मोसीन कुरेशी,
मंठा प्रतिनिधी : मंठा शहर व ग्रामीण भागात परभणी लोकसभा निवडणूक गुरुवार ता. 18 रोजी शांततेत पार पडली. मंठा तालुक्यात 59 टक्के मतदान झाले. मंठा शहरातील एकूण 18 बुथवर सकाळी सात वाजल्यापासून मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजवायला सुरुवात केली. जिल्हा परिषदेच्या प्रांगणात वेगवेगळ्या रूम मध्ये एकूण नऊ बुथ असल्यामुळे येथे मतदान करणाऱ्यांची संख्या जास्त होती तसेच बाजार समिती, कन्याशाळा 4 मतदान केंद्र , नगरपंचायत एक मतदान केंद्र आणि स्वामी विवेकानंद विद्यालय तीन मतदान केंद्र होते. भर उन्हातही मतदारांचा उत्साह दिसून आला अपंगांसाठी जिल्हा परिषदेच्या केंद्रावर व्हीलचेअरची व्यवस्था केल्याचे दिसून आले .शिवसेना भाजप राष्ट्रवादी काँग्रेस बहुजन वंचित आघाडीचे नेते मंडळी भर उन्हात जिल्हा परिषदेच्या आसपास उभे राहून दिवसभर मतदारांना मतदानासाठी विनंती करताना दिसून आले. निवडणूक प्रक्रिया शांततेच्या वातावरणात पार पडली प्रत्येक मतदान केंद्रावर पोलिसांचा चोख बंदोबस्त होता .मंठा शहरातील काही प्रभागांमध्ये निवडणूक कर्मचाऱ्यांनी पोलचीट वाटप न केल्यामुळे मतदारांना मतदानासाठी त्रास सहन करावा लागला
200
Followers
Thursday, 18 April 2019
मंठा तालुक्यात 59 टक्के मतदान शांततेत...
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment