(मराठवाडा न्यूज)
मंठा प्रतिनिधी;मोसीन कुरेशी,सर्व राज्यात उन्हाचा ताड़का बसत आहे व तापमान 43 से. वर गेला आहे. यामुळे प्रवास करणारे प्रवासी यांची लाही लाही होत आहे.बस स्थानकात पानी पाऊच भेटत नाही व बिसलेरी साठी 15 ते 20 रूपये मोजावे लागत असल्याने गरीब प्रवासियांना वीना पाण्याचेही प्रवास करावा लागत असल्याने ही परिस्तिथि समजून मानवतेचा संदेश देणारी संघटना ऑल इंडिया पयामे इंसानियत फोरमच्या वतीने मंठा येथील बस्थानकात प्रवासियांना 1000 हजार पानी पाऊच वाटप करण्यात आले या प्रसंगी थंड पानी पाऊच पिऊन प्रवासीयांनी पयामे इंसानियतच्या सदस्यचे आभार मानले यावेळी मराठा सेवासंघचे एस एन मोरे सर,खराबे सर,नगरसेवक इल्यास कुरेशी व सर्व ऑल इंडिया पयामे इंसानियत फोरमच्या मंठा यूनिट उपस्थित होते.
No comments:
Post a Comment