Thursday, 27 May 2021

ब्रेक द चैन अंतर्गत उद्योगधंदे, बाजारपेठ तसेच दुकांनांचे सिल उघडुन सर्वप्रकारचे व्यवसाय सुरु करण्याची परवानगी देण्याची खासदार इम्तियाज जलील यांची मागणी.

(मराठवाडा न्यूज 44 ब्यूरो)

औरंगाबाद:कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी व्यापारी, दुकानदार, टपरीधारक यांनी आपआपले उद्योगधंदे, बाजारपेठ व दुकाने बंद ठेवुन शासनाने ब्रेक द चैन अंतर्गत दिलेल्या सुचनांचे तंतोतंत पालन करुन सहकार्य करत आहे. दोन महिन्यापासून सर्व व्यापारी व दुकानदार यांनी आपआपली आस्थापने बंद ठेवल्याने ते सध्या आर्थिक अडचणीत सापडलेले असुन शासनस्तरावरुन त्यांना आजतागायत कोणत्याही प्रकारचे आर्थिक पॅकेज किंवा मालमत्ता कर, विज बिल, जिएसटी या सरकारी करांमध्ये सुध्दा सवलत देण्यात आलेली नाही. ब्रेक द चैन अंतर्गत औरंगाबाद शहरात तर जिल्हा प्रशासनाच्या वतीने एक प्रकारे हुकुमशाहीच चालवली जात असल्याचे व्यापारी, दुकानदार व टपरीधारक प्रश्न उपस्थित करत आहे. औरंगाबाद शहरात व्यापारी अथवा दुकानदारांनी नियमांचे उल्लंघन केल्यास त्यांच्यावर औरंगाबाद महानगरपालिका पथक, पोलीस विभागाचे पथक आणि जिल्हाधिकारीकार्यालयाचे पथक अशा वेगवेगळ्या तीन पथकांकडून कार्यवाही केली जात आहे. विशेष म्हणजे तीन्ही पथकांचे आपआपसात समन्वय नसल्याने व्यापारी व दुकानदारांना चालान देवुन संबंधित पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करुन दुकान ही सिल करण्यात येत आहे, हि तर एक प्रकारची हुकुमशाहीच असल्याचे समजते. सदरील उल्लेखित तिन्ही विभागाकडून करण्यात येणारी कायदेशिर व दंडात्मक कार्यवाही म्हणजे व्यापारी व दुकानदारांवर दहशत निर्माण करुन आत्महत्येस प्रवृत्त करणारी आहे. दुकानातील कर्मचाऱ्यांचा पगार, दुकान भाडे, स्वतःचे घर खर्च भागवणे, औषध उपचार खर्च, व्यावसायिक कर्जावरील व्याज त्यातच आता पावसाळा सुरु होतो त्यादृष्टीने दुकानाची रिपेरिंग, साफसफाई, मालाचे व्यवस्थापन व इतर अत्यावश्यक बाबी करणे अत्यंत गरजेचे आहे नसता व्यापारी व दुकानदारांचे कोट्यावधी रुपयांचे आर्थिक नुकसान होण्याची शक्यता नाकारता येत नाही. जे छोटे-छोटे दुकानदार व टपरीचालक आहे त्यांचा तर उदरनिर्वाहाचा प्रश्न गंभीर स्वरुपाचा झालेला आहे. सद्याच्या परिस्थितीमुळे अनेक व्यापारी, दुकानदार, टपरीधारकांमध्ये सरकार विरोधी भावना निर्माण होत असुन त्यांच्यावर करण्यात येणाऱ्या दंडात्मक व कायदेशिर कार्यवाही तसेच कुटुंबाचे उदरनिर्वाह करण्याचे संकट निर्माण झाल्याने त्यांच्या मनात आत्महत्या करण्याचे विचार येत असल्याचे अनेक व्यापारी व दुकानदार बांधवांनी सविलेले आहे.तरी आपणास नम्र विनंती की, औरंगाबाद जिल्ह्यातील व्यापारी, दुकानदार व टपरीधारकबांधवांचा"सहानुभुतीपुर्वक विचार करुन 1 जुन 2021 पासुन सर्व प्रकारचे उद्योगधंदे, बाजारपेठा सुरु करण्याची परवानगी देण्यात त्यावी तसेच जिल्हा प्रशासनाच्या तिन्ही पथकामार्फेत दुकानांना लावण्यात आलेले सिल काढुन व्यवसाय सुरु करण्याची परवानगी देण्याचे आदेश संबंधित अधिकारी व विभाग यांना निर्गमित करुन सहकार्य करण्यात यावे.अशी मागणीचे निवेदन खासदार इम्तियाज जलील यांनी दिले..

No comments:

Post a Comment