200

Followers

Saturday, 30 November 2019

हैदराबाद येथील डॉक्टर प्रियंका रेड्डी हत्याकांड प्रकरणात नराधमांना फाशी द्या।

टीपु सुल्तान युवा मंचच्या वतीने निषेध करुन पोलीसांना निवेदन....

मोसीन कुरेशी
मंठा प्रतिनिधी:हैदराबाद येथील शादनगर येथील राहणाऱ्या 27 वर्षीय पशुवैद्य डॉक्टर प्रियंका रेड्डी यांच्यावर 27 नोहेंबर रात्री कही नराधमांने सामूहिक बलात्कार करुण त्यांचे अंगावर पेट्रोल टाकून नग्न करुण पीडिताला जीवित जळण्यात आले.सदरील घटनेच्या निषेध करुन टीपु सुल्तान युवा मंचच्या वतीने मंठा येथे पोलीस निरीक्षक विलास निकम साहेबांना निवेदन देवुन कलेक्टर मार्फ़त नराधमांना फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली.
सदरील माहिती अशी की तेलंगणेच्या रंगा रेड्डी या जिल्यातील शादनगर येथील डॉक्टर प्रियंका रेड्डी आपल्या कुटुंब सोबत राहत होत्या पीड़ित महिला हे कल्लुरु मधील पशुवैद्य होते.आपले काम आपटुन ते आपल्या घरी परत जात असताना त्यांची स्कूटी हे पंचर झाली.रात्री उशीर होत असल्याने पीड़ित महिला घाबरलेले होत्या त्यांनी 9:30 च्या सुमारास आपल्या बहिणीला फोन लावला.बहिणीने महिला डॉक्टरांना टोल प्लाझावर जाऊन कॅबने येण्याचा सल्ला दिला. या लेडी डॉक्टरने असेही म्हटले आहे की काही लोकांनी मदतीची अपेक्षा केली आहे आणि थोड्या वेळाने बहिणीने कॉल केला.यानंतर महिला डॉक्टरचा मोबाईल बंद होता. शादनगर टोल प्लाझाजवळ कुटुंबीयांनी महिला डॉक्टरांचा शोध घेतला पण ती सापडली नाही. सकाळी त्यांचा शादनगरच्या अंडरब्रिजखाली जळालेला मृतदेह आढळला.काही नाराधमांने पीड़ित सोबत सामूहिक बलात्कार करुण त्यांची हत्या केली माणुस किला काळीमा फसनारी घटना हैदराबाद येथे घडली या घटनेच्या जाहिर निषेध संपूर्ण भारत देशातून होत आहे.नराधमांना समाजात जगण्याचा अधिकारच नही हा सैतान नराधमांना फाशीची शिक्षा द्यावी ही अशी मागणी टीपु सुल्तान युवा मंचच्या वतीने पोलिसांना निवेदन द्वारे करण्यात अली आहे तसेच पोलीस व टीपु सुल्तान संघटनेच्या वतीने पीडिताला दोन मिनिटे मौन बाळगुण श्रद्धांजली वाहण्यात आली.निवेदनावर टीपु सुल्तान युवा मंचचे तालुका अध्यक्ष मोसीन कुरेशी,उपध्यक्ष शेख मोसीन,माजी ग्राम पंचायत सदस्य एजास भाई,इम्रान मनियार, मुस्तकीम कुरेशी,इनुस कुरेशी,इम्रान तांबोळी,शेख अनस,शेख सलमान,शेख वसीम,जाविद कुरेशी डी.के,अलीम कुरेशी,शीनू कुरेशी,शारुख अतार,सोहेल कुरेशी,साजिद कुरेशी,इब्राहिम कुरेशी,शेख इल्लु,इस्माईल राज,इद्रीस कुरेशी,साजिद पिंजारी,जाविद पिंजारी,जाविद डैनी,रहीम तांबोली आदींचे स्वक्षऱ्या होते.
                             
                              
      

Thursday, 28 November 2019

मंठा येथील माळकिनीत आजारांचे थैमान आरोग्य विभागाचे दुर्लक्ष....

मोसीन कुरेशी
मंठा प्रतिनिधी:मंठा येथे माळकिनी गावत डेंग्यू, मलेरिया, टायफाईड,स्वाईन फ्ल्यू यारख्या साथीच्या रोगांचे थैमान सुरू आहे मात्र कुठेच उपाय योजना नाहीत आरोग्य विभाग झोपा काढतो आहे धुर फवारणीकडे आरोग्य विभागाचे दुर्लक्ष.करत आहे.
माळकिनी गावामध्ये मागील काही दिवसांपासून सर्दी, खोकला,ताप, डोकेदुखी आदी साथीच्या आजारांनी थैमान घातले आहे त्यामुळे बाळ,वृद्धांसह ग्रामस्थ हैराण झाले आहेत. अँड.ज्ञानेशवर जाधव यांनी मराठवाडा न्यूज शी'बोलतांना सांगितले की व्हायरल इन्फेक्शन आणि डासांच्या प्रार्दुभावामुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात आले आहे. याकडे आरोग्य विभागाने गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे मात्र कोणतीही प्रतिबंधात्मक उपाय योजना राबविली जात नसल्याचे चित्र आहे, वातावरणात बदल होत असल्याने मानवी आरोग्यावर विपरीत परीणाम होत आहे लहान मुलांसह वृद्धांना व्हायरल इन्फेक्शन होत आहे. त्यातच आरोग्य विभागाच्या हलगर्जीपणामुळे गावात डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे. त्यामुळे साथीच्या आजारांनी माळकिनीसह परीसरातील नागरिक त्रस्त झाले आहेत. मागील काही दिवसांपासून सर्दी खोकला ताप डोकेदुखी हात पाय दुखने आदी आजारांचे लक्षणे दिसून येत आहेत त्यामुळे घरा घरात साथीच्या आजारांचे रुग्ण दिसून येत आहेत मात्र याकडे जाणीवपूर्वक आरोग्य विभागाचे दुर्लक्ष होत आहे लवकरात लवकर उपाय योजना सुरू करावे अशी मागणी अँड. ज्ञानेशवर जाधवसह गावातील नागरिकांनी केली.

Saturday, 23 November 2019

मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री निवडीबद्दल मंठा येथे भाजपा कार्यकर्त्यांचा जल्लोष

मोसीन कुरेशी
मंठा प्रतिनिधी: अत्यंत नाट्यमय पद्धतीने आज सकाळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री पदी अजितदादा पवार यांच्या झालेल्या निवडीबद्दल भारतीय जनता पार्टी च्या कार्यकर्त्यांनी फटाके फोडून प्रचंड घोषणाबाजी करत जल्लोषात स्वागत केलं
महाराष्ट्रात भारतीय जनता पार्टीचे सरकार यावे हि जनभावना असतानादेखील सत्तास्थापनेचा तिढा सुटता सुटत नव्हता त्यासाठी शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस अशा तीन पक्षांची सत्ता घेऊन उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होतील असे वाटत असतानाच अत्यंत अनाकलनीय नाट्यमय पद्धतीने आज सकाळी देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाची तर राष्ट्रवादीचे नेते अजित दादा पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली या निवडीचे भारतीय जनता पार्टी मंठा तालुक्याच्या वतीने प्रचंड घोषणाबाजी करत फटाके फोडून जल्लोषात स्वागत केलं सर्वप्रथम छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास तालुकाध्यक्ष गणेशराव खवणे मंठा शहराध्यक्ष कैलासराव बोराडे गफार भाई बागवान इसमुद्दीन पटेल यांनी पुष्पहार अर्पण केला फटाक्यांची प्रचंड आतिषबाजी करत कार्यकर्त्यांनी नवनिर्वाचित मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री जल्लोषात स्वागत केलं यावेळी पंजाबराव बोराडे, विठ्ठलराव काळे,प्रसाद राव गडदे, प्रसादराव बोराडे, नरसिंग राठोड, परमेश्वर शिंदे, विलास घोडके, मुस्तफा पठाण, सय्यद सलाम, समंदर पठाण, बाबुराव शहाणे, गणेश राव शहाणे, सुभाष राठोड, शेख रहीम चांद पाशा, शेषनारायण दवणे, माऊली गोडगे, अनिल राव खंदारे, नवनाथ खंदारे, मनोज देशमुख, पवन केंदळे, नारायण बागल, राजेभाऊ खराबे, सुभाषराव बागल, राजेभाऊ डेंगळे, कैलास खरावे, बाळासाहेब तोर, तानाजी शेंडगे, पांडुरंग शेंडगे, कांतराव जाधव, विकास चव्हाण, भगवान लहाने, विठ्ठल वरकड, विठ्ठल राव कदम, हरीभाऊ जाधव, राधाकिसन बोराडे, वैजनाथ बोराडे, सचिन बोराडे, दीपक बोराडे, बाजीराव बोराडे, गणेश बोराडे राजेभाऊ नरवडे, खंडुजी लहाने, कदीर शहा मौलाना, प्रकाशराव गडदे, कपिल तिवारी, नायबराव गोंडगे, सिद्दिकी बागवान,बाळासाहेब गायकवाड,उद्धव पुणेकर, बंडू अहिरे, नागेश टाले, यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती

Thursday, 21 November 2019

मंठा येथे टिपू सुलतान जयंती निमित्त रक्तदान शिबिर संपन्न.....

मोसीन कुरेशी
मंठा प्रतिनिधी: आज दिनांक 20 नोव्हेंबर बुधवार रोजी उस्वाद रोड अमन कॉम्प्लेक्स येथे टिपू सुलतान यांची 269 वी जयंती निमित्त टीपू सुल्तान युवा मंच तर्फे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले.यावेळी अध्यक्ष विलास निकम साहेब पोलीस निरीक्षक होते व कार्यक्रमाचे उद्घाटन डॉक्टर प्रताप चाटसे यांनी केले तर प्रस्ताविक हफीज अब्दुल मौलाना जब्बार साहब यांनी केले. यावेळी शिबिराला उस्फूर्त प्रतिसाद मिळाला 35 रक्तदात्यांनी रक्तदान केले.
तसेस मंगलवार रोजी ग्रामीण रुग्णालय येथे रुग्णांना फराळाचे वाटप करण्यात आले होते.यावेळी कार्यक्रमाला  प्राचार्य भारत खंदारे सर, नगरध्यक्ष नितिन राठोड,शिवाजी जाधव सर, अंकुश नाना मोरे,अड़.मोरे काका,अड़.मस्के सर,डॉ.नासेर चौधरी,नगर सेवक इल्यास कुरेशी,संतोष दायमा सर, नागेश कुलकर्णी सर, भाऊसाहेब खंदारे,कयूमभाई कुरेशी,शबाबभाई कुरेशी,हाजी इरफ़ान साहब,एजाज़ भाई,मुस्तफा पठान,खलील पाशा अंसारी, कबीर भाई तांबोली,शब्बीर पठाण,सादेक बागवान यांची उपस्थिती होती कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मोसीन कुरेशी,मोसीन मिस्बा,इस्माइल राज,अनस शेख,शेख सलमान रईस,इनुस कुरेशी,इम्रान मनियार,इम्रान तांबोली, शेख सलमान,शीनू कुरेशी,साजिद पिंजारी,मुस्तकीम कुरेशी,जावीद कुरेशी डी.के,इद्रीस कुरेशी,अलीम कुरेशी,जाविद पिंजारी,शेख वसीम,शेख इल्लु,शेख,जाविद डैनी, जब्बार,अशफाक शेख,शारुख अतार,शेख जुनेद यांनी परिश्रम घेतले सूत्रसंचालन अशीर बाबा,इस्माईल राज यांनी केले आभार टीपु सुल्तान युवा मंच यांनी मानले..

Monday, 11 November 2019

पाणीपुरवठा यांत्रिकी व कार्यालयीन अधीक्षक यांच्या भ्रष्ट कारभाराच्या चौकशी मागणी....

मंठा पंचायत समिती गैरकारभार करून कोट्यावधीचा घोळ...

मोसीन कुरेशी
मंठा प्रतिनिधी : तालुक्यातील पंचायत समितीमध्ये गेल्या अनेक दिवसापासून चाललेल्या आला गोंदी कारभार व भ्रष्ट काम चालू आहे.यात नुकतॆच लाचेच्या जाळ्यात सापडलेलॆ सुधिर पैठणकर हे व कार्यालय अधीक्षक राठोड या दोघांनी संगनमताने पंचायत समितीमध्ये केलेल्या भष्ट्राचाराची व मालमत्तेची चौकशी करण्याची मागणी नागरिकांनी निवेदनाद्वारे तहसीलदार व गटविकास अधिकारी यांच्याकडे केली आहे.

तहसीलदार यांना दिलेल्या म्हटले आहे की , पैठणकर व राठोड यांनी तालुक्यातील सरपंच व ग्रामसेवक यांना हाताशी धरून पाणीपुरवठा व इतरही विभागाच्या अंतर्गत येणाऱ्या ग्रामीण भागातील खेडोपाड्यातील योजना कागदोपत्री करून बळकावल्या आहेत. यात पाईपलाईन असतील विहीर दुरुस्ती , हातपंप दुरुस्ती , तसेच विहीर अधिग्रहणाचे प्रस्ताव कागदोपत्री दाखल करून कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार केला आहे. यांनी विविध विभागांतर्गत कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार केला असून नुकतेच काही दिवसांपूर्वी पैठणकर हे लाच लाचेच्या जाळ्यात सापडले आहेत. त्यांच्यावर योग्य ती कारवाई होणे गरजेचे आहे. त्याचबरोबर कार्यालयीन अधीक्षक राठोड हेही त्यामध्ये तेवढेच सहभागी आहेत. यांचीही चौकशी वरिष्ठांनी करणे गरजेचे आहे. कार्यालयीन अधीक्षक राठोड हे नागरिकांना अरेरावीची भाषा  वापरतात तर माझे सत्ताधाऱ्यांसह वरिष्ठ अधिकारी सोबत चांगले संबंध आहेत. व मी आर्थिक हितसंबंध हे त्यांच्यासोबत जोपासत असल्याने मला तुमच्या तक्रारीची काही फरक पडत नाही.तर मी या तालुक्यातील आहे , त्यामुळे माझे कोणीही काहीही करू शकत नाही.जर कोणी काही विचारणा केल्यास त्यांना शासकीय कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल करण्याची धमकी देतात. कार्यालयीन अधिक्षक यांनी व कनिष्ठ यांत्रिक पैठणकर या दोघांनी पंचायत समितीतील शासकीय निवासस्थानी ही भाडेतत्वावर देऊन  महिन्याला पैसे गोळा करून हडप करत आहेत. याबाबत गटविकास अधिकारी यांना देखील काही माहिती नाही. त्यामुळे पाणीपुरवठा अभियंता व कार्यालयीन अधीक्षक राठोड यांच्या कामाची खाते निहाय व मालमत्तेची चौकशी करण्यात यावी. नसता लोकशाही मार्गाने उपोषणाचे हत्यार उपसावे लागेल असे नमूद केले आहे. यानिवेदनावर बाबासाहेब देशमुख , नागेश कुलकर्णी , अतुल खरात , शबाब बागवान यांच्यासह आदींच्या स्वाक्षर्या आहेत...

Monday, 4 November 2019

संकटे कितीही आली तरी जीवन संपविण्याचा विचार मनात आणू नका..... ह.भ.प निवृत्ती महाराज इंदुरीकर

मोसीन कुरेशी
मंठा /प्रतिनिधी : आपले आयुष्य हे अनमोल आहे जीवनामध्ये सुख आणि दुःख येतच असतात काल काय झाले, आज काय होईल ,उद्या काय होणार याची चिंता करत बसू नका फक्त आज वाईट वागू नका चांगलंच होईल आलेल्या संकटांना सामोरे जाण्याचे धैर्य ठेवा संकटे कितीही आली तरी जीवन संपविण्याचा विचार मनात आणू नका असा उपदेश संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना उद्देशून हभप निवृत्ती महाराज देशमुख इंदुरीकर यांनी केला. शिवसेना जिल्हाप्रमुख ए जे पाटील बोराडे यांच्या वाढदिवसानिमित्त सोमवार ता. चार रोजी मंठा येथील जिनिंग प्रेसिंगच्या भव्य मैदानावर ह भ प इंदूरीकर महाराज यांच्या कीर्तनाचे आयोजन करण्यात आले होते .सर्व श्रीमंत जीवनात सुखी नाहीत ज्याला जीवनामध्ये संतांची संगत लाभली त्याच्यासारखा भाग्यवान आणि सुखी कोणीच नाही असे सांगून ह भ प इंदूरीकर महाराज यांनी मोबाईल मुळे संवाद संपला माणसं एकलकोंडी झाली चिडचिडी झाली डोकेदुखी वाढली सांधेदुखी वाढली दृष्टी गेली झोप गेली असे दुष्परिणाम सांगितले. अंगातील ताकद जपून वापरा खिशातील पैसा जपून वापरा आणि आयुष्यातील वेळही जपून वापरा असा उपदेश त्यांनी शेवटी केला .शिवसेना जिल्हाप्रमुख ए जे  पाटील बोराडे यांच्या बद्दल बोलताना त्यांनी सांगितले की, जिल्हाप्रमुख श्री बोराडे यांनी आपली ताकत गरिबांचे प्रश्न सोडविण्यासाठी वापरली. आज ते जिल्ह्यापर्यंत गेलेत भविष्यात ते महाराष्ट्राच्या राजकारणात दिसतील असा आशीर्वाद दिला. वाढदिवसानिमित्त शेतकरी सुखी होऊ दे गाईचे रक्षण होऊ दे हिंदू धर्माचे रक्षण होऊ दे असे साकडे त्यांनी भगवंताकडे घातले. वाढदिवसानिमित्त जिल्हाप्रमुख  ए जे बोराडे यांचा यावेळी सत्कार करण्यात आला .या कार्यक्रमाला मंठा अर्बन बँकेचे संचालक अंकुशराव अवचार, माजी सभापती संतोष वरकड, भाजपा तालुकाध्यक्ष गणेश खवणे, प्रल्हादराव बोराडे ,सुरेशराव सरोदे, श्रीरंग अण्णा खरात, जि प सदस्य संजय राठोड, नगराध्यक्ष नितीन राठोड, उपतालुकाप्रमुख ज्ञानेश्वर माऊली सरकटे, पंचायत समिती सदस्य बाबा राठोड, मधुकर काकडे, नगरसेवक बालासाहेब बोराडे, नीरज सोमानी, प्रदीप बोराडे, इलियास कुरेशी, अरुण वाघमारे, युवा सेनेचे तालुकाप्रमुख डिगांबर बोराडे ,संजय नागरे, विभागप्रमुख बबनराव शेळके, भगवान वरणकर, विष्णुपंत खराबे, पांडू वैद्य, दासुपंत खरात, बेबीताई पावशे, गयाताई पवार, यांची उपस्थिती होती

Saturday, 2 November 2019

परतीच्या पाऊसाने झालेल्या नुकसानीची तत्काड भरपाई देण्याची युवक कॉंग्रेसची मागणी...

मोसीन कुरेशी
मंठा प्रतिनिधी:मंठा तालुक्यात परतीच्या पाऊसामुळे कढणीच्या आलेले शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान झालेले आहे.ज्यामध्ये कापूस,तुर,सोयाबीन,मुंग,मक्का,बाजरी यासह बाहुतांश पिकांचे नुकसान झाले आहे.
शासनाचे आदेशीत केल्याप्रमाणे पंचनामे सुरु झाले आहेत परंतु त्यामध्ये केवळ सोयाबीन व मका याच पिकाचा समावेश करण्यात येत असल्याचे समजले आहे. मंठा तालुक्यात कापुस,तुर या पिकाचा मोठ्या प्रमाणात लागवड आहे.आणि प्रामख्याने तिच पिके वगळल्यामुळे शेतकऱ्यांच्या तोंडाला पाणे पुसण्यासारखा पंचनामा व सर्व्हे होत आहे. यामध्ये मका व सोयाबीन या पिकाचा पेरा कमी आहे वास्तविक पाहता शेतात जी पिके उभी आहेत त्या सर्व पिकांचा समावेश पंचनामा करुन नुकसान भरपाई मिळणे आवश्यक आहे.असे निवेदन युवक कॉंग्रेसच्या वतीने तहसील येथे पेशकार दवने सर यांना देण्यात आले तसेच याच मागणी करीता युवक कांग्रेसचे जिल्हाध्यक्ष श्री राहुल देशमुख यांच्यावर दिनांक ३० ऑक्टोंबर 2019 रोजी भोकरदन येथे सादरील मागणी करीता करण्यात आलेल्या आंदोलना दरम्यान दाखल करण्यात आलेले खोटे गुन्हे माघे घेण्यात यावे.अशी मागणी युवक कांग्रेसच्या वतीने करण्यात आली या प्रसंगी बाळासाहेब वाजोळकर,सुरेश वाव्हळे,जफ़र पठान,रवि भांमळे,सतीष काळे,प्रदीप चोरमारे,जगन मोरे,बाळू गायकवाड़ आदि उपस्थित होते.