Monday, 13 April 2020

दलित समाजाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनीच क्वारंटाइनतुन मुक्त केले...

पोलीस निरीक्षक विलास निकम साहेब

डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 129 वी जयंती निमित्त सोशल डिस्टेंसचे पालन करुण अभिवादन करण्यात आले..

मोसीन कुरेशी
मंठा प्रतिनिधी: देशभरात 14 एप्रिल रोजी विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मिरवणूक मनोरंजन,कार्यक्रम,प्रबोधनी स्पर्धा आदि आयोजित करून मोठ्या आनंदाने भिम जयंती साजरी करण्यात येत पण
देशभरात पसरलेल्या कोरोना विषाणू मुळे देशभरात लॉग डाऊन करण्यात आला त्यामुळे शासनाने सर्व धार्मिक कार्यक्रम घरी राहूनच साजरी करण्याचे आदेश दिले असल्याने आज मंठा शहरात सोशल डिस्टन्स पाळून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले याप्रसंगी मोजक्याच् अनुयायी उपस्थित होते यावेळी पोलीस निरीक्षक विलास निकम यांच्या हस्ते ध्वजारोहन करण्यात आले यावेळी विलास निकम यांनी बोलताना सांगितले की काही वर्षापूर्वी दलित समाजाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनीच क्वारंटाइनतुन मुक्त केले. कोरोनाचे संकट पाहता भीम जयंती घरीच राहून साजरी करा असे आवाहन पोलीस निरीक्षक विलास निकम साहेब यांनी केले. तसेच जयंतीनिमित्त पोलिसांच्या वतीने गरजूंना अन्नधान्य वाटप करण्यात येणार असल्याचे निकम साहेब यांनी सांगितले याप्रसंगी भीमशक्ती चे जिल्हाध्यक्ष प्रकाश अण्णा घुले यांच्यावतीने पत्रकार व पोलीस कर्मचारी यांना माक्स व सॅनिटायझरचे वाटप केले यावेळी पोलीस निरीक्षक विलास निकम, नगरसेवक अरुण वाघमारे, प्रकाश अण्णा घुले, राजेश खंदारे, गणेश वाघमारे , प्रदीप वाघमारे,डॉक्टर प्रताप चाटसे,दीपक लोणे,मोजक्या अनुयायी व पत्रकार बांधवांची उपस्थिती होती.

Friday, 10 April 2020

आरोग्य सेवकांच्या वतीने मौजे जाटखेडा या गावात साबणाचे वाटप....

मोसीन कुरेशी
मंठा प्रतिनिधी:प्राथमिक आरोग्य केंद्र ढोकसाळ अंतर्गत मौजे जाटखेडा या गावात आरोग्य सेवकांच्या स्वखर्चाने गावकऱ्यांना लाईफ बॉय साबणचे वाटप करण्यात आले .. यावेळी आरोग्य शिक्षण देताना सांगितले की संध्याची परिस्थिती कोरोना व्हायरस मुळे गंभीर आहे.मात्र व्यवस्थित पणे काळजी घेतली तर कोणालाही या आजाराची लागण होणार नाही..यासाठी प्रत्येक नागरिकांनी आपल्या आरोग्याची काळजी वैयक्तिक पातळीवर घ्यावी जसे दर तासाला हात स्वच्छ धुवून घेणे..नाकाला व तोडाला रुमाल बाधणे.ज्यांना ही सर्दी खोकला ताप अशी लक्षणे आहेत त्याचे पासून 1 मिटर दुर राहणे गर्दी चे ठिकाणी जायचे टाळवे संध्या कलम 144 लागु आहे. त्या मुळे नागरिकांनी घरीच राहवे.आदी बाबतीत आरोग्य शिक्षण देण्यात आले.तसेच जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. विवेक खातगावकर तालुका आरोग्य अधिकारी डॉ.दिपक लोणे,डॉ अर्चेना पाटील,यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यात व मंठा तालुक्यात प्रत्येक नागरिकांचे आरोग्याची काळजी आरोग्य विभाग घेत आहे.तरी कोणाला सर्दी खोकला ताप.खशात खवखवणे आदी लक्षणे असतील तर तत्काळ आरोग्य विभागाशी संपर्क साधावा असे अवाहन करण्यात आले.यावेळी वैद्यकीय अधिकारी डॉ.अर्चना पाटील,आरोग्य सहाय्यक सतिष निकम,औषध निर्माण अधिकारी गणेशराव बोराडे,आरोग्य सेविका सुनंदा लोखंडे,आशा शोभा झोरे,गावातील सिताराम चिचाणे,विठ्ठल चिचाणे,अंगणवाडी सेविका इदुमती चिचाणे उपस्थित होते.

मंठा तालुक्यात 365 लोकांना होम क्वारंटाइन..

मोसीन कुरेशी
मंठा प्रतिनिधी:आजपर्यंत मंठा तालुक्यात पर जिल्ह्यातील आलेले एकुण लोकसंख्या 6026 असुन या सर्वांची प्राथमिक तपासणी ग्रामीण  रुग्णालय मंठा आणि 4 प्राथमिक आरोग्य केंद्र तसेच 24 उपकेंद्र येथील वैद्यकीय अधिकारी व आरोग्य
कर्मचारी यांचे मार्फत करण्यात आली असून त्या मध्ये 365 जणांना फ्ल्यू ची लक्षणे असणाऱ्यांना प्राथमिक औषध उपचार करून होम क्यारंटाईन केले होते.त्यामध्ये 202 व्यक्ती चा 14 दिवसाचा कालावधी पुर्ण झाला असून ते पुर्णपणे बरे झाले आहेत.उर्वरित 163 व्यक्ती चा 14 दिवसाचा कालावधी येते काही दिवसात संपेल व या सर्व जणाचा दैनंदिन पाठपुरावा आरोग्य कर्मचारी व आशा वर्करचे मार्फत  सुरू असून या सर्वाची तब्येत चांगली आहे.आजपर्यंत एकुण 16 मंठा शहरातील 14 आणि ग्रामीण भागातील 2 व्यक्ती ना जिल्हा सामान्य रुग्णालय जालना येथे  कोरोना संशयित लक्षणे असल्याने तपासणी करण्यासाठी पाठविण्यात आले होते. व त्या मध्ये सर्व 16 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत ..तरी तालुक्यातील सर्व जनतेला आरोग्य विभाग मंठा याचे वतीने आवाहन करण्यात येते की कोणी ही घाबरून जाऊ नये अथवा अफवांना बळी पडू नये .प्रशासनाला व आरोग्य विभागाला सहकार्य करावे तसेच कुठल्याही व्यक्ती ला कोरोना संशयित लक्षणे असल्यास नजीकच्या शासकीय दवाखान्यात दाखवून घ्यावे ..त्या प्रमाणे प्रशासणाने वेळोवेळी दिलेल्या सुचनांचे पालन करावे असे आवाहन तालुका आरोग्य अधिकारी डॉ.दिपक लोणे यांनी केले आहे.

शिवसेना जिल्हाप्रमुख  ए.जे बोराडे यांच्या शहरातील स्वस्त धान्य दुकानांना भेटी...

गोरगरिबांना धान्याचे वितरण व्यवस्थित करा..

मोसीन कुरेशी
मंठा प्रतिनिधी:शिवसेना जिल्हाप्रमुख ए जे बोराडे यांनी आज शुक्रवार ता.10 रोजी शहरातील स्वस्त धान्य दुकानांना भेटी देऊन धान्य वितरण व्यवस्थेची पाहणी केली लॉकडाऊन काळात शासन नियमाप्रमाणे गोरगरिबांना धान्य मिळाले पाहिजे,
स्वस्त धान्याचे व्यवस्थित वितरण करा, सोशल डिस्टन्स पाळा अशा सूचना त्यांनी स्वस्त धान्य दुकानदारांना केल्या. यावेळी त्यांच्यासोबत मंठा अर्बन बँकेचे संचालक अंकुशराव अवचार, बाजार समितीचे माजी सभापती प्रल्हादराव बोराडे, पंचायत समितीचे माजी सभापती संतोष वरकड, माजी सभापती सुरेश सरोदे, शिवसेना तालुकाप्रमुख अजय अवचार, तालुका संघटक तुळशीराम कोहिरे यांची उपस्थिती होती कोरोना या अतिभयानक विषारी संसर्गामुळे संपूर्ण देश व राज्यावर मोठे संकट कोसळले आहे कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढतो आहे हा गंभीर विषय सर्वांनी गांभीर्याने घेतला पाहिजे. मुख्यमंत्री उद्धव साहेब ठाकरे यांच्या आवाहनानुसार स्वस्त धान्य दुकानातून अन्नधान्याची खरेदी करताना प्रत्येकाने सोशल डिस्टन्स पाळणे आवश्यक आहे अशा सूचना जिल्हाप्रमुख श्री बोराडे यांनी रेशनकार्डधारकांना दिल्या शिवसेनेच्या सर्व तालुका प्रमुख विभाग प्रमुख आणि गावागावातील शाखाप्रमुख यांनी आपल्या गावात स्वस्त धान्याचे वितरण व्यवस्थित होते का याची पाहणी करावी असे आवाहन त्यांनी केले.

कोरोना बचावा करिता व्यंकटेश क्लिनिकचा मानवी संदेश..

तू रस्त्यावर आला तर.. मी तुझ्या घरी येणार..!

मोसीन कुरेशी
मंठा प्रतिनीधी : देशासह राज्यात कोरोना विषाणूचा संसर्ग वाढत चालल्याने संचारबंदी आणि लॉकडाऊन करण्यात आले आहे.  मंठा शहरात देखील मोठी दक्षता पाळण्यात येत आहे. यासाठी मंठा नगरपंचायत प्रशासन पोलीस प्रशासन कंबर
कसली आहे. शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक, डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक मुख्यरस्ता संपुर्ण शहर वार्ड आलाउसिंग संदेशाद्वारे पिंजुन काढला जात आहे.प्रशासनाने ला हातभार मदत म्हणुन येथिल  डॉ  प्रवीण मालेगावकर यांचे व्यंकटेश क्लेनिक स्त्यांच्या मधोमध लिहिलेले संदेश बोधक आणि मजेशीर आहे त्यामुळे हा संदेश नागरिकांचे लक्ष वेधून घेत असून, त्यांना अंतर्मुखदेखील करीत आहेत. तू रस्त्यावर आलास तर मी तुझ्या घरी येणार' असा कोरोनाबाबत संदेश रेखाटण्यातांना  आकाश उत्तमराव मोरे हा तरुण युवक कारागीर.

Sunday, 5 April 2020

मंठा शहरात मुंबई येथील जमातसाठी आलेल्या कोरोना संशयित १३ पैकी १३ रुग्णांचे अहवाल निगेटिव्ह

मोसीन कुरेशी
मंठा प्रतिनिधी:मंठा शहरात ३ एप्रिल शुक्रवार  रोजी रात्री उशीरा मंठा शहरातील एकुण १३
व्यक्तीना जिल्हा सामान्य रुग्णालय जालना विलगीकारण कक्षात उपचारसाठी पाठविण्यात आले.होते हे १३ व्यक्ती मुबंई
येथून दी.१६.मार्च रोजी मंठा येथे जमात कार्यक्रमासाठी आले होते.या पैकी सहा व्यक्तीना ताप असल्याणे त्यांचे व त्यांच्या संर्पकातील इतर ७ जनाचे असे एकुण १३ पैकी १३ रुणांचे अहवाल निगेटिव्ह आल्याची माहिती मंठा आरोग्य अधिकारी डॉ.दीपक लोणे साहेब यांनी दिली...तर अजुन एक ग्रामीण भागातील यक्तिला दि. ४ एप्रिल शनिवार रोजी सकाळी जालना येथील शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आले.होते सदरील व्यक्तिचापण अहवाल निगेटिव्हआल्याची माहिती दीपक लोणे साहेब यांनी दिली.तर मुबंई,पुणा अथवा इतर ठिकाणाहुन आलेल्या व्यक्तीची प्राथमिक तपासणी चारही प्रा.आ.केंद्र स्तरावर व ग्रामीण रुग्णालय मंठा येथे करण्यात येत असुन आवश्यकता भासल्यास नियंत्रण कक्षाच्या दूरध्वनी क्रमाकांवर संपर्क साधावा व नागरीकांनी घाबरून न जाता आपल्या घरीच थाबांवे व बाहेरगावाहुन आलेल्या व्यक्तीनी घरातच वेगळे रहावे वारंवार साबनाने हात धुवावे व प्रशासनास सहकार्य करावे असे आवाहन तहसीलदार मॅडम श्रीमती सुमन मोरे यांनी सर्व जनतेस केले आहे.

Wednesday, 1 April 2020

मंठा तालुक्यात कोरोनाचा संशयित रुग्ण सापडला.

नागरिकांनी सावधगिरी पाळावी, घराबाहेर पडणे टाळावे.

मोसीन कुरेशी
मंठा प्रतिनीधी: कोरोना विषाणूचा प्रसार होऊ नये म्हणून देशात शासकीय यंत्रणा तसेच आरोग्य यंत्रणा सज्ज झाली आहे. देशात संचारबंदी लागू झाली आहे. परंतु संचारबंदी असताना देखील नागरिक गांभीर्याने घेत नसल्याचे चित्र दिसत आहे. अनेक नागरिक दवाखाना, औषधी, जीवनावश्यक वस्तू खरेदी आदी कारणे सांगून रस्त्यावर सर्रास फिरताना दिसत आहेत. नागरिकांनो सावध व्हा कोरोना आपल्या घराच्या दारापर्यंत पोहोचला आहे.
कोरोना विषाणूच्या धास्तीने कोणत्याही खेड्यात बाहेरून आलेल्या जवळच्या नातेवाईकांना देखील प्रवेशबंदी केली आहे. मुंबई-पुण्याहून व इतर शहरातून आलेल्याना शेतात दुरून थांबावे लागत आहे. याचे उदाहरण म्हणजे रोहिणा ता. परतूर येथे गुरुवारी ( ता. 19 ) पुण्याहून आलेल्या एका नातेवाईकास गावकऱ्यांनी गावात प्रवेश देण्यास नाकारले. त्यामुळे तो मंठ्या शहरास लागून असलेल्या वांजोळा पुनर्वसन येथे मुक्कामी आला. त्यास सर्दी-खोकला-ताप असल्याने मंठा येथील ग्रामीण रुग्णालयात त्याच्यावर औषध उपचार केले. परंतु त्यात सुधारणा न झाल्याने त्यास मंगळवारी ( ता.  31 ) पुढील उपचाराकरिता जालना येथे पाठवीत असल्याची माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी दीपक लोणे व वैद्यकीय अधीक्षक प्रताप चाटसे यांनी दिली आहे. तसेच तो ज्या घरात मुक्कामी राहिला त्या घरातील सर्वांची वैद्यकीय अधिकारी पथक तपासणी करण्यासाठी येत असल्याची माहिती त्यांनी दिली आहे.