200

Followers

Thursday, 19 April 2018

मंठयात बलात्कारांच्या निषेधार्थ हजारोंचा केंडल मार्च             तहसिलदारांस दिले निवेदन.


मंठा प्रतिनिधी,मोसीन कुरेशी उन्नाव,कठुवा,सूरत,सासाराम,अमेठी इत्यादि ठिकाणी निर्घृण हत्या या सर्वांच्या पार्श्वभूमीवर सम्पूर्ण भारतात आक्रोषाचे तिव्र पडसाद उमटले असेच मंठा शहरात ही नागरिकामध्ये तिव्र असंतोष पसरला आणि याची परिणीति कैंडल मार्च मध्ये दिसून आली  स्थानिय विश्राम गृहात् सायं 6 पासून नागरिकांची गर्दी जमु लागली ठीक 7 वाजता पेटललेल्या मेंनबत्त्या हातात घेऊन सर्व धर्मीय व जातीय नागरिक मौन मोर्चात सामिल झाले।
       " आसिफा हम शर्मिंदा है ,तेरे कातिल ज़िंदा है"  ;बलात्कारयाना तात्काळ फाशी द्या;धिक्कार असो धिक्कार असो बलात्कार्यांचा धिक्कार असो आशा विविध घोषणांचे फलक हातात होते । मंठा टी पॉइंट पासून शिवाजी पुतल्या जवळ मोर्चा आला नंतर शोक सभा आयोजित करण्यात आली अनेकांनी भावना व्यक्त केल्या ।सर्व प्रथम महिला प्रतिनिधी म्हणून  चन्द्रकला पोपटे ज्योति पोपटे यांनी तिव्र शब्दात संताप व्यक्त केला । प्रत्येकाने प्रत्येक स्त्री ही माझी मुलगी ,बहिन किंवा आई आहे असे समजून स्त्रियांचे रक्षण करावे । स्त्री कोणत्याही धर्माची जातीची असो तिचे रक्षण करणे आपले कर्तव्य आहे असे समजावे
    भाऊसाहेब गोरे   म्हणाले की हे कृत्य मानवतेला लाजवीणारे असून दोषिवर लवकर कार्यवाही व्हावी तर बाबूजी तिवारी यांनी पशुनाही लाजविल अशी ही घटना असून प्रसंगी कायद्यात बदल करुन नराधमाना तात्काळ मृत्युदंड द्यावा जामा मस्जिद चे इमाम हाफेज जब्बार म्हणाले या सैतानांच्या निन्दनीय कृत्याचा आम्ही धिक्कार करतो व शीघ्र न्यायाची मागणी करतो
  राजेश मोरे म्हणाले ,या प्रकरनाला राजकीय स्वरुप न देता निः पक्षपने पिडिताना न्याय मिळावा अड़.मोरे म्हणाले की कधी कधी पुराव्या अभावि दोषी निर्दोष सुटतात व अनाहुत पने पिडितांवर अन्याय होतो ऎसे होता कामा नये
    शासन दरबारी निषेध नोंदविण्या साठी लिहिलेले निवेदन तहसिलदार राहुल गायकवाड़ यानी कार्यक्रम स्थळी स्वतः येऊन स्वीकारले व लगेच वरिष्ठाना पाठवित असल्याचे सांगितले  याप्रसंगी  शेवटी उपस्थितानि मौन श्रद्धाञ्जलि  अर्पण केली
     कैंडल मार्च चे वैशिष्ट्य असे की यात व्यापारी, कर्मचारी, पत्रकार, राजकीय ,सामाजिक, शैक्षणिक अशा विविध सर्व क्षेत्रातील सर्व धर्मीय नागरिक सामिल झाले होते ।।       

  

 

No comments:

Post a Comment