Friday, 8 June 2018

वैजनाथ बोराडे यांना पुरस्कार

मंठा प्रतिनिधी : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक वैजनाथ आबासाहेब बोराडे यांना नुकताच फुले शाहू आंबेडकर पुरस्कार प्रदान करण्यात आला.त्यांच्या सामाजिक कार्याची दखल घेऊन अखिल भारतीय श्री गुरूदेव सेवा आश्रम अमरावती या संस्थेच्या वतीने समानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.
     मातोश्री बिंदुबाई सोनवणे सभागृहात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रभाकर सोनुने समाज कल्याण सभापती जळगाव , प्रमुख पाहुणे आ.राजू भोळे , जेष्ठ समाज सेवक विठ्ठल कोळी , अब्दुल सत्तार , उषा सपकाळे , संध्या सोनवणे , हरिचंद्र बाविस्कर यांच्या उपस्थितीत पुरस्कार प्रदान करण्यात आला. पुरस्काराबद्दल  वैजनाथ बोराडे यांचे विविध स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे..

No comments:

Post a Comment