Wednesday, 21 August 2019

शिवसेना पुरस्कृत जयभवानी गणेश मंडळ मंठाची कार्यकारिणी जाहीर........ ( पूरग्रस्तांना मदत करणे शिवसेनेची बांधिलकी --जिल्हाप्रमुख ए जे बोराडे )

मोसीन कुरेशी
मंठा /प्रतिनिधी :  शिवसेना पुरस्कृत जय भवानी गणेश मंडळाची कार्यकारिणी शिवसेना जिल्हाप्रमुख तथा जयभवानी गणेश मंडळाचे संस्थापक अध्यक्ष ए जे बोराडे  यांच्या मार्गदर्शनाखाली जाहीर करण्यात आली .जयभवानी गणेश मंडळाच्या स्थापनेचे हे 28 वे वर्ष आहे.  दुष्काळ परिस्थिती आणि पूर परिस्थितीमुळे यावर्षी सांस्कृतिक कार्यक्रमांना फाटा देऊन गणेश मंडळाच्या माध्यमातून कोल्हापूर ,सांगली ,सातारा येथील पूरग्रस्तांना मदत करण्यात येणार आहे ,त्यांना मदत करणे ही शिवसेनेची बांधिलकी आहे असे जिल्हाप्रमुख ए जे बोराडे  यांनी कार्यकारिणीच्या बैठकीत मार्गदर्शन करताना सांगितले. शिवसेना मध्यवर्ती कार्यालयात आज 21 रोजी शिवसेना पदाधिकार्‍यांची बैठक पार पडली. यावेळी निवडण्यात आलेली कार्यकारिणी पुढीलप्रमाणे अध्यक्ष - संजय बोराडे , उपाध्यक्ष -महादेव खरात ,दीपक बोराडे, नागेश सराफ ,सरचिटणीस- विलास सराफ, सचिव - कृष्णा हेलसकर, संदीप बोराडे , सहसचिव - किरण सूर्यवंशी, विकास ठोकरे, नानासाहेब बोराडे ,कोषाध्यक्ष - शिवसेना तालुकाप्रमुख अजय अवचार, सहकोषाध्यक्ष नगराध्यक्ष नितीन राठोड, सल्लागार- जिल्हाप्रमुख ए जे बोराडे , मंठा अर्बन बँकेचे संचालक अंकुशराव अवचार, माजी सभापती संतोष वरकड, बाजार समितीचे संचालक प्रल्हादराव बोराडे ,महादेव वाघमारे, श्रीरंग अण्णा खरात, प्रा माणिक थिटे, नगरसेवक प्रदीप बोराडे ,माजी सभापती सुरेश सरोदे, जि प सदस्य संजय राठोड ,पंचायत समिती सदस्य बाबाराव राठोड ,मधुकर काकडे, तुळशीराम कोहीरे ,नगरसेवक बालासाहेब बोराडे , निरज सोमानी ,इलियास कुरेशी, अरुण वाघमारे, उपशहर प्रमुख गजानन बोराडे ,दिगंबर बोराडे ,बेबीताई पावसे, गयाताई  पवार,रुक्मिणीताई घोडके अशी कार्यकारिणी निवडण्यात आली सर्व नूतन कार्यकारिणीचा सत्कार जिल्हाप्रमुख ए जे बोराडे  यांचे हस्ते करण्यात आला

No comments:

Post a Comment