200

Followers

Thursday, 27 February 2020

व्यवहारात मराठी भाषेचा जाणीवपूर्वक वापर म्हणजेच मराठी भाषेचागौरव होय.... प्राचार्य डॉ.भारत खंदारे


मंठा प्रतिनिधी:येथील स्वामी विवेकानंद महाविद्यालात दि.२७ फेब्रुवारी २०२० रोजी'मराठी भाषा गौरव दिन साजरा करण्यात आला.कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.भारत खंदारे यांची उपस्थिती होती तर प्रमुख वक्ते म्हणून प्रा.विनायक काळे.प्रा.सौ.चारुलता पाटील यांची विचारमंचावर
विशेष उपस्थित होती.कार्यक्रमाच्या सुरुवातीला कविवर्य कुसुमाग्रज यांच्या प्रतिमेला मान्यवरांच्या शुभहस्ते पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले नंतर उपस्थित
विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना प्रा.विनायक काळे म्हणाले की, आपली मातृभाषा मराठी ही वैभवशाली भाषा आहे. मराठी भाषेमध्ये दर्जेदार साहित्याची निर्मिती झालेली आहे तेव्हा या आषेचे संवर्धन करण्याची
जबाबदारी प्रत्येक भारतीयांची आहे ..
तर अध्यक्षीय समारोप करताना प्राचार्य डॉ.भारत खंदारे म्हणाले की, भाषा
ही संस्कृती संवार्धानाचे कार्य करते.भाषेच्या माध्यमातून संस्कृतीचा ठेवा एका पिढीकडून दुसऱ्या पिढीपर्यंत हस्तांतारित होतो.आपली मातृभाषा'मराठी' ही अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त करण्यासाठी कुठेच कमी पडत नाही
तेव्हा प्रत्येकाने भाषा जतन करुन दैनंदिन व्यवहारात मराठी भाषेचा जाणीवपूर्वक वापर केला तर खऱ्या अर्थाने तो मराठी भाषेचा गौरव होईल.याप्रसंगी प्रा.सौ.चारुलता पाटील यांचेही समायोचित भाषान झाले.या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा.के.एम.कांबळे यांनी केले.तर कार्यक्रमाचे सूत्र संचालन प्रा.डॉ.रवींद्र गायके यांनी केले. कार्यक्रमास महाविद्याला यीन विद्यार्थी,शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारीयांची बहुसंख्याने उपस्थिती होती.कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थितांचे आभार प्रा.पंढरीनाथ काकडे यांनी मानले .

No comments:

Post a Comment