( मुस्लिम हेल्प ऍक्टिव्हिस्ट फोरमने केले यारॅलीचे आयोजन )
मोसीन कुरेशी
मंठा प्रतिनिधी,शहरातील सामाजिक संघटना मुस्लिम मुस्लिम हेल्प ऍक्टिसिस्ट फोरम च्या वतीने अमृत महोत्सव निमित्त देशप्रेम वाढवण्याच्या हेतूने तसेच स्वतंत्रवीर शाहिदांच्या स्मरणार्थ शहरात भव्य तिरंगा मोटारसायकल रैली चे आयोजन करण्यात आले होते. यारैली ची सुरुवात विश्रांतीगृह पासून सुरू करण्यात आली होती ही तिरंगा मोटारसायकल रैली मंठा फाटा- बस स्टॉप, टिपू सुलतान कॉर्नर- डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा पासून छत्रपती शिवाजी महाराज चौक पर्यंत काढण्यात आली होती.
याप्रसंगी छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये पोलीस निरिक्षक संजयजी देशमुख यांनी स्वतंत्र दिनानिमित्ताने सर्व नागरिकांना शुभेच्या दिल्या तसेच शेवट यारैलीचे समारोप राष्ट्रगीताने करण्यात आले.तिरंगा रॅली यशस्वी करण्यासाठी मुस्लिम हेल्प ऍक्टिव्हिस्ट फोरमचे सदस्य इब्राहीम तांबोली, जावेद अंसारी, इस्माईल राज, साजिद पिंजारी, सोफियान बागवान, जावेद पठाण,मोसीन शेख, कलीम शेख, खालेद पठान, इदरीस कुरेशी, सय्यदरफीक,बदरुद्दीन अत्तार, इरफान पठान, अज्जू राज, सय्यद अज़मत, नवीद सय्यद, जब्बार शेख, मतीन शेख, असलम बागवान यांनी परिश्रम घेतले. व रॅलीला यशस्वी केले.शेवटी रॅलीत सहभाग झालेले सर्व नागरिकांचे इस्माइल राज यांनी आभार मानले .या तिरंगा महा मोटरसायकल रॅलीमध्ये मुस्लिम तरुण मोठ्या संख्यने उपस्थित होते.
No comments:
Post a Comment