200

Followers

Tuesday, 21 May 2019

डिगांबर बोराडे याची युवासेना तालुकाप्रमुख पदावरून हकालपट्टी करावी ( मंठा येथील पत्रकारांचे शिवसेना कार्यालयासमोर धरणे आंदोलन)

मोसीन कुरेशी
मंठा/ प्रतिनिधी :  सोशल मीडियावर पत्रकारांची बदनामी व मानहानी करणारी पोस्ट टाकल्या प्रकरणी युवा सेनेचे तालुकाप्रमुख डिगांबर बोराडे यांची युवा सेनेतुन हकालपट्टी करावी या मागणीसाठी मंठा तालुक्यातील पत्रकारांनी शिवसेना मध्यवर्ती कार्यालयासमोर धरणे आंदोलन करून शिवसेना जिल्हाप्रमुख ए जे पाटील बोराडे यांना निवेदन दिले. यावेळी अंकुशराव अवचार , उपतालुकाप्रमुख माऊली सरकटे यांची उपस्थिती होती शिवसेना ही सामाजिक कार्य करणारी संघटना असली तरी मंठा तालुक्यात मात्र डिगांबर बोराडे सारख्या गुंड प्रवृत्तीचे व्यक्‍तींना या पक्षात थारा दिला जातो, सामाजिक भावनेतून लिखाण करणाऱ्या पत्रकारांबद्दल सोशल मीडिया सारखे फेसबुकवरून गलिच्छ शब्दांचा वापर करणे ही बाब शिवसेनेसाठी अशोभनीय आहे पत्रकार हा लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ असून सर्व पत्रकारांना उद्देशून अशा प्रकारची गलिच्छ पोस्ट टाकने ही दुर्दैवी घटना आहे. डिगांबर  बोराडे याने टाकलेल्या पत्रकारांबद्दल च्या पोस्टमुळे तालुक्यासह जिल्हाभरातील पत्रकार बांधव  निषेध व्यक्‍त करीत आहेत त्याची युवा सेना तालुका प्रमुख पदावरून तात्काळ हकालपट्टी करावी अशी मागणी पत्रकार बांधवांच्या वतीने शिवसेना जिल्हाप्रमुख बोराडे यांच्याकडे करण्यात आली यासंदर्भात त्यांनी आपला अहवाल युवा सेना जिल्हाप्रमुख यांच्यामार्फत शिवसेना भवनात पाठविण्यात येईल असे सांगितले. यावेळी संतोष दायमा,नागेश कुलकर्णी, पांडुरंग खराबे, पंडितराव बोराडे, बाबासाहेब कुलकर्णी, बाबूजी तिवारी, दिनेश जोशी,प्रदीप देशमुख, कृष्णा भावसार,तुकाराम मुळे ,रणजीत बोराडे, डाॅ. अशिष तिवारी, बालाजी कुलकर्णी, विजयकुमार देशमुख, हाफेज शबाब बागवान ,रमेश देशपांडे ,अनिल बा.खंदारे मोसिन कुरेशी ,अमोल राऊत, अतुल खरात, प्रवीण दीक्षित, आसाराम शेळके, अरुण राठोड, लखन जयस्वाल, रवी पाटील ,  कैलास पवार ,प्रदीप पाटील, केशव येऊल, रवी पाटील , प्रकाश भावसार यांची उपस्थिती होती..

No comments:

Post a Comment