Friday, 30 March 2018
मंठा येथे दोन जुगारी अटकेत 1 लाख 77 हजारांचा मुद्देमाल जप्त.
Thursday, 29 March 2018
मंठा शहराच्या सर्वांगिण विकासासाठी कटीबध्द-पालकमंत्री बबनराव लोणीकर
मंठा, दि.29 – परतुर विधानसभा मतदार संघासह संपूर्ण जालना जिल्ह्यात प्रलंबित प्रश्न मार्गी लावत शासनाने प्रत्येक गाव, वाडी, वस्त्यांना डांबरी व पक्क्या रस्त्याने जोडण्यासाठी महत्वपुर्ण पाऊले उचलेली असून मंठा शहराच्या सर्वांगिण विकासासाठी आपण कटीबध्द असल्याचे प्रतिपादन राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री बबनराव लोणीकर यांनी केले. मंठा येथे सिमेंट, काँक्रीटीकरण व पेव्हर ब्लॉक बसविण्याच्या कामांच्या उद्घाटन प्रसंगी पालकमंत्री श्री लोणीकर बोलत होते. व्यासपीठावर जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष राहुल लोणीकर, नगराध्यक्षा पार्वती बोराडे, भुजंगराव गोरे, भाऊसाहेब कदम, गणेशराव खवणे, अंकुशराव बोराडे, संदीप गोरे, राजेश मोरे, कैलास बोराडे, सिध्दीविनायक मुळे यांची प्रमुख उपस्थिती होती. पालकमंत्री श्री लोणीकर म्हणाले की, मंठा शहरातील पाणी पुरवठा योजना, मुख्य रस्ता, घनकचरा प्रकल्प यासह विविध विकासकामांच्या माध्यमातुन शहराचा चेहरामोहरा बदण्यासाठी आपण प्रयत्नशिल असून मंठा शहराच्या विकासात निधीची कमतरता भासू दिली जाणार नसल्याची ग्वाहीही पालकमंत्री श्री लोणीकर यांनी यावेळी दिली. मंठा शहरातील विविध रस्त्याच्या 2 कोटी 25 लक्ष रुपयाच्या विकास कामांचे उदघाटन पालकमंत्री श्री लोणीकर यांच्या हस्ते करण्यात आले. यामध्ये विडोळी फाटा ते डॉ. आंबेडकर चौक या मुख्य रत्यांच्या दुतर्फा पेव्हर ब्लॉक (87,10,479₹), बसस्टँड-स्वामी विवेकानंद शाळा ते बाजार मैदान सिमेंट रस्ता (92,97,247₹) तसेच डॉ. आंबेडकर पुतळा ते बाजार मैदान सिमेंट रस्ता (44,92,020₹) आदींचा समावेश आहे. यावेळी प्रदीप बोराडे, कल्याण खरात, संभाजी खंदारे, पंजाब बोराडे, जिजाबाई जाधव, सुरेश सोळंके, शिवदास हनवते, नाथराव काकडे, विठ्ठलराव काळे, माऊली वायाळ, दत्ता कांगणे, सतीश निर्वळ, विशाल कदम, निवास देशमुख, कंलदर खा, संजय गायकवाड, विष्णु घोडके, एजाजभाई, दारासिंग चव्हाण, प्रमोद बोराडे, पंजाब पुणेकर, नितीन सरकटे, अंसाबाई राठोड, जयश्री पवार यांच्यासह अनेकाची उपस्थिती होती .
Wednesday, 28 March 2018
युवकाचे तुकडे करून बोरवेल मध्ये टाकले!
पाचोड : गेल्या पाच महिन्यांपासून बेपत्ता असलेल्या एका पंचवीस वर्षीय तरुणाचा तुकडे केलेला मृतदेह कूपनलिकेत बुधवारी (दि. २८) सापडल्याने पाचोड परिसरात एकच खळबळ उडाली. पोलिसांनी तब्बल ३० फूट खड्डा खोदून मृतदेह कूपनलिकेतून बाहेर काढला. अनैतिक संबंधातून या युवकाची हत्या झाल्याचा संशय व्यक्त होत आहे..
मुजीम नबी शेख (२५ रा. खादगाव, ता. पैठण) असे खून करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे. मुजीम हा अहमदनगर येथे लाईनवरील ट्रकवर कामाला होता. १० ऑक्टोबर २०१७ रोजी जेवण करून संध्याकाळी साडेसात वाजता तो घराबाहेर पडला. मात्र रात्री उशिरापर्यंत तो घरी न परतल्याने कुटुंबीयांनी त्याच्या मोबाईलवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, मात्र त्याचा मोबाईल बंद होता. दुसऱ्या दिवशी कुटुंबीयांनी सर्वत्र शोध घेतला. गावातल्या मोहसीन शेखने मुजीमला रात्री गुड्डू उर्फ साहील अफसर शेख यांच्या पानटपरीवर बसलेला पाहिले होते. मुजीमचे पानटपरी चालक गुड्डूच्या पत्नीसोबत अनैतिक संबंध असल्याची चर्चा गावात होती. मुजीमच्या घरी सुद्धा याची भनक होती. त्यामुळे आपल्या लेकाचे बरेवाईट तर होऊ नये यासाठी मृत मुजीमच्या वडील नबीश शेख यांनी १२ ऑक्टोबर २०१७ रोची पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. यावेळी आपल्या मुलाला गुड्डू उर्फ साहील अफसर शेख, त्याचा भाऊ बाबर अफसर शेख व अकबर अफसर शेख यांनी डांबून ठेवल्याचा संशय व्यक्त केला होता..
यानंतर पाचोड पोलिसांनी या तिघांना ताब्यात घेऊन घटनेची माहिती काढण्याचा प्रयत्न केला होता. परंतु आरोपीने घटनेबाबत कबुली दिली नव्हती. तेव्हापासून पोलिसांनी या तिघांवर नजर ठेवण्यास सुरुवात केली होती. गुप्त माहितीद्वारे पोलिसांना गावातील जिल्हा परिषद शाळेच्या पाठीमागील बाजूस बबन डाके यांच्या शेतातील बोअरवेलमध्ये नजीमचा मृतदेह टाकल्याची माहिती मिळाली. सपोनि. महेश आंधळे, उपनिरीक्षक गोरक्ष खरड, नुसरत शेख, राठोड यांनी बुधवारी दुपारी घटनास्थळी जाऊन जेसीबी व पोकलेनच्या साहाय्याने तब्बल तीस फुटांपर्यंत खड्डा खोदला. यावेळी मुजीम पोलिसांना शरीराचे भागाचे अवशेष आढळले. पोलिसांनी सर्व तुकडे एकत्रित करून ते शवविच्छेदनासाठी पाचोड ग्रामीण रुग्णालयात पाठविले. रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती..
एटीएम बाहेर लागणार रांगा !
बँकांचे काम आजच अटोपुन घ्या;शनिवार वगळता पुढील चार दिवस बँका बंद
मुंबई : (मराठवाडा न्यूज़ ब्यूरो)शनिवार वगळता गुरुवारपासून पुढील चार दिवस बँकांचे व्यवहार सर्वसामान्यासाठी बंद राहणार असल्याने ए टी एम बाहेर पैसे काढण्यासाठो रागा बघायला मिळु शकतात. त्यामळे बँकेची तातडीची असणारी कामे बुधवारीच आटोपून न घेतल्यास शनिवारी गर्दीत किंवा थेट मंगळवारीच व्यवहार करावे लागतील डिजिटायझेशनमुळे जवळपास ४० टक्के व्यवहार ऑनलाइन होत असले तरी बँकना सुट्टी असली की सर्वाधिक भार ए टी एम वर येतो. राज्यात सर्व बँकांचे मिळून जवळपास २२००० ए टी एम आहेत. यामध्ये १५००० हून अधिक सरकारी बँकांच्या एटीएमची संख्या आहेत. सरकार बँकांनी एटीएममध्ये रोख भरण्यासाठी स्वतंत्र एजन्सीची नियुक्ती केली असली तरी सुट्टी असली की या एजन्सीसना बँकांच्या करन्सी चेस्टमधून रोख मिळत नाही. खासगी बँकांचे करन्सी चेस्ट मात्र सुट्टीच्या दिवशी सुरु असतात. एक अधिकारी त्यासाठी नियुक्त असतो. त्यामार्फत सुट्टीच्या दिवशीही एटीएममध्ये रोख भरणा होतो. अशा ४ ते ६ हजार एटीएमवर सुट्टीदरम्यान भार येण्याची शक्यता आहे.
मंठा येथे किरकोड कारनावरुण एका इसमाला चाकु मारून जख्मी केले.
(मराठवाडा न्यूज़ ब्यूरो)
मंठा प्रतिनिधी;मोसीन कुरेशी,मंठा तालुक्यातील डॉ.सरताज कॉलनी परिसरात काही किरकोड करणावरूण फिर्यादी शेख रब्बानी या इसमाचा चाकु मारून खंभिर जख्मी केले.आरोपी शेख सादेक व त्याचा मुलगा शेख आवेज या आरोपीच्या नावे मंठा पोलिस ठान्यात गुन्हा नोंद करण्यात आला.पुढील तपशील अशी की फिर्यादि रब्बानी शेख बुढन रा.डॉ.सरताज कॉलनी मंठा आरोपी शेख सादेक ताहेर व त्याचा मुलगा शेख आवेज रा.डॉ.सरताज कॉलनी मंठा हे आपल्या राहत्या मोहल्यामध्ये रात्रि 9 वाजता लग्नामध्ये आले असतांना आरोपी व फिर्यादि यांच्या सोबत काही किरकोड करनावरुण भांडण झाले.यातील आरोपी शेख सादेख व त्याचा मुलगा शेख आवेज यांनी संगमत करुण फिर्यादि शेख रब्बानी यांच्या घरा समोर येऊन नातेवाईकाला शिविगाळ करुण फिर्यादि शेख रब्बानी याला आरोपी क्र 1 शेख सादेक यांनी गचंडी धरली व आरोपी क्र 2 शेख आवेज यांनी शेख रब्बानी याच्या उजव्या बाजूस पोटात चाक़ू मारून खंभिर केले.व जीवे मारण्याचा पर्यत्न केला म्हणून आरोपीवर कलम 307 अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला पुढील तपास पोलिस निरीक्षक त्रिभवन साहेब करत आहे.
Tuesday, 27 March 2018
मोदी सरकार विरोधात मकपचाही अविश्वास ठराव.
नवी दिल्ली :(मराठवाडा न्यूज़ ब्यूरो) वायएसआर काँग्रेस, तेलगू देसम काँग्रेस यांच्यापाठोपाठ , माक्र्सवादी कम्युनिस्ट पक्षानेही मोदी सरकारविरोधात अविश्वासाचा ठराव सादर केला आहे. पक्षाचे लोकसभेतील नेते पी. करुणाकरन यांनी अविश्वासाच्या ठरावाची नोटीस सोमवारी लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन यांच्याकडे सादर केली. लोकसभेच्या मंगळवारच्या कामकाजात या अवश्वासाच्या ठरावाचा समावेश करण्यात यावा, अशी विनंतीही त्यांनी लोकसभाध्यक्षांना केली आहे.
Monday, 26 March 2018
बीड जिल्ह्यातील विकासकामांबाबत पालकमंत्री पंकजा मुंडेयांची दूरदर्शनवर उद्या मुलाखत
मुंबई, दि.26: (मराठवाडा न्यूज़)माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित 'जय महाराष्ट्र' कार्यक्रमात. "#बीड_जिल्ह्याची_विकासाकडे_वाटचाल" या विषयावर ग्रामविकास, महिला व बालकल्याण मंत्री तथा बीड जिल्हा पालकमंत्री पंकजा मुंडे यांची विशेष मुलाखत घेण्यात आली आहे. ही मुलाखत उद्या मंगळवार दि. 27 मार्च रोजी दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवरून संध्याकाळी 7.30 ते 8.00 या वेळेत प्रसारीत होणार आहे. निवेदिका रुपलक्ष्मी चौगुले-शिंदे यांनी ही मुलाखत घेतली आहे. बीड जिल्ह्याचा सर्वांगीण विकास करण्यासाठी अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले आहेत. यामध्ये बीड जिल्ह्यातील रेल्वे विकास प्रकल्प, रस्ते विकासाला गती, पर्यटन विकास, स्वच्छ भारत अभियान, बीड जिल्ह्यातील तीर्थक्षेत्रचा विकास तसेच जिल्हापरिषदेच्या माध्यमातून राबवण्यात आलेले नाविन्यपूर्ण उपक्रम याबाबत पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी 'जय महाराष्ट्र' या कार्यक्रमात माहिती दिली आहे.
चेंडूशि छेडछाड प्रकरण:टीम पेन ऑस्ट्रेलियाचा हंगामी कर्णधार, स्मिथ, वॉर्नरची हकालपट्टी
देश विदेश
दूर करण्याची मागनी होत होता. सि.ए प्रमुख जेम्स सदरलॅण्ड यांनी सांगितले की,स्टिव्ह स्मिथ आणि डेविड वॉर्नरशी चर्चा करून त्यांना पदांवरून दूर करण्यात आले आहे. टीम पेन हा संघाचा काळजीवाहू कर्णधार असेल’ त्यांनी सांगितले की,‘या कसोटी सामन्यात पुढे जायला हवे आम्ही तातडीने चौकशी करू, त्यासाठी वेळेची गरज आहे.’ सदरलॅण्ड पुढे म्हणाले की, ‘टीम पेनच्या नेतृत्वातवॉर्नर आणि स्मिथ खेळतील’ सीए प्रमुखाना सांगितले की, ‘आमच्याप्रमाणेच सर्व ऑस्ट्रेलियन नागरिक उत्तर मागत आहेत. आम्ही चौकशीतील तथ्य सवासमोर मांडु
Saturday, 24 March 2018
संपूर्ण महाराष्ट्रात प्लास्टिक व थर्माकोल बंदीची अधिसूचना लागू
मुंबई दी.24 (मराठवाडा न्यूज़ ब्यूरो)संपूर्ण महाराष्ट्रात प्लास्टिक व थर्माकोल बंदी बाबतची अधिसूचना लागू केल्याची माहिती आज पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी मंत्रालयात दिली.कदम यांनी सांगितले की, राज्यातून १८०० टन प्लास्टिक कचरा रोज निर्माण होतो. लाखो टन कचरा रस्त्याच्या आजुबाजूला दिसतो. त्यामुळे मानवी आरोग्यावर परिणाम होत आहे. श्वसनाचे, कॅन्सरसारखे आजार होत आहेत. लग्न आणि महत्त्वाच्या कार्यक्रमात सजावटीसाठी वापरल्या जाणाऱ्या थर्माकोलवर बंदी आहे. छोट्या पिण्याच्या पाणी बॉटलवर पूर्ण बंदी असून मोठ्या बॉटल बंदीसाठी तीन महिन्यांचा अवधी दिला आहे.
ज्यांच्याकडे थर्माकोल आणि प्लास्टिकच्या वस्तुंचा साठा आहे त्यांनी मागणी केल्यास काही कालावधी वाढवून देण्यात येणार आहे. या उद्योगात काम करणाऱ्या हजारो कामगारांचाही सहानुभूतीपूर्वक विचार करण्यात येणार असून त्यांचाही रोजगाराचा प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न करण्यात येईल.प्लास्टिक कॅरीबॅगला पर्याय देण्याबाबत सांगताना श्री.कदम म्हणाले, महिला बचतगटांनी कापडी पिशव्यांचे उत्पादन सुरु केले आहे. त्यांना पाच कोटी रुपये देण्यात आले आहेत. लवकरच कापडी पिशव्या बाजारात येणार आहेत. नाविण्यपूर्ण योजनेतून प्रत्येक पालकमंत्र्यांनी काही निधी कापडी पिशवी बनविण्यासाठी बचतगटांना देण्याबाबत सांगितले आहे.प्लास्टिक व थर्माकोल बंदीबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे, युवानेते आदित्य ठाकरे, श्रीमती अमृता फडणवीस, अभिनेत्री जुही चावला यांच्यासह समाजाच्या विविध स्तरातील व्यक्तींनी, पर्यावरण क्षेत्रात काम करणाऱ्या संस्थांनी या निर्णयाचे स्वागत करुन सहकार्य दिल्याबद्दल कदम यांनी आभार मानले.
लालू प्रसाद यांना 7 वर्षाची कारावास
नवी दिल्ली दी.24;(मराठवाडा न्यूज़ ब्यूरो)चारा घोटाळाच्या चौथ्या प्रकरणात ही दोषी ठरविण्यात आलेल्या राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालु प्रसाद यादव यांना 7 वर्षाच्या कारावासाची शिक्षा सुनवान्यात आली आहे.शिवाय,30 लाख रूपयेचा दंड देखील ठोठवण्यात आला आहे.चारा घोटाळयाशी संबंधित चार प्रकारनात मिळून लालु प्रसाद यादव यांना 20 वर्ष 6 महिन्याची शिक्षा झाली आहे लालू प्रसाद यादव यांना सोमवारी (19 मार्च )राची न्यायल्याने चारा घोटाळयाच्या चौथ्या प्रकरणात दोषी ठरलेले होते.या सुनवानी दरमियान 12 जणांनी दोषी ठरविण्यात आले होते.तर 19 जणांची निर्दोष मुक्तता करण्यात आली होती.
शिक्षण वाचवा, विनोद तावडेंना हटवा'
दी.22 कोल्हापूर : (मराठवाडा न्यूज़ ब्यूरो).राजीनामा द्या, राजीनामा द्या; विनोद ताबडे राजीनामा द्या', शिक्षण वाचवा, विनोद तावडे, नंदकुमार यांना हटवा’ अशा घोषणा देत सर्वसामान्यांचे शिक्षण शुक्रवारी कोल्हापूरकर रस्त्यावर उतरले. रखरखत्या उन्हामध्ये विद्यार्थी, पालक, शिक्षकांनी आक्रमक भूमिका घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयावर महामोर्चा काढला. याद्वारे त्यांनी ‘सर्वसामान्यांच्या शाळा बंद कराल तर, जशास तसे उत्तर देऊ,’ असे आव्हान राज्य सरकारला दिले. महामोर्चाचे नेतृत्व ज्येष्ठ विचारवंत प्रा. डॉ. एन. डी. पाटील, ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ डी. बी. पाटील, महापौर स्वाती यवलुजे
यांनी केले. शासनाने राज्यातील शाळा बंद करून त्या कॉपरेट कंपन्यांना चालविण्यास देण्याचा निर्णय घेतला आहे त्यामुळे सर्वसामान्यांची मुले शिक्षणापासून वंचित राहणार आहेत. शासनाच्या या धोरणाविरोधात शिक्षण वाचवा नागरी कृती समितीने
गेल्या दोन महिन्यांपासून जनआंदोलन सुरु केले आहे.यातील एक टप्पा । म्हणून शुक्रवारी कृती समिती, कोल्हापूर जिल्हा शैक्षणिक व्यासपीठ जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघातर्फ महामोर्चा काढण्यात आला. जिल्ह्यातील प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा बंद ठेवून । विद्यार्थी, शिक्षक, संस्थाचालकांसह पालक या मोर्चात सहभागी झाले। दुपारी पावणेचाराच्या सुमारास गांधी । मैदानातून महामोर्चाला सुरुवात झाली. मोर्चाच्या अग्रभागी महिला, । विद्यार्थिनी होत्या. रखरखत्या उन्हामध्ये शिक्षणमंत्री, शिक्षण विभागाचे । सचिव, सरकारच्या निषेधार्थ आणि मागण्यांबाबतच्या परिसर घोषणान दुमदुमून गेला होता.
Friday, 23 March 2018
मानवत तालुक्यातील मानोली येथे मोबाईल बँटरी चार्जीग करत असताना स्फोट
दि.२२.(मराठवाडा न्यूज़ ब्यूरो) मानवत तालुक्यातील मानोली येथील सोमेश्वर अनंतराव तळेकर वय १७ हा युवक आपल्या राहत्या घरी मोबाईल ची बँटरी खेकडा चार्जीग ला लावुन चार्जीग करत असताना मोबाईल चा स्फोट होऊन यात ह्या युवकाच्या हातास गंभीर दुखापत झाल्याची घटना दि.२२ मार्चरोजी दुपारी एक वाजता मानोली येथे घडली.या विषयी अधिक माहिती अशी की, सोमेश्वर अनंतराव तळेकर ११ वित शिकणारा के.के.एम.कॉलेजचा विद्यार्थि हा युवक आपल्या घरात मोबाईल ची बँटरी खेकडा चार्जीग ला लावुन बँटरी चार्जीग करत असताना अचानकपणे मोठा स्फोट होउन या युवकाच्या हाताला व बोटाला गंभीर दुखापत झाली यामुळे त्याला मानवत येथील डॉ.दगडु यांच्या खाजगी दवाखान्यात उपचारासाठी आणले होते यावेळी परभणी येथील डॉ .के एस महाघडे व
डॉ .पाचलेगावकर यांनी युवकाच्या बोटाची शस्त्रक्रिया केली डॉकटरांनी अधिक उपचार करुन युवकाचे उजव्या हाताचे तीन बोटाचे कांडे अॉपरेशन करुन काढण्यात आले आहे व सध्या युवकाची तब्येत बरी असुन डॉ.दगडु यांच्या दवाखान्यात त्याचे उपचार सुरु आहे.
मंठा येथे बंदीनंतरही लाखोंच्या गुटख्याची विक्री.... खरेच बंदी की केवळ खेळखंडोबा ; अन्न व औषध प्रशासनाने दुर्लक्ष....
मंठा प्रतिनिधी : ताणतणावात संघर्षरत तरुणपिढी, सततच्या नापिकीमुळे त्रस्त शेतकरी, व्यवसायाचा ताण घेऊन संपूर्ण दिवस घराबाहेर घालविणारे व्यावसायिक, वाढती बेरोजगारी आणि स्पर्धेच्या युगात आव्हानं पेलणारे नोकरवर्ग झपाट्याने व्यसनाच्या आधीन जात आहेत. सुगंधित तंबाखूवर बंदी असतानाही मंठा शहरात दररोज लाखोंचा सुपारीचा चोळुन गुटखा ( खर्रा ) फस्त केला जात आहे. सिगारेट , गुटखा व इतर तंबाखूजन्य पदार्थाचा खप वेगळाच.नागरिकांवर पडलेल्या तंबाखूजन्य पदार्थांचा हा विळखा निश्चितच गंभीर आहे. मंठा शहराची लोकसंख्येच्या तुलनेत यातील ५० टक्के लोक तंबाखूजन्य पदार्थांच्या आहारी गेले आहेत. धक्कादायक बाब अशी की यातील १० टक्के सख्या महिलांची आहे. शहरातील मुख्य रस्त्यावर व गल्लीबोळात जवळपास शंभरच्या पुढे पानटपर्या आहेत. यातून नियमित तंबाखूजन्य पदार्थांची विक्री होते. याशिवाय किराणा दुकानामधूनही हे पदार्थ विकले जातात, अशी माहिती आहे. यातील काही पानटपऱ्यांमधून दररोज २०० ते ३०० सुपारीचा चोळून गुटखा ( खर्रे ) विकले जात असल्याचे दिसुन येते. गल्लीबोळातील पानटपऱ्यांमधून खºर्यांचा खप होत नसला तरी गुटखा विकला जातो. या माहितीवरून सरासरी १०० खर्रे एका पानटपरीमधून दररोज विकले जात आहे. एका खऱ्य ची किमत १० ते २० रुपये, याप्रमाणे पानटपरीमधून दररोज लाखोंचा खर्रा खाऊन थुंकला जात आहे. उल्लेखनीय म्हणजे, अगदी १३ वर्षांचे मिसरुड आलेले, न आलेले मुलेही या व्यसनात आकंठ गुरफटले आहेत. चॉकलेट, बिस्कीट व फळे खायच्या वयात ही मुले चक्क गुटखा (खर्रा) चघळताना दिसतात. दर एक तासात एक खर्रा फस्त करणार्यांचा हा उपक्रम रात्री उशिरापर्यंत सुरूच असतो. विशेष म्हणजे, शासनाने सुगंधित तंबाखू विक्रीवर बंदी घातली आहे.अन्न-औषध प्रशासन विभागाला कारवाई अधिकार दिले आहे. असे असले तरी सुगंधित तंबाखू व त्याचे गुटखा ( खर्रे )सर्रास विकले जात आहे. त्यामुळे कर्करोगाचे प्रमाण जैसे थेच आहे.आरोग्य धोकादायक वळणावर." आरोग्य धोकादायक वळणावर असुन प्रदूषणाचा सरळसरळ परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर पडत आहे. आता तरुणांपासून वयोवृध्द व महिलांपर्र्यत तंबाखूजन्य पदार्थाचा विळखा पोहचल्याने नागरिकांचे आरोग्य पुन्हा धोक्यात आले आहे.. बंदीचा केवळ फुगाच. " शासनाने सुगंधित तंबाखूवर बंदी घातली आहे.याची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी अन्न व औषध प्रशासन विभागाला दिली आहे. मात्र अगदी डोळ्यादेखत खुलेआम सुगंधित तंबाखूची विक्री पानटपऱ्यांमधून केली जात असतानाही हा विभाग आपल्याच कार्यालयात अडकून पडला आहे. त्यामुळे शासनाने घातलेल्या बंदीचा कोणताही उपयोग झाला नसल्याचे दिसून येते. पालकांचे दुर्लक्षही कारणीभूत." अलिकडे मुलगा अगदी लहानवयातच गंमत म्हणून गुटखा ( खर्रा ) खायला लागतो. कधी सिगारेटही ओढतो. पाल्यांचे हे कृत्य प्रत्येक वेळी घराबाहेरच होत असतात असे नाही. घरीदेखील गुटखा (खर्याचा) पालकांना वास येतोच. मात्र याकडे पालक दुर्लक्ष करतात. काही जण याबाबत विचारणा करतातही; मात्र बाब गंभीरतेने घेतली जात नाही. पुढे गंमत म्हणून केलेले हे व्यसन मुलांना व्यसनाधीन करून टाकते.... ******** कायदा होणार कडक.... गुटखाबंदीबाबत अन्न व औषध प्रशासनमंत्री गिरीश बापट यांनी काही दिवसांपूर्वी घोषणा केली होती. यात गुटखाबंदीचा कायदा आणखी कडक केला जाईल, असे सांगितले होते. यासोबतच सुगंधी सुपारी, तंबाखू यांचे मिश्रम म्हणजे खर्याला गुटखाबंदीचे नियम लागू होतील, असे म्हटले होते. नियमाचे उल्लंघन करणार्यांवर मकोका अंतर्गत कारवाई केली जाईल, असेही स्पष्ट केले होते. याबाबत कठोर कायदा झाल्यानंतर त्याची तरी अंमलबजावणी गांभीर्याने व्हावी, अशी अपेक्षा आहे.
अलिकडच्या काळात व्यसनाधिनतेचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे.ही गंभीर बाब असुन मुखरोग व कर्करोगाचेही प्रमाण चांगलेच वाढले आहे. अशा परिस्थिती मुळेच शासनाने गुटखा व खर्यावर बंदी घातली आहे.याची गांभीर्याने अंमलबजावणी होणे गरजेचे आहे. तरूणाईनेही व्यसनाच्या आहारी न जाता सुगंधित तंबाखू, खर्रा, गुटखा यापासून दूर राहिले पाहिजे.तंबाखू मध्ये निकोटीन नावाचे केमिकल असते , त्यामुळे शरीराला घातक असुन कॅन्सर होण्याची शक्यता असते. त्यामुळे या व्यवसना पासुन दुर राहिले पाहिजे.... डाॅ.प्रताप चाटसे , निवासी वैद्यकीय अधिकारी , ग्रामीण रूग्णालय , मंठा.
तंबाखूजन्य पदार्थावर बंदी आहे.विक्री होत असल्यास कारवाई करण्यात येईल.तसेच लवकरच मोहीम हाती घेण्यात येणार आहे. निखिल कुलकर्णी ,अन्नसुरक्षा अधिकारी , जालना
Thursday, 22 March 2018
पाणी टंचाई, जलयुक्त शिवार व गौण खनिज प्रकरणी जिल्हा प्रशासनाची पालकमंत्री मा.ना.बबनराव लोणीकरांनी मुंबईत घेतली झाडझडती
दि.21 (मुंबई) : (मराठवाडा न्यूज़ ब्यूरो)जालना जिल्हा प्रशासनाची आज रोजी बैठक मा.पालकमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालय येथे पार पडली. या बैठकीत जिल्हयाचे पालकमंत्री मा.ना.बबनराव लोणीकर यांनी जिल्हा प्रशासनाची चांगलीच झाडझडती घेतली. जिल्हयातील पाणी टंचाईबाबत आज बोलाविलेल्या बैठकीत जिल्हा प्रशासन व जिल्हा परिषद, कृषी विभाग यांची चांगलीच कान उघडणी मा.लोणीकरांनी केली. उन्हाळयाची चाहुल सुरु झाली असून जिल्हयातून ठिकठिकाणी पाणी टंचाईचे चटके जाणवू लागले असल्याने जिल्हा प्रशासनाची काय तयारी आहे याचा आढावा बैठकीत घेण्यात आला. जालना जिल्हयाचा यामध्ये तालुकानिहाय आढावा घेण्यात आला. यामध्ये येणाऱ्या उन्हाळी परिस्थितीमध्ये पाणी टंचाई वर मात करण्यासाठी *शासनाच्या सर्व उपाययोजनांवर मार्च अखेर मान्यता देण्याचे मा.पालकमंत्र्यांनी आदेश दिले*. तसेच मुख्यमंत्री पेयजल योजनेतील सर्व प्रलंबित योजना या एका महिन्यात सुरु करण्याचे आदेश देखील देण्यात आले. या बैठकीत श्री.संतोष दानवे यांनी जाफ्राबाद व भोकरदन तालुक्यामध्ये सरासरी एवढा पाऊस झालेला असूनही जमिनीत पाण्याचा उपसा जास्त असल्याने पाणी टंचाई भासणार असल्याचे निदर्शनास आणून दिले व त्यामुळे तालुक्यातील सर्व साठवण तलाव, मध्यम तलावातील पाणी हे पिण्यासाठी राखून ठेवणे आवश्यक असल्याने मोटारीद्वारे होत असलेला पाणी उपसा तातडीने बंद करण्यात यावा असे सुचविले. यावर *मा.लोणीकर यांनी तहसिलदार व प्रांत अधिकारी यांना तात्काळ आदेशित करुन अशा प्रकारचा अवैध पाणी उपसा थांबविण्याचे आदेश प्रशासनास दिले*. त्यानंतर आमदार श्री.नारायण कुचे यांनी देखील जिल्हा परिषदेमध्ये टंचाई आराखडा तयार करताना जिल्हा परिषदेमध्ये भेदभाव केला जातो असे मा.लोणीकरांच्या निदर्शनास आणून दिले. त्यावर *मा.पालकमंत्री यांनी टंचाईच्या कामात असा कोणताही भेदभाव न करता आवश्यकतेप्रमाणे सर्व तालुक्यामध्ये टंचाईच्या सर्व उपाययोजना करण्याचे आदेश मा.लोणीकरांनी दिले*. राजुर येथील पाणी पुरवठा सद्यस्थितीमध्ये बिकट झाला असून त्यासाठी कि.मी.ची नवीन पाईपलाईन ही मंजूर करण्याविषयी मा.जिल्हाधिकारी यांनी परिस्थिती मा.लोणीकरांच्या निदर्शनास आणून दिली असता मा.लोणीकरांनी सांगितले की, राजुर हे जिल्हयाचे श्रध्दास्थानाचे ठिकाण असून या ठिकाणी दररोज ५० हजार भाविक दर्शनासाठी येत असतात. त्यामुळे या ठिकाणी पाण्याची कोणतीही गैरसोय होणार नाही हे पाहणे आवश्यक असल्याने या ठिकाणी जरी तातडीच्या पाणी पुरवठा दुरुस्तीमध्ये ५ कि.मी.चे निकष असले तरीही खास बाब म्हणून राजूरसाठी ९ कि.मी.ची नवीन पाईपलाईन मंजूर करण्यात येईल. परतूर तालुक्यामधील देखील टंचाईमधील गावांना पाणी पुरवठा करण्यासाठी आलेल्या निविदेला महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या दि. १९ रोजी झालेल्या बैठकीत मंजूरी देण्यात आल्याचे महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने निदर्शनास आणून दिले. त्यानंतर जिल्हा परिषदेकडे प्रलंबित असलेल्या योजनांबाबत आढावा घेतला असता असे निदर्शनास आले की, ब-याच योजना या प्रलंबित असून त्यामध्ये विलंब होत आहे. त्यामुळे मा.लोणीकरांनी मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती नीमा अरोरा यांना सक्त सूचना देत या सर्व योजना एका महिन्याच्या आत सुरु करण्यात याव्यात असा आदेश दिला. तसेच राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजनाचे अंतर्गत प्रलंबित योजनांना लागणारा २५ कोटीचा निधी हा तात्काळ उपलब्ध करुन देऊन या योजना देखील सहा महिन्यात पूर्ण करण्यात याव्यात असे आदेश देण्यात आले. यानंतर जिल्हा परिषदेने त्यांचेकडील बेसलाईन सर्वेच्या पुढे असणारी ओडीएफ ची कामे देखील लवकरात लवकर करावीत अशा सूचना देण्यात आल्या. यानंतर कृषी विभागाने जलयुक्त शिवार योजनेमध्ये झालेल्या प्रगतीबाबत अहवाल सादर केला. यामध्ये सन २०१६-१७ मधील एकूण १८६ गावांमध्ये ही योजना राबविण्यात आली असून एकूण ४६८०कामांपैकी ३१३५ कामे पूर्ण करण्यात आली असून ६६% कामे झाली असल्याचे सांगितले. सन २०१७-१८ साठी एकूण रु.९३.४८ कोटीचा आराखडा तयार करण्यात आला असून यामध्ये एकूण २५५४ कामे प्रस्तावित करण्यात आली आहेत. त्यापैकी ५१५ कामे पूर्ण झाली असून इतर कामे पुढील कालावधीमध्ये पूर्ण करण्याचे निर्देश मा.लोणीकरांनी दिले. यापुढे झालेल्या गौण खनिज बाबत जिल्हयातील पोलीस प्रशासनावर तीव्र नाराजी व्यक्त करीत मा.लोणीकर यांनी पोलिसांच्या कार्यपध्दतीबाबत पोलीस प्रशासनाची चांगलीच कानउघडणी केली. गौण खनिज प्रकरणी पोलीस प्रशासनाने आपली छबी सुधारावी व अवैध कामे करणाऱ्यांवर सक्तीने कार्यवाही करण्याच्या सूचना प्रशासनास दिल्या.
