहेब व पोलीस निरीक्षक देशमुख साहेब यांना निवेदन देऊन मागणी करण्यात आली.यासोबतच लोकांनी जोरदार घोषणाबाजीही केली.तसेच मुस्लिम समाजाच्या वतीने सकाळपासून दुकाने बंद ठेवून निषेध व्यक्त केला. याप्रसंगी औरंगाबाद येथील मौलाना महेफुजुर्ररहेमान फारूखी रहेमानी ( मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड सदस्य )यांनी लोकांना मार्गदर्शन केले. यावेळी निवेदनावर हाजी मोईनोद्यीन खान साहेब,हाजी कय्यूम कुरेशी,नगरसेवक पठाण बाँज खान,हाजी मुसा कुरेशी,ताहेर बागवान हाजी ईरफान अली,पठाण सिराजखान, मुस्तफा पठाण,शेख एजास,अन्सारी शकील पाशा, मुस्ताक अन्सारी, उपनगराध्यक्ष जमीर कुरेशी, इलियास कुरेशी, शेख साजिद, मोईन कुरेशी, नगरसेवक उबेद बागवान, इसमोद्दिन पटेल, सादिक बागवान, हाजी शबाब कुरेशी, इम्रान पठाण, कबीर तांबोळी, सगीर खान पठाण यांच्या स्वाक्षर्‍या होत्या तसेच मोसीन कुरेशी, इस्माईल राज,इम्रान मनियार,
साजिद पिंजारी, जावेद पठाण सोफियान बागवान अब्दुल्ला बागवान यांच्यासह मोठ्या संख्येत मुस्लिम समाज बांधव उपस्थित होते.

Tuesday, 26 April 2022

राज ठाकरे यांच्या औरंगाबाद मध्ये होणाऱ्या सभेला परवानगी न देण्याची मागणी..


मंठा प्रतिनिधी: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची एक मे रोजी होणाऱ्या सभेला पोलिस प्रशासन व राज्य सरकारने परवानगी न देण्याची मागणी मंठा तालुक्यातील प्रतिष्ठित नागरिकांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे व गृहमंत्री यांना निवेदन पाठवून मागणी केली आहे. निवेदनात पुढे म्हटले की सध्या आपल्या महाराष्ट्र राज्यात सत्तेच्या स्वार्थासाठी मनसे पक्ष प्रमुख राज ठाकरे हे.जातीवादी चे राजकारण करीत आहे.व शांत महाराष्ट्र राज्याला पेटविण्याचे काम करीत आहे. मुंबई येथिल सभेत त्यांनी मुस्लिम समाजाच्या मस्जिद वरील भोंग्याबबात व अजान बाबत नवा वाद निर्माण करुन सभेत प्रक्षोभक भाषण करुन हिंदु मुस्लिम समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे.व समस्त मुस्लिम समाजाचे भावना दुखावल्या आहे. राज ठाकरे भर सभेत मुस्लीम समाजाच्या विरोधात चिथावणी खोर भाषण खुले आम करीत आहे. व पवित्र अजानच्या विरोधात मस्जिदीसमोर भोंगे लावुन दुप्पट आवाजात हनुमान चालीसा पठण करण्याची धमकी देत आहे.त्यामुळे हिंदु मुस्लीम समाजामध्ये जातीय तेढ निर्माण करुन महाराष्ट्रात हिंदु-मुस्लीम समाजामध्ये जातीय दंगल लावण्याचे काम करीत आहे.तरीही महाराष्ट सरकार कडुन व महाराष्ट्र पोलीस कडुन राज ठाकरे वर कुठल्याही प्रकारची कार्यवाही होत नाही.असे का? तर 1 में रोजी औरंगाबाद मध्ये होणाऱ्या राज ठाकरे यांच्या सभेला पोलिस प्रशासन व राज्य सरकारने परवानगी न द्यावी नसता मराठवाडा व महाराष्ट्र राज्यात कायदा सुव्यवस्थेला धोका निर्माण होईल, निवेदनावर सय्यद रफिक, मोसीन कुरेशी,प्रदीप मोरे,एजाज भाई, लखन कांबळे, लायक कुरेशी,बंडू बोराडे, मुस्ताक कुरेशी,ताहेर बागवान,भगवान शिंदे,यांचे स्वाक्षऱ्या होते.

Thursday, 7 April 2022

पवित्र रमजान महिन्यात विजेचा लपंडाव थांबविण्याची मागणी....


हजरत टिपू सुलतान युवा मंचतर्फे महावितरण कार्यालय येथे निवेदन देण्यात आले...


मोसीन कुरेशी
मंठा प्रतिनिधी: मुस्लिम समाजाचा पवित्र रमजान महिना 3 एप्रिल रविवार पासून सुरू झाला असून सध्या कडक उन्हाळा असल्यामुळे घराच्या बाहेर पळणे म्हणजे जीवाला धोका करून घेणे आहे.उन्हाळा असल्यामुळे देखील सतत उकाडा होत आहे. आणि अशा परिस्थितीत महावितरण कार्यालय मार्फत नियमित व सुरळीत विद्युत पुरवठा एवजी रमजान महिना लागल्यापासून मागील चार ते पाच दिवसांपासून सतत विद्युत पुरवठा तासनतास खंडित होत. असल्यामुळे
हजरत टिपू सुलतान युवा मंचच्या वतीने महावितरण कार्यालय येथे कनिष्ठ अभियंता अनिल जंगम साहेब यांना निवेदन देण्यात आले. निवेदनात म्हटले की रमजान महिन्यात मुस्लिम बांधव रोजा उपवास ठेवून घरीच विश्रांति करतात परंतु सतत विजेचा लपंडाव होत असल्याने  उपवास रोजा करणाऱ्या मुस्लिम समाजाच्या बंधू-भगिनींना अनेक अडचणींस समोरे जावे लागत आहे जे नागरिक वयोवृद्ध आहे. त्यांना सतत पंखा किंवा कुलर चालू केल्या शिवाय जमत नाही परंतु सतत विद्युत पुरवठा खंडित होत असल्यामुळे ते शक्य होत नाही. तरी रमजान महिना व उन्हाळ्याची तीव्रता लक्षात घेऊन विजेचा लपंडाव थांबविण्याची मागणी करण्यात आली आहे. नसता टिपू सुलतान युवा मंच तर्फे महावितरण कार्यालयासमोर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा मोसीन कुरेशी यांनी दिला आहे. याप्रसंगी निवेदनावर टिपू सुलतान युवा मंच तालुकाध्यक्ष मोसीन कुरेशी,नगरसेवक उबेद बागवान,इस्माईल राज,इम्रान मनियार,अब्दुल्ला बागवान,इद्रीस कुरेशी,इम्रान तांबोली,सिराज कुरेशी,जाविद पिंजरी,साजिद पिंजरी,जाविद डी.के शारुख अतार,वसीम शेख,मोइस तांबोली,जाकेर कुरेशी,इनुस कुरेशी यांचे स्वाक्षऱ्या होते.

Friday, 4 February 2022

खासदार असदुद्दीन ओवैसी यांच्यावरील हल्ल्यांचा मंठयात निषेध....

मंठा प्रतिनिधी:एआयएमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांच्या ताफ्यावर दी.3 फेब्रुवारी गुरुवार रोजी  दिल्ली-लखनऊ एक्स्प्रेस वरील छिजारसी टोल प्लाझा येथे दोन जणांनी अचानक गोळीबार केला.सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र या घटनेची बातमी कळतच सर्वत्र ए.आय.एमआयएम पदाधिकाऱ्यांकडून निषेध करण्यात येत आहे.तर मंठा तालुक्यात ए.आय.एमआयएम च्या वतीने मंठा तहसील मार्फत गृहमंत्री यांना निवेदन

पाठविण्यात आले निवेदनात म्हटले की गोळीबार करणाऱ्यासह त्यांच्या मागे जे टोली आहे. त्यांची चौकशी करून लवकरात लवकर त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी तसेच बॅरिस्टर असदुद्दिन ओवैसी यांना झेड प्लस सुरक्षा मिळाल्याने कार्यकर्त्यांनी समाधान व्यक्त केली आहे. या प्रसंगी निवेदनावर जिल्हा उपध्यक्ष अल्ताफ भाई तालुकाध्यक्ष एजाजभाई, शहरध्यक्ष ताहेर बागवान,तालुका उपाध्यक्ष मोसीन कुरेशी ,शेख रफीक मुल्ला,कदीर भाई शाह,वाहब कुरेशी,जुनेद पठान,शेख खाजा,मोइस लाला, शेख इस्माईल,जब्बार कुरेशी,जाकेर कुरेशी,कासीम कुरेशी,शारुख कुरेशी,शेख सलमान,इस्राईल हफीज साहब,शेख अर्शद शेख शाकेर,मुस्तकीम कुरेशी यांची स्वाक्षऱ्या आहे..