मोसीन कुरेशी,
मंठा प्रतिनिधी:आज दि.१५ रोजी शैक्षणिक वर्ष २०१८-१९च्या पहिल्याच दिवशी जि.प.प्रा.शा.पांगरी खुर्द कें.कन्या मंठा येथे मौजे पांगरी चे सरपंच राधा तानाजी शेंडगे यांच्या प्रमुख उपस्थितीत तसेच शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष सुंदरराव काळे तंटामुक्ती अध्यक्ष मधुकरराव काळे, प्रतिष्ठित नागरीक तानाजी शेंडगे ग्रा..सदस्य अभिमन्यु व्हरकटे ,मा.उपसरपंच बाबाराव काळे मा.सदस्य भानुदास शेंडगे भानुदास राठोड आदी मान्यवरांच्या हस्ते शालेय परिसर स्वच्छ करून प्रत्येक विद्यार्थ्यांना शैक्षणिक वर्षात पुस्तकांचे वाटप करण्यात आले. या वेळी शाळेचे मुख्याध्यापक श्री. मुक्तार अन्सारी व सहशिक्षक बि.के.खरात सर सह स्वयंपाकी ताई नंदाबाई व तसेच मोठीया प्रमाणात विद्यार्थी उपस्थित होते.
Friday, 15 June 2018
मंठा येथील पांगरी खुर्द गावातील जि.प्राथमिक शाळेत पहिल्याच दिवशी विद्यार्थ्याना पुस्तक वाटप.....
Saturday, 9 June 2018
शिवसेना जिल्हाप्रमुख ए.जे बोराडे यांच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार
मोसीन कुरेशी...
मंठा प्रतिनिधी:जालना जिल्ह्यातील मंठा येथे एस.एस.सी परिक्षा मध्ये उत्तीर्ण झालेल्या गुणवंत विद्यार्थीचा शिवसेना जिल्हा प्रमुख ए.जे बोराडे यांच्या वतीने सत्कार करण्यात आला.यावर्षी मुलींनी बाजी मारली आहे.रेणुका विद्यालयची पूनम संतोष चव्हाण हिने 97.20 टक्के घेवून तालुक्यात प्रथम आली आहे. तर स्वामी विवेकानंद विद्यालयची सुप्रिया संतोष वरकड हिने 96.60 टक्के घेवून द्वितीय क्रमांकावर आली आहे.या निमित्त कु.पूनम संतोष चव्हाण, कु.सुप्रिया संतोष वरकड,अनिकेत सतीश निर्वाड,कु.राधिका नंदकुमार साबू,दिग्विजय सदाशिव कमळकर,कु वैष्णवी दिलीप मस्के,कु.प्रांजल भारत काष्टे,अजय प्रलाद, भारत काष्टे राठोड,ज्ञानेश्वर महादेव खनके,कु.पल्लवी दत्तराव बोराडे इत्यादी गुणवंत विद्यार्थीचा शिवसेना कार्यलयवर सत्कार करण्यात आला.
या प्रसंगी नगराध्यक्ष नितिन भैया राठोड,नगरसेवक बालासाहेब बोराडे,इल्यास कुरेशी,पत्रकार संतोष दायमा,मोसीन कुरेशी,माजी सभापति संतोष वरकड़,सदाशिव कमळकर सर,आर.के राठोड सर,पंचयत समेती सदस्य बाबा राठोड, रघुनाथ मामा चव्हाण, महादेव खनके, दत्तराव बोराडे, प्रलाद राठौड़, भारत काष्टे, दिलीप मस्के, नंदकुमार साबू,सतीश निर्वाड आदींची उपस्तिथी होती.
Friday, 8 June 2018
वैजनाथ बोराडे यांना पुरस्कार
मंठा प्रतिनिधी : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक वैजनाथ आबासाहेब बोराडे यांना नुकताच फुले शाहू आंबेडकर पुरस्कार प्रदान करण्यात आला.त्यांच्या सामाजिक कार्याची दखल घेऊन अखिल भारतीय श्री गुरूदेव सेवा आश्रम अमरावती या संस्थेच्या वतीने समानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.
मातोश्री बिंदुबाई सोनवणे सभागृहात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रभाकर सोनुने समाज कल्याण सभापती जळगाव , प्रमुख पाहुणे आ.राजू भोळे , जेष्ठ समाज सेवक विठ्ठल कोळी , अब्दुल सत्तार , उषा सपकाळे , संध्या सोनवणे , हरिचंद्र बाविस्कर यांच्या उपस्थितीत पुरस्कार प्रदान करण्यात आला. पुरस्काराबद्दल वैजनाथ बोराडे यांचे विविध स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे..
Thursday, 24 May 2018
जालना : बदनापूर नगरपंचायत भाजपच्या ताब्यात
जालना : बदनापूर नगरपंचायत भाजपच्या ताब्यात
नगराध्यक्षपदी प्रदीप साबळे तर उपनगराध्यक्षपदी शेख युनुस यांची निवड
बदनापुर प्रतिनिधी, बदनापूर नगरपंचायतमध्ये आज ता. 23 मे रोजी 12 वाजता नगरपंचायतच्या अध्यक्ष व उपाध्यक्षपदासाठी निवडणुक पार पडली असुन नगराध्यक्षपदासाठी भाजपचे प्रदीप साबळे यांना 10 नगरसेवकांनी मतदान केले तर प्रतिस्पर्धी आघाडीच्या उमेदवार श्रीमती प्रीती प्रमोद साबळे यांना 7 मतदान मिळाले आहे. नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत भाजपचे प्रदीप साबळे यांनी बाजी मारली तर उपनगराध्यक्षपदासाठी काँग्रेस पक्षाचे नगरसेवक तथा माजी उपनगराध्यक्ष शेख युनुस शेख लालमिया यांनी उमेदवारी दाखल होती व आघाडीचे नगरसेवक राजेंद्र जैस्वाल यांनी उमेदवारी दाखल होती. परंतु उपनगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत शेख युनुस शेख लालमिया यांच्या बाजुने 10 मतदान झाल्याने व प्रतिस्पर्धी आघाडीचे उमेदवार राजेंद्र जैस्वाल यांना ही केवळ 7 मतदान मिळाल्याने शेख युनुस शेख लालमिया यांनी बाजी मारली आहे. तसेच बदनापूर नगरपंचायतच्या उपनगराध्यक्षपदी शेख युनुस शेख लालमिया यांची दुस-यांदा निवड झाली आहे. नगरपंचायतचे नवनिर्वाचित अध्यक्ष प्रदीप साबळे व उपाध्यक्ष शेख युनुस लालमियां यांचे सर्वांकडून अभिनंदन करण्यात येत आहे.
Wednesday, 23 May 2018
मंठयात नगरपंच्यातच्या सत्तेसाठी शिवसेना-कॉंग्रेस एकत्र
नगराध्यक्षपदी शिवसेनाचे नितिन राठोड तर
उपनगराध्यक्षपदी कॉंग्रेसचे सिराज खान पठान यांची बिनविरोध निवड....
मोसीन कुरेशी
मंठा प्रतिनिधी:मंठा नगरपंचायतवर शिवसेनेची सत्ता होती. मात्र, तत्कालीन नगराध्यक्षा पार्वती बोराडे यांचे पती कैलास बोराडे व संजय सरोदे यांनी शिवसेनेला सोडचिठ्ठी देत भाजपासोबत घरोबा केल्यामुळे ही निवडणूक लागली होती. १७ नगरसेवक असलेल्या नगरपंचायतवर शिवसेनेची एकहाती सत्ता होती. मात्र , शिवसेनेत दोन गट तयार झाल्याने शिवसेनेला सत्ता टिकविण्यासाठी कॉग्रेसला सोबत घेतल्याने पुन्हा नगराध्यक्षपदी शिवसेनेचे नितीन राठोड तर उपनगराध्यक्षपदी काँग्रेसचे सिराज खान पठान यांची निवड झाली. यासाठी शिवसेनेचे जिल्हा प्रमुख ए जे पाटील बोराडे व काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष माजी आ. सुरेशकुमार जेथलिया यांची भूमिका महत्त्वाची ठरली. मंठयात सत्तेसाठी भाजपाला बाजूला ठेवण्यासाठी शिवसेना-काँग्रेस एकजीत आल्याचे पहावयास मिळले आहे.
निवडणूक पीठासीन अधिकारी तथा परतुरचे उपविभागीय अधिकारी ब्रिजिश पाटिल व प्रभारी मुख्याधिकारी तथा तहसीलदार राहुल गायकवाड यांनी विशेष सभा बोलवुन निवडणूक घेतली. ही निवडणूक शांततेत पार पडली. यावेळी शिवसेनेचे नवनिर्वाचित नगराध्यक्ष नितिन राठोड, बालासाहेब बोराडे,इल्यास कुरेशी, अरुण वाघमारे,सौ. सिमा नीरज सोमाणी तर काँग्रेसचे नवनिर्वाचित उपनगराध्यक्ष सिराज खान पठान, अचित बोराडे,शेख साजिद जलील, सौ.बिलकिस मोईन कुरेशी, सौ.एजाज नसरीन मूसा कुरेशी यांची उपस्थिती होती.
Tuesday, 22 May 2018
आज कुमारस्वामी यांचा शपथविधी
कॉंग्रेसचे दलितनेते जी. परमेश्वर यांना उपमुख्यमंत्रीपद
मोसीन कुरेशी
बंगळुरु : जेडीएसचे एच. डी. कुमारस्वामी यांना कर्नाटकचे मुख्यमंत्री म्हणून आणि काँग्रेसचे दलित नेते जी. परमेश्वर उपमुख्यमंत्री म्हणून बुधवारी पद आणि गोपनीयतेची शपथ घेतील. त्यानंतर गुरुबारी विधानसभाध्यक्षांची निवड करण्यात येईल. शपथविधीनंतर आपण विधानसभेत विश्वासदर्शक ठराव मांडू, असे कुमारस्वामी यांनी मंगळवारी स्पष्ट केले. काँग्रेस व जनता दलाच्या आमदारांच्या संयुक्त बैठकीनंतर काँग्रेस नेते के.सी. वेणुगोपाल यांनी सांगितले की, विधानसभाध्यक्षपदासाठी काँग्रेसच्या के.आर रमेशकुमार यांचे नाव निश्चित केले आहे. बहुमत सिद्ध झाल्यानंतर अन्य मंत्र्यांचा शपथविधी आणि खातेवाटप केले जाईल, असे कुमारस्वामी म्हणाले.
Monday, 21 May 2018
कर्नाटकात होणार दोन उपमुख्यमंत्री ?
कुमारस्वामींनी घेतली सोनिया राहुलची भेट
नवी दिल्ली : कर्नाटकात काँग्रेस व जनता दलाचे संयुक्त सरकार बनवण्यासाठीचा मसुदा तयार झाला असून, त्यासंदर्भात भावी मुख्यमंत्री एच.डी. कुमारस्वामी यांनी सोमवारी काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी ब यूपीएच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांची भेट घेतली. हे दोन्ही नेते बुधवारी संध्याकाळी ४ बाजता बंगळुरुमध्ये होणार्या शपथविधीला हजर राहणार आहेत. काँग्रेस नेत्यांशी कुमारस्वामी यांची जी
चर्चा झाली, त्यात बहुजन समाज पक्षाच्या एकमेव आमदाराला मंत्रिमंडळात घेण्यावर निर्णय झाला. काँग्रेसने दोन उपमुख्यमंत्री असावेत, असा प्रस्ताव कुमारस्वामी यांच्यापुढे ठेवला आहे.तसेच काही महत्त्वाची खाती काँग्रेसला द्यावीत असेही त्यांना सुचवण्यात आले आहे. त्यावर मंगळवारी अंतिम निर्णय होईल. राहुल यांची कुमारस्वामींनी भेट घेतली, तेव्हा खा. के.सी. वेणुगोपालही हजर होते. उपमुख्यमंत्रिपदासाठी काँग्रेसने जी. परमेश्वर यांचे नाव नक्की केले आहे.
ग्रामीण भागात पायाभूत सुविधा निर्माण करण्यावर भर विकास कामे दर्जेदार व गुणवत्तापूर्ण करा ..पालक मंत्री बबनराव लोनिकर
मोसीन कुरेशी
मंठा, दि. 21 - जालना जिल्ह्याच्या सर्वांगिण विकासासाठी मोठ्या प्रमाणात निधी मंजूर करण्यात येत आहे. ग्रामीण भागातही पायाभूत सुविधा निर्माण करण्यावर भर देण्यात येत असुन विकासाची कामे करत असताना ती दर्जेदार व गुणवत्तापूर्ण करावीत, असे प्रतिपादन राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री बबनराव लोणीकर यांनी केले.
मंठा तालुक्यातील विडोळी येथे विविध विकास कामांचा शुभारंभ पालकमंत्री श्री लोणीकर यांच्या हस्ते करण्यात आला. त्याप्रसंगी उपस्थित ग्रामस्थांशी संवाद साधताना ते बोलत होते.
व्यासपीठावर भूजंगराव गोरे , संदीप गोरे, अंकुशराव बोराडे, , गणेशराव खवणे, , शिवाजी आबा खंदारे, बाबुराव शहाणे, रामराव लोणीकर, राजेश मोरे, , प्रदीप बोराडे, पंजाबराव बोराडे, कल्याण खरात, संभाजी खरात, नागेशराव घारे ,कैलास बोरडे, प्रकाश टकले, सदाशिव निर्वळ, सुदाम प्रधान, विष्णु फपाटे, शिवदास हानवते, नाथराव काकडे, गजानन देशमुख, अशोक वायाळ, नितीन सरकटे, उपविभागीय अधिकारी ब्रिजेश पाटील,तहसीलदार राहूल गायकवाड, रावसाहेब आवचार, एम.डी.राठोड, निवास देशमुख, डिगांबर मुजमुले, विठ्ठलराव काळे, निवास देशमुख, ज्ञानोबा आवचार रामकिसन आवचार रामराव गोरे, भीमराव भरर्गे संजय सहजराव, लक्ष्मण ज्ञानोबा मगर, अनिल राऊत, शंकर मोरे, परमेश्वर गोरे, बाबुराव गोरे, सुदाम प्रधान, शेषराव गोरे, रामराव गोरे, रस्तुम कदम, डिगंबर मुजमुले, विठ्ठलराव काळे महादुअप्पा कापसे, नारायणराव कदम, उत्तमराव गोरे, बालासाहेब चिंचोलकर, रंगनाथराव आवचार, विठ्ठलराव कदम, लक्ष्मण आवचार, अच्चुतराव आवचार , सर्जेराव कदम, श्रीमती झरे आदींची उपस्थिती होती.
पालकमंत्री श्री लोणीकर म्हणाले की, ग्रामीण भागात पायाभूत सुविधा निर्माण करण्यावर भर देण्यात येत असुन गावामध्ये असलेल्या समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. विडोळी (खु) ते मंगरूळ रस्त्याचे मजबुतीकरण व डाबरीकरणं करणे त्यात ग्रामपंचlयंत आंतर्गत पाईप लाईन व इतर कामे मिळून एकून 01 कोटी 77 लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. गावांच्या विकासामध्ये महत्वाची भूमिका बजावणाऱ्या ग्रामपंचायतींची कामे दर्जेदार व गुणवत्तापूर्ण करुन ती तातडीने पूर्ण करण्यात यावीत.
दळणवळणामध्ये महत्वाची भूमिका बजावणाऱ्या रस्ते विकासाला शासनाने प्राधान्य दिले असुन जालना जिल्ह्यात रस्त्यांच्या कामासाठी 7 हजार कोटी रुपंयाचा निधी मंजूर करुन या निधीच्या माध्यमातुन संपूर्ण जिल्ह्यात रस्त्यांची कामे करण्यात येत आहेत. दोन हजार कोटी रुपये खर्चून शेगाव ते पंढरपूर या सिमेंट रस्त्याचे कामही वेगाने करण्यात येत असुन मतदारसंघातील 200 गावांमध्ये रस्त्याची कामे करण्यात येत आहेत. येणाऱ्या काळात मतदारसंघातील एकही गाव पक्क्या व डांबरी रस्त्यापासून वंचित राहणार नसल्याची ग्वाहीही पालकमंत्री श्री लोणीकर यांनी यावेळी दिली.
जालना, परतूर व मंठा तालुक्यातील 176 गावांतील जनतेला शुद्ध व स्वच्छ पाण्याचा पुरवठा करण्यासाठी 234 कोटी रुपये खर्चून वॉटरग्रीड योजना करण्यात येत आहे. या योजनेंतर्गत अकराशे किलोमीटरची पाईपलाईन टाकण्यात येणार असुन आतापर्यंत 450 किलोमीटरपर्यंत पाईपलाईनचे काम करण्यात आले आहे. शंभर गावामध्ये पाण्याच्या टाक्यांची कामे सुरु करण्यात आली असुन लवकरच या योजनेचे काम पूर्ण होऊन नागरिकांना स्वच्छ व शुद्ध पाण्याचा पुरवठा करण्यात येणार असल्याचेही पालकमंत्री श्री लोणीकर यांनी यावेळी सांगितले.
जालना जिल्ह्यात वीजचे जाळे निर्माण करुन सर्वसामान्य नागरिकासह शेतकऱ्यांच्या शेतीपंपाला योग्य दाबाने व सुरळीत वीज पुरवठयासाठी प्रयत्न करण्यात येत असुन जिल्ह्यात 33 के.व्ही. चे 49 उपकेंद्र मंजुर करण्यात आले असुन त्यापैकी 20 उपकेंद्रांची कामे सुरु करण्यात आली आहेत. विडोळी, पाटोदा येथे 33 के.व्ही. मंजूर असुन केंधळी येथेही 33 के.व्ही.चे उपकेंद्र करण्यात येणार असुन त्यामुळे या भागातील जनतेला सुरळीतपणे वीज पुरवठा होणार असल्याचे पालकमंत्री श्री लोणीकर यांनी यावेळी सांगितले.
जालना जिल्ह्यात अनेकविध मोठमोठे प्रकल्प उभारणीवर भर देण्यात येत असुन जालना येथे 200 एकर जागेवर रसायन तंत्रज्ञान महाविद्यालयाची उभारणी करण्यात येणार आहे. या महाविद्यालयाच्या माध्यमातुन जिल्ह्यासह मराठवाड्यातील गोरगरीबांच्या मुलांना उच्च शिक्षण घेण्याची संधी मिळणार असुन या माध्यमातुन त्यांना रोजगारही उपलब्ध होणार आहे. त्याचबरोबर जिल्ह्यात सीडस पार्कचीही उभारणी 110 एकर जागेवर करण्यात येणार असुन याचा फायदा शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात होणार असल्याचेही पालकमंत्री श्री लोणीकर यांनी यावेळी सांगितले.
सातत्याने निर्माण होणाऱ्या टंचाई परिस्थितीवर मात करुन शाश्वत पाणीसाठे निर्माण करण्यासाठी जलयुक्त शिवार अभियान यशस्वीरित्या राबविण्यात येत असुन जालना जिल्ह्यात या अभियांनातर्गत 200 कोटी रुपयांचा निधी खर्चून नद्यांचे खोलीकरण, रुंदीकरण करण्याबरोबरच 600 बंधाऱ्यांची उभारणी करुन जलसंधारणाची मोठ्या प्रमाणात कामे करण्यात आली आहेत. या कामांध्ये महाजनट्रस्ट, नाम फाऊंडेशन या सेवाभावी संस्थांचीही मदत घेण्यात येत असुन येणाऱ्या काळात संपूर्ण जिल्हा टंचाईमुक्त करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येत असल्याचेही पालकमंत्री श्री लोणीकर यांनी यावेळी सांगितले.
कार्यक्रमास पदाधिकारी, अधिकारी व ग्रामस्थांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
*******
Sunday, 13 May 2018
ऑल इंडीया पयामे इंसनियत फोरमच्या वतीने मंठा बस्थानकात प्रवासी यांना एक हजार पानी पाऊच वाटप करण्यात आले.
(मराठवाडा न्यूज)
मंठा प्रतिनिधी;मोसीन कुरेशी,सर्व राज्यात उन्हाचा ताड़का बसत आहे व तापमान 43 से. वर गेला आहे. यामुळे प्रवास करणारे प्रवासी यांची लाही लाही होत आहे.बस स्थानकात पानी पाऊच भेटत नाही व बिसलेरी साठी 15 ते 20 रूपये मोजावे लागत असल्याने गरीब प्रवासियांना वीना पाण्याचेही प्रवास करावा लागत असल्याने ही परिस्तिथि समजून मानवतेचा संदेश देणारी संघटना ऑल इंडिया पयामे इंसानियत फोरमच्या वतीने मंठा येथील बस्थानकात प्रवासियांना 1000 हजार पानी पाऊच वाटप करण्यात आले या प्रसंगी थंड पानी पाऊच पिऊन प्रवासीयांनी पयामे इंसानियतच्या सदस्यचे आभार मानले यावेळी मराठा सेवासंघचे एस एन मोरे सर,खराबे सर,नगरसेवक इल्यास कुरेशी व सर्व ऑल इंडिया पयामे इंसानियत फोरमच्या मंठा यूनिट उपस्थित होते.
Thursday, 19 April 2018
मंठयात बलात्कारांच्या निषेधार्थ हजारोंचा केंडल मार्च तहसिलदारांस दिले निवेदन.
मंठा प्रतिनिधी,मोसीन कुरेशी उन्नाव,कठुवा,सूरत,सासाराम,अमेठी इत्यादि ठिकाणी निर्घृण हत्या या सर्वांच्या पार्श्वभूमीवर सम्पूर्ण भारतात आक्रोषाचे तिव्र पडसाद उमटले असेच मंठा शहरात ही नागरिकामध्ये तिव्र असंतोष पसरला आणि याची परिणीति कैंडल मार्च मध्ये दिसून आली स्थानिय विश्राम गृहात् सायं 6 पासून नागरिकांची गर्दी जमु लागली ठीक 7 वाजता पेटललेल्या मेंनबत्त्या हातात घेऊन सर्व धर्मीय व जातीय नागरिक मौन मोर्चात सामिल झाले।
" आसिफा हम शर्मिंदा है ,तेरे कातिल ज़िंदा है" ;बलात्कारयाना तात्काळ फाशी द्या;धिक्कार असो धिक्कार असो बलात्कार्यांचा धिक्कार असो आशा विविध घोषणांचे फलक हातात होते । मंठा टी पॉइंट पासून शिवाजी पुतल्या जवळ मोर्चा आला नंतर शोक सभा आयोजित करण्यात आली अनेकांनी भावना व्यक्त केल्या ।सर्व प्रथम महिला प्रतिनिधी म्हणून चन्द्रकला पोपटे ज्योति पोपटे यांनी तिव्र शब्दात संताप व्यक्त केला । प्रत्येकाने प्रत्येक स्त्री ही माझी मुलगी ,बहिन किंवा आई आहे असे समजून स्त्रियांचे रक्षण करावे । स्त्री कोणत्याही धर्माची जातीची असो तिचे रक्षण करणे आपले कर्तव्य आहे असे समजावे
भाऊसाहेब गोरे म्हणाले की हे कृत्य मानवतेला लाजवीणारे असून दोषिवर लवकर कार्यवाही व्हावी तर बाबूजी तिवारी यांनी पशुनाही लाजविल अशी ही घटना असून प्रसंगी कायद्यात बदल करुन नराधमाना तात्काळ मृत्युदंड द्यावा जामा मस्जिद चे इमाम हाफेज जब्बार म्हणाले या सैतानांच्या निन्दनीय कृत्याचा आम्ही धिक्कार करतो व शीघ्र न्यायाची मागणी करतो
राजेश मोरे म्हणाले ,या प्रकरनाला राजकीय स्वरुप न देता निः पक्षपने पिडिताना न्याय मिळावा अड़.मोरे म्हणाले की कधी कधी पुराव्या अभावि दोषी निर्दोष सुटतात व अनाहुत पने पिडितांवर अन्याय होतो ऎसे होता कामा नये
शासन दरबारी निषेध नोंदविण्या साठी लिहिलेले निवेदन तहसिलदार राहुल गायकवाड़ यानी कार्यक्रम स्थळी स्वतः येऊन स्वीकारले व लगेच वरिष्ठाना पाठवित असल्याचे सांगितले याप्रसंगी शेवटी उपस्थितानि मौन श्रद्धाञ्जलि अर्पण केली
कैंडल मार्च चे वैशिष्ट्य असे की यात व्यापारी, कर्मचारी, पत्रकार, राजकीय ,सामाजिक, शैक्षणिक अशा विविध सर्व क्षेत्रातील सर्व धर्मीय नागरिक सामिल झाले होते ।।
Sunday, 8 April 2018
'इश्क सुब्हान अल्लाह' या धारावाहिक बंद करण्याची मागणी. परतुर येथे पोलीस निरीक्षकाला निवेदन देण्यात आले.
(मराठवाडा न्यूज़ ब्यूरो)
परतुर प्रतिनिधी;झी टीव्ही वर प्रसारित करण्यात येणारा धारावाहिक 'इश्क सुब्हान अल्लहा' या धारवाहिकावर ट्रिपल तलाक व शरीयत विरुद्ध मनघडत पद्धतीने दखवित आहे.व मुस्लिम समाजाच्या भावना व मुस्लिम समाजांना बदनाम करण्याचे षड्यंत्र होत असल्याने धारवा हिकावर कायदेशीर करवाई करुण प्रसारण बंद करण्यात यावे 14 मार्च रोजी झी टीव्ही वर प्रसारित करण्यात येणारे हिंदी धारावाहिक 'इश्क सुभानअल्लाह' हा धारावाहिक दखविण्यात येत आहे.या धारावाहिक प्रसारणा मध्ये मनघडत पद्धतीने ट्रिपल तलाक विषयावर कथानक मांडले आहे तसेच या धारावाहीकाच्या पहिल्या चित्रिकारणा मध्ये ट्रिपल तलाख कायदा विरोधात मोर्चे काढणारे दृश्य,सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करणारे दृश्य,जाळपोळीचे दृश्य चित्रीकरण दर्शविणयात आलेले आहे.सादर धाराविहीका मध्ये ज्या पद्धतीने ट्रिपल तलाक बाबत कथा-कथन हे पवित्र कुरान व हदीसच्या विरुद्ध दखविण्यात आले आहे.सदर धारावाहीक बनवीताना संबंधीतांनी पवित्र कुरान व हदीस मध्ये ट्रिपल तलाक संदर्भातील कोणतीही माहिती घेतलेली नाही तसेच देशातील प्रमुख मुस्लिम धर्मगुरुंशी कोणतीही चर्चा अथवा लेखी माहिती घेतलेली नाही.सदर धारावाहिकामध्ये 19 मार्च 2018 ते 20 मार्च 2018 मध्ये प्रसारित झालेल्या चित्रिकरानामध्ये मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डच्या कार्यवाहिवर चुकीच्या पद्धतीने कथा-कथन करुण समाजाची दिशाभुल करण्याचे व समाजात चुकीचे संदेश देण्याचे कार्य करीत असल्याने निदर्शनास आले आहे.त्यामुळे मुस्लिम समाजाच्या धार्मिक भावना दुखविल्या असून व मुस्लिम समाजाचे अपमान करण्यात आले.आहे. तरी या धारावाहिकवर कायदेशीर कारवाही करुण या प्रसारण तत्वरित बंद करण्यात यावे. या प्रसंगी इब्राहिम कायमखानी,समाज सेवक नासेर चाऊस, पठाण मुज़म्मील,शेख महेबुब, ईत्यादी उपस्थित होते.
Friday, 6 April 2018
इश्क सुब्हान अल्लाह या धारावाहिकावर बंदीची मुस्लिम संघटना कडून मागणी
मंठा येथे तहसील कार्यलय मार्फ़त मुख्यमंत्रीला निवेदन देण्यात आले.