Monday, 17 June 2019
Friday, 7 June 2019
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे जिल्ह्यातील शेतकऱ्यांशी संवाद साधणार ....... मंठा-परतूर तालुक्यातील शेतकरी बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे-------- जिल्हाप्रमुख ए.जे बोराडे
मोसीन कुरेशी,
मंठा प्रतिनिधी : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे दुष्काळी परिस्थितीत शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी रविवार 9 जून रोजी साळेगाव( घारे) ता. जि. जालना येथे येणार असून मंठा- परतूर तालुक्यातील शेतकरी बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन शिवसेना जिल्हाप्रमुख ए जे बोराडे यांनी केले आहे. मा उद्धव ठाकरे हे आपल्या दौऱ्यात जिल्ह्यातील चारा छावण्यांना भेटी देऊन चारा वाटपाचे सोबतच शेतकऱ्यांशी संवाद साधणार आहेत. यावेळी ते पदाधिकाऱ्यांची बैठक घेणार असून दुष्काळावर काय उपाययोजना करता येतील याविषयी चर्चा करणार आहेत. संपूर्ण जिल्हाभरातून येणाऱ्या हजारो शेतकऱ्यांसोबत उद्धव ठाकरे हे संवाद साधून त्यांना दिलासा देणार आहेत. यावेळी मंठा परतूर तालुक्यातील शेतकरी बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन श्री बोराडे प्रसिद्धी पत्रकान्वये यांनी केले आहे

Thursday, 6 June 2019
मंठा शहराला डिजिटल बॅनरचा विळखा....दुभाजांकामध्ये डिजिटल बॅनरमुळे वाहन धारकांना अपघात होण्याची शक्यता वाढली
मोसीन कुरेशी,
मंठा प्रतिनिधी:मंठा शहराला डिजिटल बॅनरचा विळखा लागला असुन दुभाजांकामध्ये डिजिटल बॅनर लावले जात असल्याने वाहन धारकांना अपघातला समोर जावा लागत आहे सध्या पावसाळा सुरू झाला असून वादळी वारे वाहू लागले़ यामुळे दुभाजांकावरचे डिजिटल बॅनर वाहन धारकांच्या गाड़ी समोर तर रास्त्यातून पायी चालणाऱ्याच्या डोक्यावर पडतात यामुळे शहरतील वाहनधारकांना अनेक अडचणीचा सामना करावा लागत आहे सध्या डिजिटल बॅनरला शहरात मुख्य रास्ते पहिल्यास सर्वत्र डिजिटल बॅनर दिसून येतात डिजिटल बॅनर प्रतिसाद मिडत असल्याने दोन ते तिन व्यापाऱ्यांनी 19 लाख किमतीचे डिजिटल बॅनर छपाई यंत्र आणले आहे.कुणाचा वाढदिवस असो या कोणाचे खासगी कार्यक्रम दुभाजांकावरचे डिजिटल बॅनर बनविण्यासाठी ग्राहक छपाई करणाऱ्या व्यापारिला 2×8 चे 20 बॅनर बनविन्यासाठी नऊ ते दहा हजारात गुत्ता देतात आणि बॅनर छापणारे व्यापारीहे खेडेगावातून रोजदारने मजूर अंतात आणि हे मंजूर
नियमाचे पालन करत नही कुठे पण वाकडे तिकडे बॅनर लावून निघुन जातात यामुळे वाहन धारकांना व रास्त्यातून पायी चालणाऱ्यांना अडचणीचा सामना करावा लागत आहे.मात्र याकडे नगरपंच्यातीचे दुर्लक्ष पहिला होतांना दिसत आहे.मंठा प्रतिनिधी:मंठा शहराला डिजिटल बॅनरचा विळखा लागला असुन दुभाजांकामध्ये डिजिटल बॅनर लावले जात असल्याने वाहन धारकांना अपघातला समोर जावा लागत आहे सध्या पावसाळा सुरू झाला असून वादळी वारे वाहू लागले़ यामुळे दुभाजांकावरचे डिजिटल बॅनर वाहन धारकांच्या गाड़ी समोर तर रास्त्यातून पायी चालणाऱ्याच्या डोक्यावर पडतात यामुळे शहरतील वाहनधारकांना अनेक अडचणीचा सामना करावा लागत आहे सध्या डिजिटल बॅनरला शहरात मुख्य रास्ते पहिल्यास सर्वत्र डिजिटल बॅनर दिसून येतात डिजिटल बॅनर प्रतिसाद मिडत असल्याने दोन ते तिन व्यापाऱ्यांनी 19 लाख किमतीचे डिजिटल बॅनर छपाई यंत्र आणले आहे.कुणाचा वाढदिवस असो या कोणाचे खासगी कार्यक्रम दुभाजांकावरचे डिजिटल बॅनर बनविण्यासाठी ग्राहक छपाई करणाऱ्या व्यापारिला 2×8 चे 20 बॅनर बनविन्यासाठी नऊ ते दहा हजारात गुत्ता देतात आणि बॅनर छापणारे व्यापारीहे खेडेगावातून रोजदारने मजूर अंतात आणि हे मंजूर
Monday, 3 June 2019
मंठा शहराला पाणी कमी पडू देणार नाही ..... जिल्हाप्रमुख ए जे बोराडे
मोसीन कुरेशी
मंठा /प्रतिनिधी : शेतकऱ्यांचा विरोध असतानाही लोअर दुधना प्रकल्पातून पाणी सोडल्यामुळे मृतसाठ्यातून पाणी कमी झाले असून शहरात भीषण पाणीटंचाईचे सावट लक्षात घेता शिवसेना जिल्हाप्रमुख ए जे बोराडे यांनी नगराध्यक्ष व नगरसेवकांना सोबत घेऊन आज सोमवार ता 3 रोजी प्रकल्पाचे ठिकाणी प्रत्यक्ष भेट देऊन धरणातील पाण्यापासून शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरीपर्यंत चारी खोदण्याचे आदेश दिले. या कामाला पोकलेनद्वारे तात्काळ सुरुवात झाल्यामुळे शहरातील जनतेला दिलासा मिळाला आहे .शहरातील नागरिकांना पाणी कमी पडू देणार नाही असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. या प्रकल्पातील पाण्यावर मंठा -परतूर तालुक्यातील जवळपास वीस ते बावीस गावातील शेतकरी अवलंबून आहेत पाणी सोडण्याला शेतकऱ्यांनी प्रचंड विरोध केला होता प्रशासनाच्या या निर्णयामुळे शेतकऱ्यांचे ऊस केळी भाजीपाला व फळ बागांचे नुकसान झाले आहे ,याबद्दल जिल्हाप्रमुख ए जे बोराडे यांनी प्रशासनाच्या भूमिकेबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली, त्यांनी यासंदर्भात धरणाच्या ठिकाणी जाऊन शेतकऱ्यांशी संवाद साधला, पाणी सोडल्यामुळे या पाण्यावर अवलंबून असणाऱ्या प्रत्येक शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले तसेच मंठा शहरातील जनतेला ऐन उन्हाळ्यात पाणी टंचाईला सामोरे जावे लागणार होते त्यातच मुस्लिम बांधवांचा रमजान ईद हा सण असल्यामुळे जिल्हाप्रमुख श्री बोराडे यांनी भर उन्हात नगराध्यक्ष नितीन राठोड, बाजार समितीचे संचालक प्रल्हादराव बोराडे,शिवसेना तालुकाप्रमुख अवचार, उपनगराध्यक्ष सिराजखान पठाण, नगरसेवक बालासाहेब बोराडे,मुसाभाई कुरेशी, अचीत नाना बोराडे, नीरज सोमानी, तालुका संघटक तुळशीराम कोहीरे यांना सोबत घेऊन धरणातील पाण्याची पाहणी केली व चारी खोदण्याच्या कामाला प्रत्यक्ष सुरुवात केली त्यामुळे आता मंठेकरांना पाणीटंचाईचा सामना करावा लागणार नाही तरी पाणी जपून वापरावे असे आवाहन जिल्हाप्रमुख ए जे बोराडे यांनी केले यावेळी नागेश सराफ ,संदीप आवचार, महादेव अवचार, शिवाजीराव अवचार ,दिलीप अवचार, विठ्ठलराव अवचार यांच्यासह नगरपंचायतच्या पाणी पुरवठा विभागाचे कर्मचारी उपस्थित होते

Saturday, 1 June 2019
मंठा नगरपंच्यातीला पडले सणासुदीचे विसर..
मोसीन कुरेशी,
मंठा प्रतिनिधी:अवघ्या चार दिवसावर रमजान ईद येत आहे मात्र मंठा नगरपंच्यातीला सणासुदीचे विसर पडले आहे.रमजान मध्ये मुस्लिम मोहल्या मध्ये घानीचे साम्राज्य पसरले नाल्या तुंबले आहे ईद निमित्त
मुस्लिम समाजाच्या वतीने घराची सफाई करण्यात येत आहे मात्र घंटा गाडी येत नसल्याने घरातील कचरा उघड्यावर टाकतात त्यामुळे परिसरात दुर्गंधीचे वातावरण निर्माण झाले आहे.स्वच्छता कर्मचारी मुख्य रास्त्यांवर सफाई करतात मात्र प्रभागात येत नसल्याने नागरिक नगरपंच्यातीवर संताप व्यक्त करत आहे