200

Followers

Tuesday, 8 June 2021

संजय गांधी निराधार योजनेतील लाभार्थ्यांचे तत्काळ फायली मंजूर करण्याची युवक काँग्रेसची मागणी..


हाफीज हारुन पठाण
बदनापुर प्रतिनिधी:बदनापूर येथे युवक काँग्रेस च्या वतीने तहसिल कार्यालया मार्फत शहरातील व तालुक्यातील प्रलंबित असलेले निराधारांच्या सर्व फाईल शासनाच्या नियमा प्रमाणे तात्काळ मंजुर करुन निराधारांच्या खात्या वर रक्कम टाकाणे बाबत निवेदन देण्यात आले.या वेळी शहराध्यक्ष मोबिन खान,नानाभाऊ पटोले विचार मंच अल्पसंख्याक जिल्हाध्यक्ष जावेद भाई बागवान,तालुका उपाध्यक्ष शेख युनुस भैया,अल्पसंख्याक तालुका अध्यक्ष अस्लम शेख,विधानसभा अध्यक्ष दिपक कायंदे,एन.एस.यु.आई चे शफिक पठाण,देवगाव चे सरपंच विनोद मगरे,शेख समिर बिल्डर, विलास खैरे,पप्पू कुलकर्णी,अमित शेख,अलिम खान,नईम शेख,सतिश जाधव आदी युवक काँग्रेस पदाधिकारी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment