200

Followers

Thursday, 29 July 2021

पंकजाताई मुंडे यांच्या वाढदिवसानिमित्त मंठा तालुक्यात विविध उपक्रम.

मोसीन कुरेशी
मंठा प्रतिनिधी:महाराष्ट्राच्या रणरागीणी, संघर्षकन्या लोकनेत्या मा.ना.पंकजाताई गोपिनाथराव मुंडे यांच्या वाढदिवसानिमित्त आज गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठान व वंजारी सेवा संघ मंठा,जालना यांच्या संयुक्त विद्यमाने मंठा येथे पारधी समाजातील लोकांना जीवनावश्यक वस्तू व किराणा किटचे वाटप करण्यात आले. तसेच या परिसरात 42 झाडांचे वृक्षारोपण करण्यात आले.यावेळी भाजप युवा मोर्चा प्रदेश महामंत्री राहुल लोणीकर,भाजप जिल्हा उपाध्यक्ष सुहास मुंडे, वंजारी सेवा संघाचे प्रदेश कार्याध्यक्ष  देवेंद्र बारगजे, मराठवाडा उपाध्यक्ष सिद्धेश्वर केकान, वंजारी सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष  संदिप हुशे, युवक जिल्हाध्यक्ष पिंपळवाडी गावचे सरपंच विकास पालवे, प्राध्यापक ज्ञानेश्वर नागरे, पंचायत समिती सदस्य दत्तराव कांगणे, शिक्षक नेते भगवान जायभाये,वंजारी सेवा संघाचे मंठा तालुका अध्यक्ष पंजाबराव वाघ, घनसावंगी तालुकाध्यक्ष कृष्णा वाघ,कैलास ऊबाळे, मुन्ना विरकर,विनोद गडदे,राजीव हजारे, गजानन वायाळ,अमोल सोनटक्के,संजय भवर, डॉ. गोपाळ तुपकर,अविनाश लोमटे, सुनील मोरे, नामदेव चव्हाळ, कारभारी ढाकणे,डी. डी.चव्हाण,रामेश्वर मुसळे,सतीश राठोड यांच्यासह परिसरातील अनेक गावचे सरपंच लोकप्रतिनिधी व मुंडे कुटुंबीयांवर प्रेम करणारे नागरिक उपस्थित होते.

खासदार इम्तियाज जलील यांची नियुक्ती

मा.लोकसभा अध्यक्ष द्वारा
सांसद Imtiaz Jaleel  साहब को भारत
के मशहूर विश्वविद्यालय
#जामिया_मिलिया_इस्लामिया के
कोर्ट मेंबर नियुक्त होने पर बहुत बहुत मुबारकबाद...!

Sunday, 25 July 2021

माऊली अर्बन को ऑफ क्रेडिट सोसायटी दीपस्तंभ पुरस्काराणे सन्मानित.

मोसीन कुरेशी
मंठा प्रतिनिधी:- तालुक्यातील आग्रगण्य माऊली अर्बन को ऑप क्रेडिट सोसायटी पतसंस्थेला साल सन 2019 - 20 या वर्षातील दीपस्तंभ पुरस्कार (ता.24) शनिवार रोजी शिर्डी येथील कार्यक्रमात देऊन सन्मानित करण्यात आले.माऊली अर्बन पतसंस्थेने महाराष्ट्रातील पतसंस्था चळवळीत दीपस्तंभाप्रमाणे कार्य केले आहे.पतसंस्था चळवळीला चांगली दिशा दर्शवली आहे. या दिशादर्शक कार्याबद्दल मराठवाडा विभागातून दीपस्तंभ पुरस्कार महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशन लि. मुंबई यांच्या वतीने देण्यात आला.हा पुरस्कार सोहळा दीपस्तंभ पुरस्कार संस्थेचे अध्यक्ष काकासाहेब कोयटे, खजिनदार दादाराव तुपकर, सरव्यवस्थापक श्रीमती लवांडे मॅडम यांच्या उपस्थितीत परपडला.हा राज्यस्तरीय पुरस्कार स्वीकारताना संस्थेचे चेअरमन तथा भाजपा तालुकाध्यक्ष सतीशराव निर्वळ,मुरलीधर चौधरी,व्यवस्थापक नंदकिशोर सोमानी,गजानन निर्वळ, अमोल मस्के, कालिदास निर्वळ यांची उपस्थिती होती.
माऊली अर्बन क्रेडिट सोसायटीला दीपस्तंभ पुरस्काराबद्दल माऊली अर्बनचे अध्यक्ष सतीशराव निर्वळ,संचालक व संस्थेचे सभासद व संस्थेतील कर्मचाऱ्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.

Friday, 23 July 2021

प्रधानमंत्री घरकुल आवास योजनाचे वाजले बारा..लाभार्थ्यांना पैसे मिळेना..

पावसाळ्यात संसार आला उघड्यावर..

मंठा प्रतिनिधी: सर्वसामान्य नागरिकांना घरांचे स्वप्न दाखविणारी प्रधानमंत्री घरकुल आवास योजनाचे मंठा शहरात बारा वाजले असुन एक वर्ष उलटून गेल्याने ही अर्धे हप्ते न मिळण्याने शहरातील नागरिकांचा ऐन पावसाळ्यात संसार उघड्यावर आला आहे.कोरोना महामारी मध्ये अगोदरच कामे नसल्याने नागरिक अडचणीत आले आहे.घराची परिस्थिती बिकट झालेली आहे. प्रधानमंत्री घरकुल आवास योजनेचे निधीच्या आशेवर लाभार्थ्यांनी किरायाच्या घरात राहून घरकुलाचे कामाला सुरुवात केली.आपले राहते घर उघडे केले.घराचे बांधकाम पूर्णत्वास नेले पण घरकुलाचे हफ्ते मिळत नसल्याने घरकुलाचे बांधकाम थांबले आहे.एकीकडे घर बांधकामाची चिंता तर दुसरीकडे घर भाड्याचा प्रश्न उपस्थित झालेला आहे.अनेक लाभार्थ्यांनी नगरपंचायत मध्ये विचारणा केल्यानेही समाधानकारक उत्तर मिळत नसल्याने तीव्र रोष व्यक्त होत आहे. मंठा शहरात प्रधानमंत्री घरकुल आवास योजनाचे पंधराशे घरकुल मंजूर झाले होते.दरम्यान लाभार्थ्यांना पांच टप्प्यात निधी देण्यात येणार होता.या मध्ये 40 हजाराचा पहिला टप्पा 413 लाभार्थ्यांना देण्यात आलेला आहे. दुसरा 40 हजारांचा टप्पा 319 लाभार्थ्यांना देण्यात आलेला आहे. तर तिसरा टप्पा 20 हजाराचा 181 लाभार्थ्यांना देण्यात आलेला आहे. या योजनेमध्ये लाभार्थ्यांना राज्य शासनाकडून एक लाख रुपये तर केंद्र सरकारकडून दीड लाख रुपये मिळणार होते पण केंद्र सरकारचा निधी अद्याप मिळालेला नसल्याने लाभार्थ्यांना तीनच टप्पे देण्यात आलेले आहे. अशी माहिती घरकुल प्रकल्प अधिकारी मनोज गिरी यांनी सांगितले.

Wednesday, 21 July 2021

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाची बैठक प्रतिनिधी यांना ओळखपत्राचे वाटप....

मोसीन कुरेशी
मंठा प्रतिनिधी: महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाची बैठक दि.२० जुलै मंगळवार रोजी मंठा शासकीय विश्रामगृह येथे पार पडली याप्रसंगी महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे जालना जिल्हाध्यक्ष डिगंबर गुजर सर यांच्या हस्ते मंठा पत्रकार संघ प्रतिनिधी यांना संघटनांची ओळखपत्र,माक्स दिनदर्शिका यांचे वाटप करण्यात आले. यावेळी जिल्हाध्यक्षांनी पत्रकारांचे विमा तसेच आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी विविध मुद्द्यावर चर्चा केली.याप्रसंगी मंठा पत्रकार संघ तालुकाध्यक्ष बालाजी कुलकर्णी,मराठवाडा विभागीय कार्याध्यक्ष पंडित नाना बोराडे,जालना कार्यकारणी सदस्य संतोषजी दायमा सर,आशीष तिवारी,मोसीन कुरेशी,रमेश जोशी,अमोल राऊत, अरुण राठोड,लखन जैस्वाल,जगदीश राठोड शेळके सर,मंजुषा काळे मॅडम मानसिंह बोराडे यांची उपस्थिती होती...

Sunday, 4 July 2021

पालकमंत्री राजेश टोपे यांना शासकीय समित्यांवर नेमणूक करताना मुस्लिम समाजाचा विसर पडला होता का ?

मोसीन कुरेशी
मंठा प्रतिनिधी:एमआईएमचे जालना जिल्हाध्यक्ष माजेद भय्याजी यांनी ३ जुलै शनिवार रोजी मंठा-परतुर तालुक्याचा दौरा केला.याप्रसंगी मंठा एमआईएम पदअधिकाऱ्यांसोबत शासकीय विश्रामगृह येथे बैठक घेतली.यावेळी जिल्हाध्यक्ष माजेद भैय्याजी,निसार पटेल,रियाज अहेमद,इस्माईल भाई,अनवरभाई,इम्रान चौधरी यांचा सत्कार तालुक्यातील पदाधिकाऱ्यांनी केला. तसेच मंठा तालुक्यातील एमआईएम पदाधिकाऱ्यांनी विविध प्रश्न जिल्हाध्यक्ष समोर मांडले याप्रसंगी जिल्हाध्यक्ष माजेद भैयाजी यांनि बोलताना सांगितले की पालकमंत्री राजेश टोपे साहेबांना मंठा तालुक्यात शासकीय समित्यांवर नेमणूक करताना मुस्लिम समाजाचा विसर पडला होता का असा प्रश्न जिल्हाध्यक्ष यांनी उपस्थित केला. याप्रसंगी एमआईएमचे तालुकाध्यक्ष शेख एजाज भाई ,ताहेर बागवान,मोसीन कुरेशी,सय्यदअय्यूब ,प्रदीप मोरे, क़ामळे,जुनेद पठान,शेख मुल्ला,शेख अरशद,शेख सलमान,शेख अजहर शेख शोहेब,शेख खाजा,शेख फयाज,सह मोठ्या संख्येने एमआईएम कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.