Monday, 10 May 2021

मंठ्यात ऑक्सीजन प्लांट उभारण्याची आरोग्य मंत्र्यांची ग्वाही...

रुग्ण हा देवता आहे, त्याची काळजी घेऊन सेवा करा:आरोग्य मंत्री राजेश टोपे

मोसीन कुरेशी
मंठा (प्रतिनिधी):- वैद्यकीय आवश्यकता लक्षात घेऊनयेथील ग्रामीण रुग्णालयासाठी ८० लाख रुपये खर्चाच्या ऑक्सीजन प्लांट तसेच रुग्णालय पूर्णतः स्वयंपूर्ण होण्याच्या दृष्टीने कार्डियाक अॅम्ब्युलन्स उपलब्ध करून दिली जाणार आहे. डॉक्टर्स, परिचारिका आणि इतर सर्व रिक्त पदे येत्या३-४ दिवसात भरली जातील अशी ग्वाही राज्याचे आरोग्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालक मंत्री राजेश टोपे यांनी दिली.रविवार रोजी येथील कोवीड सेंटरला भेट दिल्यानंतर त्यांनी ग्रामीण रुग्णालयातील सुविधा आणि उणिवा बाबत सविस्तर बैठक घेतली. कोवीड सेंटर मधील रुग्णांची आस्थेवाईक चौकशी करून त्यांना औषध उपचार कशाप्रकारे दिला जातो याची माहिती घेतली. यावेळी जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे, आरोग्य उपसंचालक डॉ.स्वप्नील लाळे, उपविभागीय अधिकारी भाऊसाहेब जाधव,जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.अर्चना भोसले, तहसीलदार सुमन मोरे,मुख्याधिकारी सतीश कुलकर्णी,गोपाळराव बोराडे , शिवसेना जिल्हाप्रमुख ए. जे.बोराडे , पंकज बोराडे, भाऊसाहेब गोरे, वैद्यकीय अधीक्षक डॉ.राजेंद्रगायके, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.दीपक लोणे,डॉ.प्रताप चाटसे आदी उपस्थित होते.रुग्णालयाची संपूर्ण पाहणी केल्यानंतर त्यांनी पत्रकारांनाविविध उपाय योजनेबाबत माहिती दिली. हवेतून ऑक्सिजननिर्माण करणारा ८० लाख रुपये खर्चाचा प्लांट येत्या आठदिवसात कार्यान्वित करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.येत्या तीन ते चार दिवसात डॉक्टरचीआणि नर्सची सर्व रिक्त पदे भरणार असल्याची ग्वाही दिली. शिवाय नर्सची आवश्यक पदे स्थानिक पातळीवरून भरण्याच्या सूचना दिल्या.येथील उपजिल्हा रुग्णालयातील रिक्त पदे भरून पूर्ण क्षमतेने रुग्णालय सुरू करण्यासाठी आरोग्य उपसंचालकांना सूचना दिल्या. ४० बेडच्या कोवीड सेंटर साठी किमान पाच डॉक्टर्स आवश्यक असताना केवळ दोन डॉक्टर्स उपलब्ध आहेत. उर्वरित तीन डॉक्टर्स चार दिवसात उपलब्ध करून दिले जातील असे त्यांनी सांगितले. मंठा येथील मॉडेल स्कूलच्या इमारतीमध्ये ५० बेडचे नवीन डेडिकेटेड कोवीडसेंटर सुरू करणार असून त्यासाठी सर्व सुविधा तातडीने उपलब्ध करून देण्याची ग्वाही दिली. अस्थायी स्वरूपात काम करणाऱ्या अनेक वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे थकीत वेतन तातडीने करण्याच्या सूचनाही त्यांनी संबंधितांना केल्या.

No comments:

Post a Comment