Friday, 27 September 2019

अफवावर विश्वास ठेवु नका.. नितिन कुमार जेथलिया

मोसीन कुरेशी
मंठा प्रतिनिधी:अलीकडे व्हाट्सअप फेसबुक   सह सोशल मीडियावर कॉंग्रेस उमेदवारांची यादी जाहीर झाली अशी बनावटी अफवा सोशल मिडियावर पसरत आहे.मात्र,अशा प्रकारची कुठलीही अधिकृत काँग्रेस उमेदवारांची यादी प्रसिद्ध झालेली नाही.काँग्रेस हा राष्ट्रीय पक्ष असून कुठल्याही राष्ट्रीय पक्षाकडून पत्रकार परिषद न घेता अशी यादी सोशल मीडियावर प्रसिद्ध करता येत नसते, हे सर्व नागरिकांना माहीत आहे.म्हणून अशी अनाधिकृत यादी तयार करत कुणी सोशल मीडियावर टाकू नये व कुणी यावर विश्वास ठेवू नये.हा जनतेत व कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा पर्यत्न विरोधक करत असल्याचे नितिन कुमार जेथलिया यांनी मराठवाडा न्यूजशी' बोलतांना सांगितले.

पुणेकर यांना बेस्ट परफाॅर्मर आॅफ दी बॅच पुरस्काराने सन्मान....

मोसीन कुरेशी
मंठा प्रतिनिधी  : शहरातील छायाचित्रकार बाळासाहेब पूणेकर यांना नुकताच नागपूर येथील बेस्ट परफाॅर्मर आॅफ दि बॅच पुरस्कार प्राप्त झाला.तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात दिवसागणीक प्रगती होत असून वेळोवेळी अपडेट राहणे निकडीचे झाले आहे. फोटोग्राफीचे क्षेत्र सुद्धा यापासून वेगळे राहीलेले नाही. याच कारणांमुळे अनेक फोटोग्राफर्स व फोटो एडीटर अॅडव्हांस फोटोशाॅपीचे तंत्रज्ञान जाणून घेण्यासाठी तत्पर होत आहे. बाळासाहेब पुणेकर यांनी नुकतेच नागपूर येथे या क्षेत्रातील अॅडव्हांस फोटोशाॅपीचे प्रशिक्षण यशस्वीरीत्या पूर्ण केल्याबद्दल फोटोशाॅपीचे सुविख्यात प्रशिक्षक गणेश कटकोजवार यांच्या के.गणेश अल्बम अकॅडमीच्यावतीने  प्रगतशिल व्यावसायिक फोटोग्राफर यांना नव्याने विकसित असलेले अद्ययावत फोटोशाॅपीचे प्रशिक्षण दिले जाते या प्रशिक्षणादरम्यान प्रशिक्षित विद्यार्थ्यातून अभ्यासक्रमातील सातत्यपूर्ण प्रशिक्षण , जिज्ञासा , कठोर परिश्रम आणि जिद्द या कसोटीवर खरे उतरून हा अभ्यासक्रम पूर्ण करणाऱ्या एका प्रशिक्षणार्थीची "बेस्ट परफाॅर्मर आॅफ द बॅच" म्हणून मतदानाव्दारे निवड केली जाते. सप्टेंबर - २०१९ या वर्षीच्या वर्गातून बाळासाहेब पुणेकर यांची निवड झाली असून यांना हा पुरस्कार प्राप्त झाला आहे. याप्रसंगी के.गणेश अल्बम अकॅडमीच्या संचालिका पूजा कटकोजवार व प्रशिक्षक गणेशसर यांच्या शूभहस्ते प्रोफेशनल डीझायनरचे प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह देवून पुणेकर यांचा गौरव करण्यात आला.या यशाबद्दल त्यांचे सर्वस्तरातुन अभिनंदन केले जात आहे. आपल्या या यशाचे श्रेय  पुणेकर यांनी आपले आई-वडील व प्रशिक्षकांना दिले आहे....

Thursday, 26 September 2019

व्यापारी महासंघ आयोजित बिझनेस सेमिनारला उत्स्फूर्त प्रतिसाद.

मोसीन कुरेशी
मंठा ता.प्र:- व्यापारी महासंघ व भारतीय जैन संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित उद्योजक व व्यावसायिकांसाठी बिझनेस डेव्हलपमेंट सेमिनार मॅनेजमेंट गुरु राकेश जैन यांचे व्याख्यान येथील वैशाली मंगल कार्यालयात आयोजित करण्यात आले होते. ता.(26)गुरुवार रोजी आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमास व्यापारी महासंघाचे जिल्हा उपाध्यक्ष भारतराव बोराडे, मंठा ता. व्यापारी महासंघाचे अध्यक्ष बालासाहेब बोराडे, राजेश जैन,हस्तीमलजी बब, अशोकजी संचेती,सतिशराव निर्वंळ,कैलाशराव बोराडे, संजय छल्लाणी, प्रा.भारत खंदारे,दत्तराव निर्वळ, संतोष शहाणे, मोहन अग्रवाल, राधाकिशन बोराडे, शिवाजीराव सुरवसे, राधेश्याम बिर्याणी, मनोज राठी, अमोल काला, शिवाजी आकमार, डॉ. सदाशिव कमळकर,विजय सराफ, दीपक बोराडे, विजय बोराडे, यांच्यासह शहरातील व्यापारी प्रतिष्ठित नागरिक तसेच महाविद्यालयीन विद्यार्थी, विद्यार्थिनींची उपस्थिती होती. या प्रसंगी मॅनेजमेंट गुरु राकेश जैन यांनी आपल्या व्याख्यानात आजच्या काळातील व्यापारातील आव्हाने त्यावर काढावयाचा मार्ग. तसेच आधुनिक युगामध्ये तंत्रज्ञानाचा व्यापारामध्ये होत असलेला वापर या बाबत जनजागृती, व्यवसायात टिकायचे असेल तर येणाऱ्या काळानुसार बदलणे किती गरजेचे आहे हे उदाहरण देऊन स्पष्ट केले. आज स्मार्टफोनच्या युगामध्ये मोबाईल ॲप्स तयार करून अनेक कंपन्या लाखोंचा नफा कमी होत आहे. सोबतच ग्राहकांना आकर्षित करून सर्व सुख सुविधा देण्याचे काम करत आहेत. ऑनलाइनच्या या व्यवहारामुळे ट्रॅडिशनल (परंपरागत) मार्केटवर परिणाम होत असून मंदी आली आहे. वास्तविक व्यापारामध्ये आजही मंदी नसून ऑनलाइन मार्केट मुळे या समस्यांना व्यापाऱ्यांना समोर जावे लागत आहे. त्यासाठी व्यापाऱ्यांनी बदलत्या काळानुसार आपल्या व्यवसाय बदल केले पाहिजेत. सेल वाढण्यापेक्षा आपली व्यवसायाची व्हॅल्यू कशी वाढेल हे पाहणे आजच्या दृष्टीने गरजेचे आहे. यासाठी नवयुवकविद्यार्थ्यांना व व्यापाऱ्यांना टेक्निकल ज्ञान घेणे गरजेचे असल्याचे शेवटी नमूद केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. दुबाले सर यांनी केले तर सूत्रसंचालन डॉ पांडुरंग नवल यांनी केले.

ईडी'च्या करवाईच्या निषेधार्थ आज राष्ट्रवादी कॉंग्रेस तर्फे मंठा बंद...

मोसीन कुरेशी,
मंठा प्रतिनिधी:राष्ट्रवादी कॉंग्रेसचे राष्ट्रिय अध्यक्ष शरद पवार यांच्यासह अजित पवार व 70 लोकांवर ईडीने केलेली कारवाहीच्या निषेधार्थ राज्यभर राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांनी रस्त्यावर वर येवून निदर्शने करत आहेत आज  मंठा येथे राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून मंठा बंद करण्यात अला यावेळी बंदला सर्व व्यापाऱ्यानी आपले दुकाने बंद ठेवून मोठा प्रतिसाद दिला शहरातील दुकाने,पान टपऱ्या ,कपडेचे स्टॉल सर्व दुकाने बंद ठेवण्यात आले.राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांनी सकाळी 8 वाजता मंठा फाटा,मार्किट यार्ड,बस स्टैंड,टीपू सुल्तान चौक,आंबेडकर पुतळा ते शिवाजी चौक या ठिकाणी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून रैली काडून जोरदार निदर्शने केली मोदी अमित शाह आणि बीजेपी सरकारवर जोरदार घोषणाबाजी केली.या प्रसंगी पंकजनाना बोराड़े,भाऊसाहेब गोरे,गोपाळराव बोराड़े,राजेश राठोड,उपनगरध्यक्ष सिराज खान पठान,कॉंग्रेस तालुकाध्यक्ष निळखंड वायाळ,शहरध्यक्ष शबाब भाई कुरेशी,कय्यूम भाई कुरेशी,नगरसेवक मोईन कुरेशी,मूसा भाई कुरेशी,अचित् नाना बोराड़े,प्रकाश घुले बाळासाहेब वाजोड़कर,सुरेश वावडे,आदिसह असंख्य कार्यकर्ते सहभागी होते.

तहसीलदारांच्या लेखी आश्वासनानंतर पेवा ते पेवा तांडा रस्त्याच्या कामासाठी सुरू केलेले उपोषण अखेर मागे..........

मोसीन कुरेशी
मंठा /प्रतिनिधी : मौजे पेवा ते तांडा वस्ती रस्त्यासाठी ग्रामस्थांनी मंगळवार ता. 24 पासून तहसील कार्यालयासमोर सुरू केलेले उपोषण तहसीलदार सुमन मोरे यांचे लेखी आश्वासनानंतर मागे घेण्यात आले. मंठा तालुक्यातील मौजे पेवा ते तांडा रस्ता काही शेतकऱ्यांनी अतिक्रमण केल्यामुळे अरुंद झाला होता तांड्यातील ग्रामस्थांनी हा रस्ता स्वखर्चाने पूर्ण करण्याचा निर्णय घेतला मात्र पांदण रस्त्याच्या लगत असणाऱ्या काही शेतकऱ्यांनी रस्त्याच्या दोन्ही बाजूने अतिक्रमण करून रस्ता करण्यास विरोध केला त्यामुळे तांड्यातील नागरिकांना महिला व विद्यार्थ्यांना रस्त्याची मोठी अडचण निर्माण झाली होती हा रस्ता मोकळा करून द्यावा या मागणीसाठी शेकडो महिला व ग्रामस्थांनी मंगळवार ता 24 पासून उपोषण सुरू केले होते. तहसीलदार सुमन मोरे, पोलीस निरीक्षक विलास निकम ,वंचित बहुजन आघाडीचे नेते संजय चव्हाण, मानव मुक्ती मिशनचे पदाधिकारी यांच्या मध्यस्थीने तहसीलदार सुमन मोरे यांनी लेखी आश्वासन दिल्यानंतर उपोषण सोडण्यात आले. उपोषणकर्त्यांना मध्ये दामोदर वाणी ,सुरेश गव्हाणे, ब्रह्मानंद पवार, रमेश राठोड ,मदन राठोड, पंडित चव्हाण, सखाराम मोरे,रफीक भाई, रामेश्वर पवार ,मांगीलाल राठोड ,भुजंग राठोड, रामेश्वर राठोड, साहेब राठोड, संतोष राठोड ,भाऊ चव्हाण, गजानन जाधव ,रामप्रसाद नरवाडे, दगडू नरवाडे ,अशोक चव्हाण, रावसाहेब नरवाडे, अंकुश राठोड ,सुभाष नरवाडे, विलास राठोड यांच्यासह ग्रामस्थ आणि महिलांचा मोठ्या प्रमाणावर समावेश होता

गावे आणि तांड्यांना जोडणाऱ्या रस्त्यांसाठी संघर्ष करणार ......संजय चव्हाण                                        परतूर मंठा विधानसभा मतदारसंघातील अनेक गावे आणि तांड्याला जाण्यासाठी रस्ता नसल्यामुळे रस्त्यांचा बिकट प्रश्न निर्माण झालेला आहे गावे आणि तांड्यातील ग्रामस्थ तसेच विद्यार्थ्यांना रस्ता नसल्यामुळे मोठा त्रास सहन करावा लागत आहे .भविष्यामध्ये मंठा तालुका तसेच नेर शेवली भागातील गाव व तांडे आणि परतूर तालुक्यातील रस्त्यापासून काही वंचित राहिलेल्या गावातील रस्त्यासाठी संघर्ष करणार असे वंचित बहुजन आघाडीचे परतूर विधानसभा मतदार संघाचे नेते संजय चव्हाण यांनी सांगितले

Tuesday, 17 September 2019

तडजोड स्वीकारल्याने संसार फुलतो --न्या. शर्मा

मोसीन कुरेशी
मंठा /प्रतिनिधी : आनंदी जीवनासाठी तडजोड आवश्यक असून तडजोड स्वीकारल्याने संसार फुलतो आणि सुखासमाधानाने जीवन जगता येते असे प्रतिपादन न्या. शर्मा यांनी केले. मंठा येथील दिवाणी व फौजदारी न्यायालयात शनिवार ता. 14 रोजी कायदेविषयक लोक न्यायालयात न्या. शर्मा यांनी दोन अर्जदारांना गैरअर्जदार सोबत समेट घडवून आणला व अर्जदारांना त्यांच्या सासरी नोंदविण्यास पाठविले .यावेळी न्या. शर्मा बोलत होते. जीवनाला सुखी आणि समाधानी करण्याचा एकमेव मार्ग तडजोड हा असून संसारामध्ये सुद्धा तडजोड करणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. त्यावेळी लोक न्यायालयात 28 प्रकरणे निकाली काढून 7 लाख 3 हजार 500 रुपये वसुली झाली. यावेळी पॅनल प्रमुख म्हणून न्या. शर्मा तर सदस्य म्हणून ॲड डी एस निंबाळकर, ॲड आर बी गडदे उपस्थित होते .याप्रसंगी ॲड पी डी चव्हाण, अॅड ए आर देशपांडे, अॅड व्ही आर वायाळ ॲड ए व्ही वायाळ, ॲड एस आर झोल ,अॅड एम एस मोरे, अॅड मोगल,  अॅड वेव्हल , अॅड राठोड, अॅड अवसरमोल,अॅड हेलसकर, ॲड लिंबुळकर,अॅड जाधव,  ॲड कुलकर्णी,अॅड राठोड तसेच न्यायालयीन अधीक्षक श्री जोशी कर्मचारी वेळीकर ,पोलीस उपनिरीक्षक नितीन गट्टू वार ,पो हे कॉ डांगरे पो कॉ चव्हाण इतर न्यायालयीन कर्मचारी व पत्रकार उपस्थित होते

Sunday, 15 September 2019

वंचित बहुजन आघाडीची मंठा शहरात महारॅली.....

मोसीन कुरेशी
मंठा /प्रतिनिधी : वंचित बहुजन आघाडीने शनिवार ता 14 रोजी मंठा शहरातून काढलेल्या भव्य रॅलीने विरोधकांना धडकी भरली. शहरात या रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. वंचित बहुजन आघाडीचे परतूर मंठा विधानसभा मतदारसंघाचे  उमेदवार संजय चव्हाण यांनी महारॅलीचे आयोजन केले होते. या रॅलीमध्ये पार्लमेंटरी बोर्डचे अण्णाराव पाटील, प्रदेश महासचिव नवनाथ पडळकर, यशपाल भिंगे ,मोहन राठोड यांची प्रमुख उपस्थिती होती. मंठा फाटा येथून या महारॅलीला सुरुवात झाली, बँड बाजा सहित फटाक्यांची आतषबाजी करत वंचित बहुजन आघाडीचा विजय असो ,बाळासाहेब आंबेडकर तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है अशा गगनभेदी घोषणा देत ही रॅली मुख्य रस्त्याने डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात आल्यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला. पुढे ही रॅली छत्रपती शिवाजी चौकात विसर्जीत करण्यात आली .तत्पूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला .या रॅलीमध्ये वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष दीपक बोराडे, भारिपचे जिल्हाध्यक्ष दीपक डोके, वंचित बहुजन आघाडीचे परतुर तालुका अध्यक्ष रोहन वाघमारे ,मंठा तालुका अध्यक्ष डॉ. त्रिभुवन, दीपक मोरे ,भारत उघडे, गुलाबराव बचाटे, चोखाजी सौंदर्य ,जगदीश राठोड, अविनाश चव्हाण, सुनील इंगळे, सुरमासिंग जुनी ,पंकज राठोड, राहुल नाटकर यांच्यासह वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते

Friday, 13 September 2019

बाप्पा पुढच्या वर्षी लवकर या.....कोल्हापूरच्या शंभुराजे मर्दानी खेळ विकास मंचच्या थरारक प्रात्यक्षिकाने मंठेकरांची मने जिंकली........

मोसीन कुरेशी
मंठा प्रतिनिधी : मंठा शहरात श्री गणेशाचे विसर्जन शांततेत आणि उत्साही वातावरणात पार पडले .गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या असा जयघोष करत ढोल ताशाच्या गजरात श्रीचे विसर्जन करण्यात आले .शिवसेना जिल्हाप्रमुख ए जे बोराडे संस्थापक अध्यक्ष असलेल्या जयभवानी गणेश मंडळाने कोल्हापूर येथून आणलेल्या शंभूराजे मैदानी खेळ विकास मंचच्या कार्यकर्त्यांनी विविध थरारक खेळ सादर केले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील मैदानी खेळ यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज, युवराज शंभूराजे, झाशीची राणी, तलवार लढत ,लाठीकाठी लढत ,लाठी काठी ,दांडपट्टा, पट्टा लिंबू, केळी, नारळ, काठी पट्ट्याने लिंबूचे दोन तुकडे करणे, एका वेळेस अनेक लिंबू कापणे आदि  प्रात्यक्षिक सादर केली छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका सुरज ढोली यांनी केली, शिवाजी नलावडे, ऋतुजा पाटील, युवराज पाटील, सरोजिनी लोहार, विक्रम पाटील, तुषार कांबळे, प्रथमेश पाटील, वैभव पाटील, संग्राम गणाचारी, सुरज पोळ, रणजीत मुरस्कर, नितीन मोरबळे, सर्वेश व वेदांत या बाल कलाकारांनी सोळा चमूने या प्रात्यक्षिकांमध्ये सहभाग घेतला होता. श्री गणरायाची मिरवणूक मज्जित समोर आल्यानंतर मुस्लिम बांधवांच्या वतीने श्री गणरायावर फुलांची पुष्पवृष्टी करण्यात आली .यावेळी कयूमभाई कुरेशी,  शबाब भाई कुरेशी, हाजी जलील भाई, कबीर तांबोळी, मुसाभाई कुरेशी, इलियास कुरेशी, इसामोदीन  पटेल,उपनगराध्यक्ष सिराजखान पठाण, बास खा पठाण, सगीर पठाण, शेख एजाजउद्दीन, पाशाभाई टेलर ,अली कुरेशी यांच्यासह  मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते .तसेच जयभवानी गणेश मंडळाने अहमदनगर येथून सात जणांच्या वाद्य पथकाला पाचारण केले होते त्यात तीन सनईवादन, एक सूर ,एक संबळ ,एक ताशा, एक हलगी याचा समावेश होता रावसाहेब हनुमंता फुलमाळी यांनी या सनई वाद्याचे प्रमुख नियोजन केले होते. वाजत गाजत श्री गणरायाला निरोप देण्यात आला. यावेळी जिल्हाप्रमुख ए जे बोराडे  पाटील , प्रल्हादराव बोराडे ,श्रीरंग अण्णा खरात, नगराध्यक्ष नितीन राठोड, माजी नगराध्यक्ष कैलास बोराडे ,सुरेश सरोदे ,नगरसेवक बाळासाहेब बोराडे, प्रदीप बोराडे, इल्यास कुरेशी, अरुण वाघमारे, नीरज सोमानी ,अचित नाना बोराडे, संजय गायकवाड ,गणेश बोराडे, संजय बोराडे ,बाजीराव आप्पा बोराडे, दिगंबर बोराडे, सौरभ झोल ,रवी भांबळे , गजानन बोराडे ,महादेव वाघमारे, तुळशीराम कोहिरे ,गजु भाऊ बोराडे, मधुकर काकडे ,भारतशेठ बोराडे, बालासाहेब बोराडे, प्रकाश घुले ,दीपक बोराडे, महादेव खरात ,विलास ठोकरे, कृष्णा हेलसकर ,संदीप बोराडे ,किरण सूर्यवंशी ,विकास ठोकरे ,नानासाहेब बोराडे ,विजय बोराडे ,नाथा बोराडे, भागवत बोराडे, आकाश कास्तोडे ,शुभम बोराडे, दळवे यांच्यासह गणेश भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते पोलीस अधीक्षक चैतन्य आणि उपअधीक्षक श्री बांगर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विलास निकम यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता

Tuesday, 10 September 2019

तळणी येथील चाळीस ते पन्नास तरूणांचा काॅग्रेस मध्ये प्रवेश....कार्यकर्त्यांच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही. माजी आ.सुरेशकुमार जेथलिया...

मोसीन कुरेशी
मंठा प्रतिनिधी सध्या विधानसभा निवडणुकीचे वेध लागले असुन जोरदार तयारी सर्वञच सुरू असल्याचे दिसुन येत आहे.म्हणुनच मंठा तालुक्यात काॅग्रेस पक्षाचे माजी.आमदार सुरेशकुमार जेथलिया याच्या माध्यमातुन जन संपर्क चालु असुन याचे औचित्य साधुन तळणी कराच्या वतीने जेथलिया यांचा फटाक्याची अतीषबाजी करत गावातुन मिरवणुक काढत हजारो नागरीकांच्या साक्षिने व मंगलसींग ठाकुर,रीतेश चंदेल ,रामेश्वर चव्हाण यांच्या नेतृत्वात राजपुत गल्लितील मारोती मंदीरावर जवळपास चाळीस ते पन्नास नव तरूणांनी सुरेशकुमार जेथलिया यांच्या नेतृत्वावर विस्वास टाकुन त्यांच्या ऊपस्थितीत नवतरूणाचे स्वागत करून हा प्रवेस सोहळा काल दि.08 सप्टेबर रविवारी रोजी संध्याकाळी सपन्न झाला.यावेळी या कार्यक्रमात जि.प.समाज कल्याण सभापती बनसोडे,प.स.सदस्य किसनराव मोरे,काॅग्रेस कमीटी मंठा ता.अध्यक्ष निळकंठराव वायाळ,बोराडे,अण्णा खंदारे,विनोद डोईफोडे,रामेश्वर कांगणे,महादेव माने,गौतम सदावर्ते,शीवाजी गुजर,अमोल सरकटे,जनार्धन आडळकर यांची प्रमुख ऊपस्थिती होती.यावेळी ऊपस्थित जनसमुदायांना बोलत असतांना सांगीतले की समस्या मिटवण्याबाबत भाजपा सरकार अपयशी ठरले असुन पाच वर्षे नुसत्या कोटीची विकास कामे केल्याच्या गप्पा मारत भाजपा सरकारने नागरिकांची दिशाभूल केली असून प्रत्यक्ष जनतेच्या खऱ्या समस्या सोडवण्यात हे सरकार सपशेल अपयशी ठरले असल्याचे प्रतिपादन मा.आ. सुरेश जेथलिया यांनी केले.यावेळी नागरिकांशी संवाद साधताना जेथलिया यांनी भाजपा सरकारवर टीका करताना म्हटले की , खऱ्या समस्या ऐरणीवर ठेवत भाजपाने नागरिकांचे लक्ष दुसरीकडे भटकवण्याचा डाव रचण्याचा कुटील डाव आखला , यात कधी जातीवाद धोरण, तर कधी दादागिरीचे राजकारण यामुळे येथील सर्वसाधारण जनता भयभीत झाली आहे. पाच वर्षे यांनी केवळ जनतेला वेठीस धरण्याचे काम केले असून, शेतकरी, मजूर ,व्यापारी व सामान्य नागरिकांच्या कुठल्याच हितकारी योजना यांनी  प्रत्यक्ष राबवल्या नसल्याने  आज सर्वच अडचणीत सापडले असल्याचे ते म्हणाले काँग्रेस यापूर्वी  अनेक वर्षे सत्तेत राहिले मात्र काँग्रेसने कधीच भाजपा सारखे सुडाचे  राजकारण केले नाही , काँग्रेसला सत्तेत आणण्यासाठी मला साथ द्या  नागरिकांच्या प्रत्येक समस्यांबाबत मी नेहमी तत्पर राहुण,तालुक्यात पंचसूत्री कार्यक्रम राबवणार असून सिंचनावर जास्तीत जास्त भर देणार असल्याचे त्यांनी सांगितले .या मतदार संघाच्या सर्वांगीण विकासासाठी मी वचनबद्ध असल्याची ग्वाही यावेळी त्यांनी दिली. व आज तरूणानी  जो माझ्यावर विस्वास ठेऊन पक्षात प्रवेश केला त्यांच्या विस्वासला तडा जाऊ देनार नसुन येनारा काळ आपलाच आहे   व मतदार भरभक्कमपणे माझ्या पाठीशी आहे असे त्यांनी यावेळी त्यांनी सांगीतले.या कार्यक्रमाचे सुत्रसंचलन अमोल सरकटे यांनी केले तर आभार रितेश चंदेल यांनी मानले
यावेळी गावातील नागरीक मोठ्यासंख्येने ऊपस्थित होते.
     

मार्केट यार्डातील अतिक्रमण हटविण्यासाठी नागरिकांचे निवेदन .....

मोसीन कुरेशी
मंठा /प्रतिनिधी : मंठा येथील मार्केट कमिटी यार्डातील जुना स्टेट बँक रोड प्रभाग क्रमांक पंधरा मधील कृष्णा खरात  घरापासून महादेव टाके यांच्या घरापर्यंत अतिरिक्त अतिक्रमण झाले असून अतिक्रमण हटवून रोडचे काम सुरू करावे अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे. यासंदर्भात मुख्याधिकारी नगरपंचायत मंठा यांना निवेदन देण्यात आले असून जिल्ह्याचे पालकमंत्री ना. बबनराव लोणीकर यांनी रोडचे उद्घाटन केले असून सदरील रोडचे काम चालू आहे ना. लोणीकर यांनी मार्केट कमिटी यार्ड मध्ये रस्त्याच्या कामाला मोठ्या प्रमाणावर निधी दिल्यामुळे नागरिकांची सुविधा होणार आहे सदरील रोडवरील अतिक्रमणे हटवून कामाला सुरुवात करावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे   या रस्त्याचे काम करताना अतिक्रमण असल्यामुळे या रस्त्याची रुंदी कमी झाले आहे त्यामुळे काम करून देखील पाहिजे तेवढा फायदा होणार नाही या ठिकाणी वाद निर्माण होण्याची शक्यता आहे मार्केट यार्ड शेतकरी नागरिक व्यापारी यांची मोठ्या प्रमाणात वर्दळ असते त्यामुळे अतिक्रमण काढणे अत्यंत गरजेचे आहे या रोडवरील अतिक्रमण काढून रस्त्याचे काम करावे आजूबाजूच्या व्यापाऱ्यांनी सहकार्य करावे असे आवाहन निवेदनात करण्यात आले आहे या निवेदनावर अविनाश खरात पवन राठोड अशोक शेरे गजानन टाके रुपेश लखोटिया पवन खरात भगवान खवणे शेखर शेटे महादेव टाके कृष्णा खरात रंगनाथ अवचार महादेव अवचार गजानन खरात शिवाजी खारवणे केशव खरात यांच्या सह्या आहेत

स्वच्छतेच्या बाबतीत नागरिकांनी जागरूक राहण्याची गरज.......दिपक बोराडे

मोसीन कुरेशी
मंठा प्रतिनिधी : मंठा नगरपंचायतच्या वतीने शहरात मेन रोड सह गावात दररोज साफसफाई केली जाते आणि ओला आणि सुका कचरा घंटागाडीद्वारे गावाबाहेर नेऊन टाकला जातो .परंतु मेन रोडवर असलेल्या डिव्हायडर मध्ये काही व्यापारी कचरा टाकतात त्याचा सर्वसामान्य नागरिकांना त्रास होतो यासाठी शहरातील व्यापारी व नागरिकांनी जागरूक राहून स्वच्छतेच्या कामात नगरपंचायतला सहकार्य करावे असे आवाहन जयभवानी गणेश मंडळाचे उपाध्यक्ष दीपक बोराडे यांनी केले आहे. डीवाईडरच्या मध्ये टाकलेला कचरा मेन रोडवर खाली पडतो दोन दिवसापूर्वी   मेसखेडा येथील दुचाकीस्वार पती-पत्नी मेन रोडवरील कचऱ्यामुळे खाली पडले आणि त्या महिलेच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली यावेळी दीपक बोराडे, नाना बोराडे, संदीप बोराडे, पप्पू शेजुळ, सुनील बोराडे यांनी या महिलेला हॉस्पिटलमध्ये दाखल केले अशा प्रकारचे अनेक अपघात मेन रोडवर होतात मोटरसायकली स्लीप होण्याचे प्रकार मेन रोडवरील कचऱ्यामुळे वाढत आहेत यासाठी नागरिकांनी सजग राहून आपल्या दुकानातील घरातील केरकचरा डीवाईडर मध्ये न टाकता घंटागाडीत टाकून ग्रामपंचायतला सहकार्य करावे असे आवाहन त्यांनी केले आहे

Monday, 9 September 2019

गणपतीसमोर जुगार खेळाणारांची थेट कारवाही.....पो.नि.विलास निकम

मोसीन कुरेशी
मंठा प्रतिनिधी  : गणेशोत्सव सुरु होऊन पाच दिवस झाले असुन येत्या पाच दिवसानंतर होणार्या गणेश विसर्जन मिरवणुकीत दारू पिऊन धिंगाणा घालणाऱ्यावर व जुगार गणपती समोर जुगार खेळणाऱ्यावर पोलिस थेट कारवाई करणार असल्याचे पोलीस निरीक्षक विलास निकम यांनी आयोजित बैठकी सांगितले.श्री गणरायाच्या विसर्जन मिरवणुकी संदर्भात मंठा पोलीस ठाण्यात शनिवार [ता.७] रोजी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी पोलीस निरीक्षक विलास निकम , ज्येष्ठ पत्रकार बाबासाहेब कुलकर्णी , नगराध्यक्ष नितीन राठोड, उपनगराध्यक्ष सिराज पठाण , नगरसेवक बाळासाहेब बोराडे , सखाराम बोराडे , यांची उपस्थिती होती. याप्रसंगी गणेश मंडळाच्या पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना पोलीस निरीक्षक विलास निकम म्हणाले की , गणपतीचे पावित्र्य राखावे गणपतीसमोर जुगार खेळू नये. गणपतीसमोर धार्मिक तसेच समाजिक बांधिलकी जोपासण्याचे  काम करावे तसेच विसर्जन मिरवणुकीत पारंपारिक वाद्याचा वापर करावा.डिजे वाजविण्यास पूर्णतः बंदी घालण्यात आली आहे.तसेच गणपती मंडळाच्या परिसरात जुगार खेळणाऱ्या वर अथवा दारू पिऊन धिंगाणा घालणाऱ्यावर कारवाई करण्यात येईल.तसेच शांतता व सुव्यवस्था कायम राहावी यासाठी सर्वांनी सहकार्य करावे.अशी अपेक्षा शेवटी बोलतांना व्यक्त केली.यावेळी प्रसंगी नगराध्यक्ष नितीन राठोड , उपनगराध्यक्ष सिराज पठाण , ज्येष्ठ पत्रकार बाबासाहेब कुलकर्णी यांनी आपली मनोगते व्यक्त केली. या बैठकीस शहरातील मंडळाचे पदाधिकारी , पोलीस कर्मचारी तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते...

जिल्हाप्रमुख ए जे बोराडे यांच्या हस्ते ऑटोरिक्षा युनियनच्या पदाधिकाऱ्यांना स्मार्ट कार्डचे वाटप......

मोसीन कुरेशी
मंठा /प्रतिनिधी : शिवसेना जिल्हाप्रमुख ए जे पाटील बोराडे यांच्या हस्ते मंठा शहरातील ऑटोरिक्षा युनियनच्या पदाधिकारी व सदस्यांना स्मार्ट कार्डचे वाटप करण्यात आले .जयभवानी गणेश मंडळाच्या आवारात झालेल्या कार्यक्रमाला श्रीरंगअण्णा खरात ,महादेव वाघमारे, जयभवानी गणेश मंडळाचे अध्यक्ष संजय बोराडे, उपाध्यक्ष दीपक बोराडे ,सरपंच महादेव खरात ,नाना बोराडे, संदीप बोराडे, ऑटो रिक्षा युनियनचे अध्यक्ष अनिल हिरे, उपाध्यक्ष बाबूभाई पठाण ,सचिव अमोल गते, कोषाध्यक्ष शकील सय्यद ,वशिष्ठ वायाळ, सचिव मुसाजीत  तांबोळी,सल्लागार कयूमखान, विष्णू चव्हाण, इलियास पठाण, सदस्य सतीश खंदारे ,रफिक शाह, सुनील हिरे, हिदायत तांबोळी, सुकावन  तांबोळी, विठ्ठल वांजळे,महादेव गोंडगे, रफिक कुरेशी, नारायण डाके, संदीप गुजर जुबेर पठाण, माजिद शेख, नारायण गोरे, मिथुन राठोड ईश्वर राठोड दीपक मगदले  यांची उपस्थिती होती .

Tuesday, 3 September 2019

मंठा ग्रामीण रुग्णालयाच्या गैर कारभाराची चौकशी करावी ...... प्रल्हादराव बोराडे

मोसीन कुरेशी
मंठा/प्रतिनिधी : मंठा ग्रामीण रुग्णालयाचा कारभार रामभरोसे चालत असून रोजंदारी वरील कर्मचारी ग्रामीण रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांना व त्यांच्या नातेवाईकांना वेठीस धरत असल्याचा प्रकार शिवसेना शहरप्रमुख बाजार समितीचे संचालक प्रल्हादराव बोराडे यांच्या निदर्शनास आला .मंठा ग्रामीण रुग्णालय संदर्भात अनेक दिवसांपासून तक्रारी होत्या या तक्रारींची शहानिशा करण्यासाठी श्री प्रल्हादराव बोराडे यांनी शुक्रवार 30 रोजी ग्रामीण रुग्णालयाला भेट दिली यावेळी त्यांना रुग्णालयात कार्यरत दोन एमबीबीएस डॉक्टरांऐवजी बीएएमएस डॉक्टर अधिकार नसताना बाह्यरुग्ण विभाग चालवीत असल्याचे निदर्शनास आले. मंजूर आठ वैद्यकीय अधिकारी पदांपैकी दोन  वैद्यकीय अधिकाऱ्यांना जिल्हा शल्यचिकित्सक एम के राठोड यांनी आर्थिक तडजोड करून त्यांच्या सोयीनुसार प्रतिनियुक्तीवर पाठविल्याचे सांगण्यात आले. नियमित सहा शिपाई कार्यरत असतांना स्वतः स्वच्छतेची कामे न करता रोजंदारीवर मजूर लावून स्वच्छता करीत असल्याचे निदर्शनास आले त्याचप्रमाणे स्टॉप नर्स, वरिष्ठ सहाय्यक, कनिष्ठ लिपिक ही पदे असतानासुद्धा  रोजंदारी कर्मचाऱ्याकडून कामे करून घेतल्या जातात चार औषधी निर्माण कर्मचारी हे खाजगी व्यक्ती द्वारे औषध विभाग चालवितात, एनसीसी व आयसीटीसी चे कर्मचारी आपल्या सोयीनुसार पंधरा-पंधरा दिवस गैरहजर राहून रोजंदारी च्या मजुरांकडून कामे करून घेतात बाह्यरुग्ण विभागाची वेळी सकाळी 8:45 ते 12:45 व दुपारी 03:45 ते 05:45 असताना ओपीडी दररोज सकाळी दहा ते बारा व सायंकाळी चार ते पाच या मनमानी वेळेत काढली जाते. ग्रामीण भागातून येणाऱ्या महिलांकडून रात्रीच्यावेळी कंत्राटी परिचारिका एक हजार ते तीन हजार रुपये पर्यंत पेशंट कडून डिलीवरीची वसूल केले जातात पैसे दिले नाही तर त्यांना जालना येथे रेफर केले जाते .1 एप्रिल ते 31 जुलैअखेर जालना येथे पाठविण्यात आलेल्या 18 पैकी 12 महिलांना रस्त्यातच प्रसूती झाली त्यापैकी दोन माता व त्यांची बालके दगावली अशा गंभीर परिस्थितीने संपूर्ण जिल्हा हादरला आहे. संजय गांधी निराधार योजना श्रावणबाळ योजनेचे वयाच्या प्रमाणपत्र करता कुठली नोंद वा पावती न देता शंभर रुपये प्रति प्रमाणपत्र घेऊन प्रमाणपत्र दिले जाते जन्म प्रमाणपत्र साठी सुद्धा गोरगरीब जनतेकडून शंभर ते दीडशे रुपयांची लूट ग्रामीण रुग्णालय कडून केली जाते. आरबीएसके चे डॉक्टर व पथक वरचेवर दौरे करून त्यांच्या लावलेले गाड्यांचे किलोमीटरच्या खोट्या नोंदी घेऊन परस्पर दिले उचलली जातात हा प्रकार जिल्हाभर होत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. माजी वैद्यकीय अधीक्षकांनी तयार केलेल्या गार्डन दुरुस्तीची अंदाज एक लक्ष रुपये खर्चून गार्डनला बसविण्यात आलेल्या जाळ्या  वापरून बोगस बिले उचलली आणि मोठ्या रकमेचा अपहार करण्यात आला ट्रामा केअर युनिट मध्ये कोणाची परवानगी न घेता वैद्यकीय अधीक्षक यांनी स्वतःची केबिन तयार केली बोगस बिल सुद्धा उचलले आहे नियमित चे एकोणवीस कर्मचारी व कंत्राटी 25 कर्मचाऱ्यांपैकी  ग्रामीण रुग्णालयात भेट दिली असता फक्त पाच ते आठ कर्मचारी ड्युटीवर हजर असल्याचे आढळून आले ग्रामीण रुग्णालयात सुरू असलेला हा सर्व गैरप्रकार जिल्हा शल्यचिकित्सक व वैद्यकीय अधीक्षक जालना यांच्यासोबत आर्थिक संगनमताने सुरू आहे या सर्व गैर कारभाराची उच्चस्तरीय सखोल चौकशी करून दोषी वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात यावे अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा शिवसेना शहर प्रमुख तथा बाजार समितीचे संचालक प्रल्हादराव बोराडे यांनी दिला आहे