मोसीन कुरेशी
मंठा /प्रतिनिधी : महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ तालुका मंठाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज ,संत सेवालाल महाराज आणि संत रविदास महाराज यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली यावेळी माऊली अर्बन बँकेचे अध्यक्ष तथा बाजार समितीचे संचालक सतीशराव निर्वळ यांचा शैक्षणिक सामाजिक व धार्मिक कार्याबद्दल पत्रकार संघाच्या वतीने सत्कार करण्यात आला. येथील मार्केट कमिटीच्या सभाग्रहात मंगळवार ता.19 रोजी महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ मंठाच्या वतीने आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ पत्रकार बाबासाहेब कुलकर्णी होते तर व्यासपीठावर सतीशराव निर्वळ, पत्रकार संघाचे तालुकाध्यक्ष संतोष दायमा, बाजार समितीचे संचालक मुस्तफा पठाण ,जिल्हा कार्यकारिणी सदस्य पंडितराव बोराडे ,तुकाराम मुळे यांची उपस्थिती होती .प्रारंभी मान्यवरांनी छत्रपती शिवाजी महाराज ,संत सेवालाल महाराज ,संत रविदास महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन केले .श्री सतीशराव निर्वळ यांनी शैक्षणिक सामाजिक व धार्मिक कार्यात आपला वेगळा ठसा उमटविला असून त्यांच्या समाजउपयोगी कार्याची दखल घेऊन महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाने त्यांचा यथोचित सत्कार केला तसेच अनिल बा. खंदारे यांची दैनिक लोकपत्रच्या जिल्हा प्रतिनिधी पदी निवड झाल्याबद्दल त्यांचा विशेष गौरव केला. यावेळी सत्काराला उत्तर देताना श्री सतीशराव निर्वळ म्हणाले की,पत्रकार हा समाजाला दिशा दाखविण्याचे काम करतो आपल्याला समाजात मिळणारा मानसन्मान हा पत्रकारांचे लेखणीमुळे मिळत असून लेखणीची ताकद आहे त्यांच्या लेखणीमुळे सामाजिक कार्याची प्रेरणा मिळते असे गौरवोद्गार काढले पत्रकार संघाचे नवीन सदस्य प्रवीण दीक्षित आणि आसाराम शेळके यांचा यावेळी सत्कार करण्यात आला.यावेळी पत्रकार संघाचे अध्यक्ष संतोष दायमा, बालाजी कुलकर्णी ,पंडितराव बोराडे, अनिल बा.खंदारे ,तुकाराम मुळे ,रमेश देशपांडे यांनी मनोगत व्यक्त केले. जेष्ठ पत्रकार बाबासाहेब कुलकर्णी यांनी अध्यक्षीय समारोप केला .या कार्यक्रमाला बाजार समितीचे सचिव शिवाजी छानवाल, विजयकुमार देशमुख, लखन जयस्वाल, डाॅ आशिष तिवारी,कैलास पवार, अमोल राऊत ,रवी पाटील ,प्रकाश भावसार, गौतम सदावर्ते,विनोद चव्हाण यांची उपस्थिती होती. पत्रकार संघाचे सरचिटणीस मोसिन कुरेशी यांनी आभार मानले

No comments:
Post a Comment