Wednesday, 19 May 2021

देवगाव फाटा पोलिस चौकीच्या कर्मचाऱ्यांची मनमानी (प्रत्येक वाहनांकडून दोनशे रुपयाची वसुली)......

मोसीन कुरेशी
मंठा /प्रतिनिधी  : जालना जिंतूर रोड वरील देवगाव फाटा पोलीस चौकीच्या कर्मचाऱ्यांनी दुचाकी व चारचाकी वाहन चालकाकडून दोनशे रुपयांची लूट चालवली आहे. पैसे घेऊन पावती न देता वाहने सोडली जात आहेत. चारठाणा  ठाण्यातील  पोलीस बंदोबस्त असलेले पोलीस कर्मचारी शिराळे सह अन्य पोलिस कर्मचारी वाहनधारकांना विनाकारण त्रास देत असून वाहनधारकांसोबत  उद्धटपणाची भाषा केली. जात आहे. या पोलीस चौकीतील सर्वच पोलीस कर्मचाऱ्यांच्या बदल्या करून कर्तव्यदक्ष पोलीस कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्याची मागणी होत आहे. देवगाव फाटा पोलीस चौकी वसुलीचा अड्डा बनला असून परभणी पोलिस अधीक्षकांनी लक्ष घालण्याची मागणी केली जात आहे.

No comments:

Post a Comment