Friday, 15 June 2018

मंठा येथील पांगरी खुर्द गावातील जि.प्राथमिक शाळेत पहिल्याच दिवशी विद्यार्थ्याना पुस्तक वाटप.....

मोसीन कुरेशी,
मंठा प्रतिनिधी:आज दि.१५ रोजी शैक्षणिक वर्ष २०१८-१९च्या पहिल्याच दिवशी जि.प.प्रा.शा.पांगरी खुर्द कें.कन्या मंठा येथे मौजे पांगरी चे सरपंच राधा तानाजी शेंडगे यांच्या प्रमुख उपस्थितीत तसेच शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष सुंदरराव काळे तंटामुक्ती अध्यक्ष मधुकरराव काळे, प्रतिष्ठित नागरीक तानाजी शेंडगे ग्रा..सदस्य अभिमन्यु व्हरकटे ,मा.उपसरपंच बाबाराव काळे मा.सदस्य भानुदास शेंडगे भानुदास राठोड आदी मान्यवरांच्या हस्ते शालेय परिसर स्वच्छ करून प्रत्येक विद्यार्थ्यांना शैक्षणिक वर्षात पुस्तकांचे वाटप करण्यात आले. या वेळी शाळेचे मुख्याध्यापक श्री. मुक्तार अन्सारी व सहशिक्षक बि.के.खरात सर सह स्वयंपाकी ताई नंदाबाई व तसेच मोठीया प्रमाणात विद्यार्थी उपस्थित होते.

Saturday, 9 June 2018

शिवसेना जिल्हाप्रमुख ए.जे बोराडे यांच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

मोसीन कुरेशी...
मंठा प्रतिनिधी:जालना जिल्ह्यातील मंठा येथे एस.एस.सी परिक्षा मध्ये उत्तीर्ण झालेल्या गुणवंत विद्यार्थीचा शिवसेना जिल्हा प्रमुख ए.जे बोराडे यांच्या वतीने सत्कार करण्यात आला.यावर्षी  मुलींनी बाजी मारली आहे.रेणुका विद्यालयची पूनम संतोष चव्हाण हिने 97.20 टक्के घेवून तालुक्यात प्रथम आली आहे. तर स्वामी विवेकानंद विद्यालयची सुप्रिया संतोष वरकड हिने 96.60 टक्के घेवून  द्वितीय क्रमांकावर  आली आहे.या निमित्त कु.पूनम संतोष चव्हाण, कु.सुप्रिया संतोष वरकड,अनिकेत सतीश निर्वाड,कु.राधिका नंदकुमार साबू,दिग्विजय सदाशिव कमळकर,कु वैष्णवी दिलीप मस्के,कु.प्रांजल भारत काष्टे,अजय प्रलाद, भारत काष्टे राठोड,ज्ञानेश्वर महादेव खनके,कु.पल्लवी दत्तराव बोराडे इत्यादी गुणवंत  विद्यार्थीचा शिवसेना कार्यलयवर सत्कार करण्यात आला.
या प्रसंगी नगराध्यक्ष नितिन भैया राठोड,नगरसेवक बालासाहेब बोराडे,इल्यास कुरेशी,पत्रकार संतोष दायमा,मोसीन कुरेशी,माजी सभापति संतोष वरकड़,सदाशिव कमळकर सर,आर.के राठोड सर,पंचयत समेती सदस्य बाबा राठोड, रघुनाथ मामा चव्हाण, महादेव खनके, दत्तराव बोराडे, प्रलाद राठौड़, भारत काष्टे, दिलीप मस्के, नंदकुमार साबू,सतीश निर्वाड आदींची उपस्तिथी होती.

Friday, 8 June 2018

वैजनाथ बोराडे यांना पुरस्कार

मंठा प्रतिनिधी : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक वैजनाथ आबासाहेब बोराडे यांना नुकताच फुले शाहू आंबेडकर पुरस्कार प्रदान करण्यात आला.त्यांच्या सामाजिक कार्याची दखल घेऊन अखिल भारतीय श्री गुरूदेव सेवा आश्रम अमरावती या संस्थेच्या वतीने समानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.
     मातोश्री बिंदुबाई सोनवणे सभागृहात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रभाकर सोनुने समाज कल्याण सभापती जळगाव , प्रमुख पाहुणे आ.राजू भोळे , जेष्ठ समाज सेवक विठ्ठल कोळी , अब्दुल सत्तार , उषा सपकाळे , संध्या सोनवणे , हरिचंद्र बाविस्कर यांच्या उपस्थितीत पुरस्कार प्रदान करण्यात आला. पुरस्काराबद्दल  वैजनाथ बोराडे यांचे विविध स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे..