200
Followers
Sunday, 13 June 2021
केंद्रीय मंत्री रावसाहेब पाटील दानवे यांनी आपला ताफा थांबवुन केली. अपघात ग्रस्तची मदद.
बदनापुर प्रतिनिधी:केंद्रीय मंत्री रावसाहेब पाटील दानवे व आमदार नारायण कुचे बदनापूर तालुक्यातील कोरोना मुळे मयत झालेल्या व्यक्तींच्या परिवारास सांत्वन भेटीसाठी 11 जून शुक्रवार रोजी नानेगाव, मांजरगाव दुधनवाडी, रोशनगाव, येथे जाऊन प्रत्यक्ष भेटीगाठी विचारपूस कार्यक्रम करून बदनापूर कडे परत येत असताना रोशनगावच्या नदीजवळ पुलावरती हासनाबाद कडून अंबड कडे जाणाऱ्या समाधान मोहिते आणि त्यांची पत्नी यांचा मोटरसायक घसरून अपघात झाला त्यामध्ये त्यांना गंभीर दुखापत देखील झाली तेवढ्यात केंद्रीय मंत्री रावसाहेब पाटील दानवे यांचा ताफा घटनास्थळापासून जात असल्याने लक्षात येताक्षणी केंद्रीय मंत्री रावसाहेब पाटील दानवे आमदार नारायण कुचे आपल्या गाड्यातून पटापट उतरून पडलेल्या समाधान मोहिते आणि त्यांच्या पत्नीला सावरून दुखापतीची सहानिशा करून जवळ उभा राहून त्यांना मोठ्या प्रमाणात धीर दिला आणि तात्काळ आपली सिक्युरिटी पोलीस व्हॅन रिकामी करून समाधान आणि त्याच्या पत्नीला जालना कडे उपचारासाठी पाठवले तसेच समाधान मोहिते च्या नातेवाईकांचा फोन नंबर उपलब्ध करून थेट समाधान च्या वडिलांना केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी संपर्क करून अपघाताची माहिती दिली या मदत कार्यामध्ये केंद्रीय मंत्री रावसाहेब पाटील दानवे,आमदार नारायण कुचे यांचे मोठे योगदान राहिले घटनास्थळी बद्री पठाडे, पदमाकर जराड, गणेश कोल्हे तालुका अध्यक्ष भाजपा युवा मोर्चा, भगवान म्हात्रे, विलास जराड, भास्कर घनघाव अरुण पठाडे दत्तू लहाने आदींसह ताफियात असलेल्या कार्यकर्त्यांची येणाऱ्या-जाणाऱ्या लोकांची मोठी गर्दी होती.
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment