Saturday, 24 August 2019

भाजप युवामोर्चा प्रदेश उपाध्यक्ष पदी राहुल लोणीकर..

मोसीन कुरेशी
मंठा प्रतिनिधी:भारतीय जनता पार्टी युवामोर्चा प्रदेश उपाध्यक्ष पदी युवानेते आणि जालना जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष विद्यमान सदस्य राहुल लोणीकर यांची निवड करण्यात आली, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील व युवामोर्चा प्रदेशाध्यक्ष योगेश टिळेकर यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देण्यात आले.पुणे येथे एका विशेष कार्यक्रमात हि नियुक्ती करण्यात आली, पदाच्या माध्यमातून आपण ध्येयाधोरने आपण जनसामान्यांपर्यंत पोहचवून पक्ष बळकट करण्यासाठी प्रयत्न करावेत असे नियुक्तीपत्रात म्हटले आहे. यावेळी मंठा येथे कृषी उत्पन्न बाजार समिती येथे फटाके वाजवून जल्लोष करण्यात आला यावेळी तालुकाध्यक्ष
गणेशराव खवणे, जेष्ठ नेते भुजंगराव गोरे, सभापती संदीप गोरे, शहराध्यक्ष कैलास बोराडे, राजेश मोरे, विठ्ठलराव काळे,उद्धवराव गोंडगे, नागेश घारे, संजय गायकवाड, माउली वायाळ, निवास देशमुख, विलास घोडके,मुस्तफा पठाण, दत्त खराबे, सखाराम बोराडे, दौलत शहाणे,गोविंदराव केंधले, बाळासाहेब गायकवाड, नारायण बागल, शरद मोरे, रावसाहेब खरात, दिलीप राठोड सर्जेराव बोराडे, गणेश बोराडे, नीलकंठ मोरे, बाळासाहेब तौर, वैभव नरवाडे, चव्हाळ, अजिंक्य खवणे यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती.

Wednesday, 21 August 2019

शिवसेना पुरस्कृत जयभवानी गणेश मंडळ मंठाची कार्यकारिणी जाहीर........ ( पूरग्रस्तांना मदत करणे शिवसेनेची बांधिलकी --जिल्हाप्रमुख ए जे बोराडे )

मोसीन कुरेशी
मंठा /प्रतिनिधी :  शिवसेना पुरस्कृत जय भवानी गणेश मंडळाची कार्यकारिणी शिवसेना जिल्हाप्रमुख तथा जयभवानी गणेश मंडळाचे संस्थापक अध्यक्ष ए जे बोराडे  यांच्या मार्गदर्शनाखाली जाहीर करण्यात आली .जयभवानी गणेश मंडळाच्या स्थापनेचे हे 28 वे वर्ष आहे.  दुष्काळ परिस्थिती आणि पूर परिस्थितीमुळे यावर्षी सांस्कृतिक कार्यक्रमांना फाटा देऊन गणेश मंडळाच्या माध्यमातून कोल्हापूर ,सांगली ,सातारा येथील पूरग्रस्तांना मदत करण्यात येणार आहे ,त्यांना मदत करणे ही शिवसेनेची बांधिलकी आहे असे जिल्हाप्रमुख ए जे बोराडे  यांनी कार्यकारिणीच्या बैठकीत मार्गदर्शन करताना सांगितले. शिवसेना मध्यवर्ती कार्यालयात आज 21 रोजी शिवसेना पदाधिकार्‍यांची बैठक पार पडली. यावेळी निवडण्यात आलेली कार्यकारिणी पुढीलप्रमाणे अध्यक्ष - संजय बोराडे , उपाध्यक्ष -महादेव खरात ,दीपक बोराडे, नागेश सराफ ,सरचिटणीस- विलास सराफ, सचिव - कृष्णा हेलसकर, संदीप बोराडे , सहसचिव - किरण सूर्यवंशी, विकास ठोकरे, नानासाहेब बोराडे ,कोषाध्यक्ष - शिवसेना तालुकाप्रमुख अजय अवचार, सहकोषाध्यक्ष नगराध्यक्ष नितीन राठोड, सल्लागार- जिल्हाप्रमुख ए जे बोराडे , मंठा अर्बन बँकेचे संचालक अंकुशराव अवचार, माजी सभापती संतोष वरकड, बाजार समितीचे संचालक प्रल्हादराव बोराडे ,महादेव वाघमारे, श्रीरंग अण्णा खरात, प्रा माणिक थिटे, नगरसेवक प्रदीप बोराडे ,माजी सभापती सुरेश सरोदे, जि प सदस्य संजय राठोड ,पंचायत समिती सदस्य बाबाराव राठोड ,मधुकर काकडे, तुळशीराम कोहीरे ,नगरसेवक बालासाहेब बोराडे , निरज सोमानी ,इलियास कुरेशी, अरुण वाघमारे, उपशहर प्रमुख गजानन बोराडे ,दिगंबर बोराडे ,बेबीताई पावसे, गयाताई  पवार,रुक्मिणीताई घोडके अशी कार्यकारिणी निवडण्यात आली सर्व नूतन कार्यकारिणीचा सत्कार जिल्हाप्रमुख ए जे बोराडे  यांचे हस्ते करण्यात आला

Sunday, 11 August 2019

विकासाच्या मुद्यावर लोणीकरांच्या नेतृत्वाखाली नेर येथील अनेकांचा भाजपा प्रवेश

मोसीन कुरेशी
मंठा प्रतिनिधी: पालकमंत्री बबनराव लोणीकर यांचे खंबीर नेतृत्व आणि युवानेते राहुल भैय्या लोणीकर यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली आज नेर येथील शेकडो युवकांनी आज भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला. परतूर, मंठा नेर आणि सेवली या मतदारसंघात झालेल्या विकास कामांनी प्रभावित होऊन आम्ही पालकमंत्री लोणीकर यांच्या मार्गदर्शनाखाली काम करण्यासाठी तयार झालो असल्याचे यावेळी अनेकांनी सांगितले.नेर ही जालना तालुक्यातील आणि परतूर मतदारसंघात असणारी एक मोठी ग्रामपंचायत असून गावाचा विकास फक्त पालकमंत्री बबनराव लोणीकर आणि युवानेते राहुल लोणीकर हेच करू शकतात ही भावना जनसामन्यात असून या पंचवार्षिक मध्ये काम करताना लोणीकर यांनी मतदार संघाचा कायापालट केल्याचे यावेळी ग्रामपंचायत सदस्य भास्कर कुलवन्त यांनी स्पष्ट केले.पालकमंत्री बबनराव लोणीकर यांच्या माध्यमातून नेर फाटा - नेर - सेवली रस्ता डांबरीकरण, नेर ते तलाव सावंगी रस्ता डांबरीकरण, तिमा नाईक तांडा रस्ता डांबरीकरण, नेर-मोहाडी-खांबेवाडी-सेवली रस्ता डांबरीकरण, 132 केव्ही, 30 लक्ष रु चा भव्य सामाजिक सभागृह, नागरी सुविधा अंतर्गत 50 लक्ष रु, गावांतर्गत अनेक सिमेंट रस्ते, वॉटर ग्रीड मध्ये समावेश यासह अनेक विकास कामे झाली असून स्वातंत्र्याच्या 70 वर्षात एवढे काम एका पंचवार्षिकमध्ये याआधी कधीच झाले नाहीत, ते लोणीकर यांनी करून दाखवले असे यावेळी ग्रामपंचायत सदस्य संदीप राठोड यांनी सांगितले.

यावेळी कैलास उफाड, दिलीप उफाड, भास्कर कुलवन्त, जिया चौधरी, अज्जूभाई, संदीप राठोड, विलासराव उफाड, वसीम सय्यद, अमीन शेख, कैलास उफाड, विलास पवार, शेख तंनु, आरिफ पठाण, सचिन उफाड, तोसीन शेख, शेख इम्रान, हिरालाल जैस्वाल, अखिल पठाण, जिजाभाऊ सहाणे, नारायण बोंद्रे, योगेश उफाड, शेख सगीर, प्रभू हिवाळे, अरबाज पठाण, मनोहर पाईकराव, अनिल हिवाळे, नशिर खा पठाण, विष्णू शिंदे, अशोक कुलवंत, कुलदीप कुलवंत, सतीश पाईकराव, अतिष कुलवंत, गणेश कुलवंत, गजानन कुलवंत, सुधाकर कुलवंत, वैजनाथ उफाड, हनुमंत गिरी, अभिजित उफाड, ज्ञानेश्वर उफाड, हकीम शेख, गजानन मोहिते, संदीप उफाड, अनिल राठोड, राहुल राठोड, नितीश चव्हाण, जगदीश राठोड, विलास राठोड, ज्ञानेश्वर राठोड, राजू पवार, गजानन राठोड, गजानन पवार, सतनाम राठोड, गजानन चव्हाण, सुभाष आढे, भारत पवार, विलास राठोड, अमोल राठोड, विकास चव्हाण, विकास राठोड, रवी राठोड, राम राठोड, रोहिदास राठोड, पांडू राठोड, सुदाम राठोड, अर्जुन राठोड, राजू राठोड, शिवाजी राठोड, सतीश राठोड, अमोल राठोड, प्रशांत राठोड, निलेश राठोड, श्रीराम राठोड, बाळू आढे, बंडू राठोड, रवींद्र राठोड अजय चव्हाण, समाधान राठोड, मिथुन राठोड, कैलास राठोड, कृष्णा चव्हाण, गजानन राठोड, सचिन चव्हाण, अशोक पवार, सतीश राठोड, रमेश राठोड यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती.

Friday, 9 August 2019

कुलकर्णी यांनी औरंगाबाद संबंधीत माफी मागावी नसता विधान परिषद निवडणुकीत काँग्रेसला मतदान नाही मंठा नगरसेवक शेख साजिद यांचा इशारा....

नगरसेवक साजिद यांना कॉंग्रेस नगरसेवक मुसा बाबामिया कुरेशी व मोईन बाबामिया कुरेशी यांनी पाठिंबा दिला.


मोसीन कुरेशी
मंठा/ प्रतिनिधी:- विधान परिषदेच्या औरंगाबाद-जालनास्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघ निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. या मतदारसंघासाठी १९ ऑगस्ट रोजी मतदान, तर २२ ऑगस्ट रोजी मतमोजणी करण्यात येणार आहे. भारत निवडणूक आयोगाने शुक्रवारी (१९ जुलै) वेळापत्रक जारी केले आहे. या मतदारसंघात २६ ऑगस्टपर्यंत आ-चारसंहिला लागू राहणार आहे. या निवडणुकीत एकमेकांविरुद्ध निवडणूक लढविणारे राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचे उमेदवार बाबुराव कुलकर्णी व शिवसेना-भाजप युतीचउमेदवार अंबादास दानवे या दोन्ही उमेदवारांनी औरंगाबाद जिल्ह्याचे नाव संभाजीनगर असल्यावरही प्रसिद्धी पत्रक वर शिक्कामोर्तब केला आहे .औरंगाबाद-जालना स्थानिक
स्वराज्य संस्था विधान परिषद मतदार संघात निवडणूक लडवीत असलेल्या उमेदवारांनी प्रसिद्धीसाठी दिलेल्या प्रसिद्धीपत्रकावर या मतदारस घाला संभाजीनगर - जालना स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघात असे नमूद करून त्यावर सह्या केलेले असल्याने याचा
तिव्र निषेध शहरातील काँग्रेस पक्षाचे नगरसेवक शेख साजिद यांनी केला आहे.औरंगाबाद संबंधित शिवसेना उमेदवार व काँग्रेसचे उमेदवार भवानीचंद्र रामचंद्र उर्फ बाबुराव कुलकर्णी जो पर्यंत संभाजीनगर मुद्यावर लिखीत किंवा तोंडी सार्वजनिक माफी मागणार नाही तो पर्यंतविधानपरिषद निवडणुकीत माझे मतदान काँग्रेस पक्षला राहणार नाही.असे नगरसेवक यांनी मराठवाड़ा न्यूजशी" बोलताना सांगितले आहे .

Thursday, 8 August 2019

मंठा शहरातील नाका कामगारांना बांधकाम प्रमाणपत्रावर सह्या देण्याबाबत लालबावटा युनियनचे नगर पंचायत मंठा येथे निदर्शने.

मोसीन कुरेशी
मंठा प्रतिनिधी:आज नगर पंचायत मंठा येथे लालबावटा युनियनच्या नेतृत्वामध्ये मजूर महिलांची बांधकाम प्रमाणपत्रावर सह्या द्याव्या या मागणीसाठी निदर्शने करण्यात आली इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाअंतर्गत नोंदणी कृत मजूरांना विविध कल्याणकारी योजना दिल्या जात आहेत यामध्ये नोंदणी करण्यासाठी मजूरांना नगर पंचायत अंतर्गत मुख्याधिकारी यांच्या सहीची आवश्यकता  आहे परंतु येथील अधिकारी व कर्मचारी खऱ्या मजूरांना सह्या देत नसल्याने मजूर विविध लाभापासून वंचित राहत आहेत. म्हणून मंठा शहरातील शेकडो मजूर महिलांनी आज नगर पंचायत मंठा येथे लालबावटा युनियनच्या नेतृत्वामध्ये तिव्र निदर्शने केली.यावेळी पोलीस निरीक्षक निकम साहेब यांच्या मध्यस्थीने व कार्यालय अधीक्षक अन्सारी यांनी दोन दिवसात सर्व मजूरांना सह्या देण्याचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आलेया आंदोलनात लालबावटा युनियनचे राज्याध्यक्ष काॅम्रेड मारोती खंदारे व जिल्हासचिव काॅम्रेड सरिता शर्मा सचिन थोरात कालिंदा प्रधान बंडोपंत कणसे शेषकला थटवले सुवर्णा चाळक गोदावरी गायकवाड सुलताना शेख महानंदा वाघमारे छाया शेळके आशामती मिसाळ लता शेजूळ विश्वनाथ वाघमारे आदी
सह मोठय़ा संख्येने मजूर महिला व पुरुष कार्यकर्ते उपस्थित होते.
आंदोलनातील मागण्या :-

१)मंठा शहरातील नाका कामगारांना खात्री करून खऱ्या कामगारांना ९० दिवसाच्या प्रमाणपत्रावर सह्या द्या
२)"क" वर्ग नगरपंचायत मंठा मध्ये मजुरांना त्वरित मनरेगाची कामे द्या.
३) मजूरांना सह्या न देणाऱ्या व उर्मठ भाषा वापरणाऱ्या कर्मचारी याची चौकशी करून योग्य ती कार्यवाही करा

प्रा. राजेश सरकटे यांचा आज डी डी सह्याद्री वाहिनीवर महाचर्चेत सहभाग ......

मोसीन कुरेशी
मंठा प्रतिनिधी : दूरदर्शन सह्याद्री वाहिनीवर ऑगस्ट क्रांतीदिना निमित्त '' महाराष्ट्रातील समर गीतांची परंपरां व राष्ट्रभक्ती '' या विषयावर होणाऱ्या महाचर्चेसाठी स्वरविहारचे निर्माते प्रा राजेश सरकटे सहभागी होणार आहेत. त्यांना डी डी सह्याद्री वाहिनीचे सहसंचालक जयू भटकर यांनी निमंत्रित केले आहे .आज शुक्रवार ता. 9 ऑगस्ट सायंकाळी 5 ते 6 या वेळेत सह्याद्री वाहिनीवर महाचर्चा हा कार्यक्रम होत असून या कार्यक्रमांमध्ये संगीतकार सोमनाथ परब, युवक बिरादरीचे संस्थापक क्रांती शहा ,ज्येष्ठ कवी विसुभाऊ बापट आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. प्रा राजेश सरकटे हे 1990 पासून सांस्कृतिक क्षेत्रात कार्यरत आहेत स्वरविहारच्या माध्यमातून त्यांनी आजपर्यंत महाराष्ट्र व राज्याबाहेर जवळपास 4800 कार्यक्रम सादर केले आहेत तसेच त्यांनी गजर विठ्ठलाचा व वंदे मातरम कार्यक्रमाची निर्मिती सुद्धा केली आहे .भारतरत्न लता मंगेशकर यांच्या समवेत यांचे भक्तीगीत ध्वनिमुद्रित झाले असून त्यांना " मेनका उर्वशी "  या चित्रपटासाठी उत्कृष्ट संगीत दिग्दर्शनाचा महाराष्ट्र शासनाचा राज्य पुरस्कार मिळाला आहे. दिनांक 9 ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त सह्याद्री वाहिनीवर सायंकाळी पाच ते सहा या वेळेत होणाऱ्या या कार्यक्रमाचा रसिकांनी मोठ्या संख्येने लाभ घ्यावा असे आवाहन स्वरविहारचे संचालक संजय सरकटे व विनोद सरकटे यांनी केले आहे.

बकरीद ईद निमित्त मंठा पोलीस ठाण्यात शांतता बैठक संपन्न..

मोसीन कुरेशी
मंठा प्रतिनिधी:12 ऑगस्ट मुस्लिम बांधवाच्या वतीने साजरी होणारी बकरीद ईद सना निमित्त आज दी.8 ऑगस्ट गरुवार रोजी दुपारी 11 वाजता उपविभागीय पोलीस अधिकारी परतुर यांच्या मार्गदर्शन खाली मंठा पोलीस ठाण्यात ईद निमित्त शांतता बैठक संपन झाली.या प्रसंगी उपविभागीय अधिकारी  मा.श्री बांगर साहेब व मंठा पोलीस निरीक्षक श्री.विलास
निकम साहेब यांनी मार्गदर्शन करुण बकरी ईद सन शांततेत पार पाडावे असे आहवान केले.या प्रसंगी बैठकीस कय्यूम भाई कुरेशी,नगरसेवक मुसा भाई कुरेशी,उपनगरध्यक्ष सिराज खान पठान,शबाब कुरेशी,नगरसेवक मोईन कुरेशी,इल्यास कुरेशी,खलील पाशा अंसारी,शकील पाशा अंसारी,पत्रकार शबाब बागवान,कबीर भाई तांबोली,मुफ़्ती इरफ़ान साहब,सलीम मिल्ली साहब,हाफिज अब्दुल जब्बार साहब व मंठा पोलीस ठाणे येथील पोलीस उपनिरीक्षक गट्टूवार साहेब,रमेश चव्हाण साहेब,बिरकायलु अण्णा,राजाळे सर,गायके सर,मनजीत सिंग सेना,केशव चव्हाण,असे अधिकारी कर्मचारी व मुस्लिम बांधवाची मोठीया प्रमाणात उपस्थिती होती.

Sunday, 4 August 2019

एआयएमआयएम तर्फे इच्छूक उमेदवारासाठी अर्जाचे वितरण

मोसीन कुरेशी
जालना (प्रतिनिधी)ः जालना जिल्ह्यातील पाच विधानसभा निवडणूकीची एआयएमआयएमने जोरदार तयारी केली आहे. इच्छूक उमेदवारांसाठी अर्जाचे वितरण आणि मुलाखती घेतल्या जाणार आहेत.
महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणुक 2019 साठी ऑल इंडिया मजलिस -ए-इतेहादुल मुस्लिमिन तर्फे निवडणुक लढविण्यास इच्छुक असलेल्या उमेदवारांसाठी अर्ज वितरण करणे तसेच जमा करणे संबंधी कार्यक्रम घोषित करण्यात आला आहे. सदरील अर्ज जिल्हाध्यक्ष शेख माजेद यांच्या टाऊनहॉल, जुना जालना येथील कार्यालयात  उपलब्ध करण्यात आले आहेत. अर्ज वितरण व दाखल करण्यासाठी दि. 4 ते 10 ऑगस्ट पर्यंत उपलब्ध असतील. अंतिम तारखे नंतर आलेल्या अर्जावर  प्रदेश कार्यालय तर्फे निर्णय घेण्यात येईल व त्यानंतर मुलाखतीसाठी कार्यक्रम व तारीख घोषित करण्यात येईल. असे एआयएमआयएमचे जिल्हाध्यक्ष शेख माजेद यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविण्यात आले आहे

Saturday, 3 August 2019

समाजपरिवर्तन हे अण्णा भाऊंच्या साहित्यांचे मध्यवर्ती सूत्र : प्राचार्य डॉ. भारत खंदारे  

मोसीन कुरेशी
मंठा, प्रतिनिधी:विषमतेवर आधारलेली आणि माणसाला गुलाम बनवून त्यांच शोषण करणारी समाजव्यवस्था बदलवून समाजपरिवर्तन करण हे अण्णा भाऊंच्या साहित्यांचे मध्यवर्ती सूत्र होते, असे प्रतिपादन प्राचार्य डॉ. भारत खंदारे यांनी केले.मंठा, येथील स्वामी विवेकानंद महाविदयालयात  अण्णा भाऊ साठे यांच्या जन्मशताब्दी व लोकमान्य टिळक यांच्या पुण्यतिथी निमित्त घेण्यात आलेल्या कार्यक्रमात अध्यक्षीय समारोप प्रसंगी ते बोलत होते. यावेळी उपप्राचार्य प्रा. अशोक खरात, पर्यवेक्षक डी.आर. जाधव, प्रा.डी.बी. मगर, प्रा.एस.आर. चव्हाण, प्रा.आघाव यांची प्रमुख उपस्थिती होती.  पुढे बोलताना डॉ. खंदारे म्हणाले, आपल्या क्षमताच भान आल्यावर माणूस सर्व प्रकारच्या प्रतिकूल परिस्थितीवर मात करून किती उत्तुंग झेप घेऊ शकतो, याच अण्णा भाऊ एक अफलातून अदाहरण आहे. ज्याला इथल्या व्यवस्थेन भाषेच्या, साहित्याच्या विश्वात प्रवेशच नाकारला होता , त्यांच्या नावान आज अनेक साहित्य संमेलन होत आहेत हा विषमतावादी व्यवस्थेवर मिळवलेला क्रांतिकारक विजय म्हणावा लागेल. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन विदयार्थीनी अंजली काकडे यांनी केले. आभार प्राध्यापिका सी.पी. पाटील यांनी मानले. प्रा. परमेश्वर शेळके, प्रा.पंढरीनाथ काकडे व त्यांच्या सहयोगी प्राध्यापकांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले. कार्यक्रमास शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी, विदयार्थी यांची उपस्थिती लक्षणीय होती.