200

Followers

Thursday, 28 November 2019

मंठा येथील माळकिनीत आजारांचे थैमान आरोग्य विभागाचे दुर्लक्ष....

मोसीन कुरेशी
मंठा प्रतिनिधी:मंठा येथे माळकिनी गावत डेंग्यू, मलेरिया, टायफाईड,स्वाईन फ्ल्यू यारख्या साथीच्या रोगांचे थैमान सुरू आहे मात्र कुठेच उपाय योजना नाहीत आरोग्य विभाग झोपा काढतो आहे धुर फवारणीकडे आरोग्य विभागाचे दुर्लक्ष.करत आहे.
माळकिनी गावामध्ये मागील काही दिवसांपासून सर्दी, खोकला,ताप, डोकेदुखी आदी साथीच्या आजारांनी थैमान घातले आहे त्यामुळे बाळ,वृद्धांसह ग्रामस्थ हैराण झाले आहेत. अँड.ज्ञानेशवर जाधव यांनी मराठवाडा न्यूज शी'बोलतांना सांगितले की व्हायरल इन्फेक्शन आणि डासांच्या प्रार्दुभावामुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात आले आहे. याकडे आरोग्य विभागाने गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे मात्र कोणतीही प्रतिबंधात्मक उपाय योजना राबविली जात नसल्याचे चित्र आहे, वातावरणात बदल होत असल्याने मानवी आरोग्यावर विपरीत परीणाम होत आहे लहान मुलांसह वृद्धांना व्हायरल इन्फेक्शन होत आहे. त्यातच आरोग्य विभागाच्या हलगर्जीपणामुळे गावात डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे. त्यामुळे साथीच्या आजारांनी माळकिनीसह परीसरातील नागरिक त्रस्त झाले आहेत. मागील काही दिवसांपासून सर्दी खोकला ताप डोकेदुखी हात पाय दुखने आदी आजारांचे लक्षणे दिसून येत आहेत त्यामुळे घरा घरात साथीच्या आजारांचे रुग्ण दिसून येत आहेत मात्र याकडे जाणीवपूर्वक आरोग्य विभागाचे दुर्लक्ष होत आहे लवकरात लवकर उपाय योजना सुरू करावे अशी मागणी अँड. ज्ञानेशवर जाधवसह गावातील नागरिकांनी केली.

No comments:

Post a Comment