Thursday, 29 July 2021

पंकजाताई मुंडे यांच्या वाढदिवसानिमित्त मंठा तालुक्यात विविध उपक्रम.

मोसीन कुरेशी
मंठा प्रतिनिधी:महाराष्ट्राच्या रणरागीणी, संघर्षकन्या लोकनेत्या मा.ना.पंकजाताई गोपिनाथराव मुंडे यांच्या वाढदिवसानिमित्त आज गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठान व वंजारी सेवा संघ मंठा,जालना यांच्या संयुक्त विद्यमाने मंठा येथे पारधी समाजातील लोकांना जीवनावश्यक वस्तू व किराणा किटचे वाटप करण्यात आले. तसेच या परिसरात 42 झाडांचे वृक्षारोपण करण्यात आले.यावेळी भाजप युवा मोर्चा प्रदेश महामंत्री राहुल लोणीकर,भाजप जिल्हा उपाध्यक्ष सुहास मुंडे, वंजारी सेवा संघाचे प्रदेश कार्याध्यक्ष  देवेंद्र बारगजे, मराठवाडा उपाध्यक्ष सिद्धेश्वर केकान, वंजारी सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष  संदिप हुशे, युवक जिल्हाध्यक्ष पिंपळवाडी गावचे सरपंच विकास पालवे, प्राध्यापक ज्ञानेश्वर नागरे, पंचायत समिती सदस्य दत्तराव कांगणे, शिक्षक नेते भगवान जायभाये,वंजारी सेवा संघाचे मंठा तालुका अध्यक्ष पंजाबराव वाघ, घनसावंगी तालुकाध्यक्ष कृष्णा वाघ,कैलास ऊबाळे, मुन्ना विरकर,विनोद गडदे,राजीव हजारे, गजानन वायाळ,अमोल सोनटक्के,संजय भवर, डॉ. गोपाळ तुपकर,अविनाश लोमटे, सुनील मोरे, नामदेव चव्हाळ, कारभारी ढाकणे,डी. डी.चव्हाण,रामेश्वर मुसळे,सतीश राठोड यांच्यासह परिसरातील अनेक गावचे सरपंच लोकप्रतिनिधी व मुंडे कुटुंबीयांवर प्रेम करणारे नागरिक उपस्थित होते.

No comments:

Post a Comment