Thursday, 19 April 2018

मंठयात बलात्कारांच्या निषेधार्थ हजारोंचा केंडल मार्च             तहसिलदारांस दिले निवेदन.


मंठा प्रतिनिधी,मोसीन कुरेशी उन्नाव,कठुवा,सूरत,सासाराम,अमेठी इत्यादि ठिकाणी निर्घृण हत्या या सर्वांच्या पार्श्वभूमीवर सम्पूर्ण भारतात आक्रोषाचे तिव्र पडसाद उमटले असेच मंठा शहरात ही नागरिकामध्ये तिव्र असंतोष पसरला आणि याची परिणीति कैंडल मार्च मध्ये दिसून आली  स्थानिय विश्राम गृहात् सायं 6 पासून नागरिकांची गर्दी जमु लागली ठीक 7 वाजता पेटललेल्या मेंनबत्त्या हातात घेऊन सर्व धर्मीय व जातीय नागरिक मौन मोर्चात सामिल झाले।
       " आसिफा हम शर्मिंदा है ,तेरे कातिल ज़िंदा है"  ;बलात्कारयाना तात्काळ फाशी द्या;धिक्कार असो धिक्कार असो बलात्कार्यांचा धिक्कार असो आशा विविध घोषणांचे फलक हातात होते । मंठा टी पॉइंट पासून शिवाजी पुतल्या जवळ मोर्चा आला नंतर शोक सभा आयोजित करण्यात आली अनेकांनी भावना व्यक्त केल्या ।सर्व प्रथम महिला प्रतिनिधी म्हणून  चन्द्रकला पोपटे ज्योति पोपटे यांनी तिव्र शब्दात संताप व्यक्त केला । प्रत्येकाने प्रत्येक स्त्री ही माझी मुलगी ,बहिन किंवा आई आहे असे समजून स्त्रियांचे रक्षण करावे । स्त्री कोणत्याही धर्माची जातीची असो तिचे रक्षण करणे आपले कर्तव्य आहे असे समजावे
    भाऊसाहेब गोरे   म्हणाले की हे कृत्य मानवतेला लाजवीणारे असून दोषिवर लवकर कार्यवाही व्हावी तर बाबूजी तिवारी यांनी पशुनाही लाजविल अशी ही घटना असून प्रसंगी कायद्यात बदल करुन नराधमाना तात्काळ मृत्युदंड द्यावा जामा मस्जिद चे इमाम हाफेज जब्बार म्हणाले या सैतानांच्या निन्दनीय कृत्याचा आम्ही धिक्कार करतो व शीघ्र न्यायाची मागणी करतो
  राजेश मोरे म्हणाले ,या प्रकरनाला राजकीय स्वरुप न देता निः पक्षपने पिडिताना न्याय मिळावा अड़.मोरे म्हणाले की कधी कधी पुराव्या अभावि दोषी निर्दोष सुटतात व अनाहुत पने पिडितांवर अन्याय होतो ऎसे होता कामा नये
    शासन दरबारी निषेध नोंदविण्या साठी लिहिलेले निवेदन तहसिलदार राहुल गायकवाड़ यानी कार्यक्रम स्थळी स्वतः येऊन स्वीकारले व लगेच वरिष्ठाना पाठवित असल्याचे सांगितले  याप्रसंगी  शेवटी उपस्थितानि मौन श्रद्धाञ्जलि  अर्पण केली
     कैंडल मार्च चे वैशिष्ट्य असे की यात व्यापारी, कर्मचारी, पत्रकार, राजकीय ,सामाजिक, शैक्षणिक अशा विविध सर्व क्षेत्रातील सर्व धर्मीय नागरिक सामिल झाले होते ।।       

  

 

Sunday, 8 April 2018

'इश्क सुब्हान अल्लाह' या धारावाहिक बंद करण्याची मागणी. परतुर येथे पोलीस निरीक्षकाला निवेदन देण्यात आले.

(मराठवाडा न्यूज़ ब्यूरो)

परतुर प्रतिनिधी;झी टीव्ही वर प्रसारित करण्यात येणारा धारावाहिक 'इश्क सुब्हान अल्लहा' या धारवाहिकावर ट्रिपल तलाक व शरीयत विरुद्ध मनघडत पद्धतीने दखवित आहे.व मुस्लिम समाजाच्या भावना व मुस्लिम समाजांना बदनाम करण्याचे षड्यंत्र होत असल्याने धारवा हिकावर कायदेशीर करवाई करुण प्रसारण बंद करण्यात यावे 14 मार्च रोजी झी टीव्ही वर प्रसारित करण्यात येणारे हिंदी धारावाहिक 'इश्क सुभानअल्लाह' हा धारावाहिक दखविण्यात येत आहे.या धारावाहिक प्रसारणा मध्ये मनघडत पद्धतीने ट्रिपल तलाक विषयावर कथानक मांडले आहे तसेच या धारावाहीकाच्या पहिल्या चित्रिकारणा मध्ये ट्रिपल तलाख कायदा विरोधात मोर्चे काढणारे दृश्य,सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करणारे दृश्य,जाळपोळीचे दृश्य चित्रीकरण दर्शविणयात आलेले आहे.सादर धाराविहीका मध्ये ज्या पद्धतीने ट्रिपल तलाक बाबत कथा-कथन हे पवित्र कुरान व हदीसच्या विरुद्ध दखविण्यात आले आहे.सदर धारावाहीक बनवीताना संबंधीतांनी पवित्र कुरान व हदीस मध्ये ट्रिपल तलाक संदर्भातील कोणतीही माहिती घेतलेली नाही तसेच देशातील प्रमुख मुस्लिम धर्मगुरुंशी कोणतीही चर्चा अथवा लेखी माहिती घेतलेली नाही.सदर धारावाहिकामध्ये 19 मार्च 2018 ते 20 मार्च 2018 मध्ये प्रसारित झालेल्या चित्रिकरानामध्ये मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डच्या कार्यवाहिवर चुकीच्या पद्धतीने कथा-कथन करुण समाजाची दिशाभुल करण्याचे व समाजात चुकीचे संदेश देण्याचे कार्य करीत असल्याने निदर्शनास आले आहे.त्यामुळे मुस्लिम समाजाच्या धार्मिक भावना दुखविल्या असून व मुस्लिम समाजाचे अपमान करण्यात आले.आहे. तरी या धारावाहिकवर कायदेशीर कारवाही करुण या प्रसारण तत्वरित बंद करण्यात यावे. या प्रसंगी इब्राहिम कायमखानी,समाज सेवक नासेर चाऊस, पठाण मुज़म्मील,शेख महेबुब, ईत्यादी उपस्थित होते.

Friday, 6 April 2018

इश्क सुब्हान अल्लाह या धारावाहिकावर बंदीची मुस्लिम संघटना कडून मागणी


मंठा येथे तहसील कार्यलय मार्फ़त मुख्यमंत्रीला निवेदन देण्यात आले.
मंठा प्रतिनिधी;झी टीव्ही वर प्रसारित करण्यात येणारा धारावाहिक 'इश्क सुब्हान अल्लहा' या धारवाहिकावर ट्रिपल तलाक व शरीयत विरुद्ध मनघडत पद्धतीने दखवित आहे.व मुस्लिम समाजाच्या भावना व मुस्लिम समाजांना बदनाम करण्याचे षड्यंत्र होत असल्याने जालना जिल्ह्यातील मंठा तालुका येथे या धारवा हिकावर कायदेशीर करवाई करुण प्रसारण बंद करण्याचे निवेदन मंठा तहसील कार्यलय व पोलिस स्टेशन मध्ये देण्यात आले आहे.
14 मार्च रोजी झी टीव्ही वर प्रसारित करण्यात येणारे हिंदी धारावाहिक 'इश्क सुभानअल्लाह' हा धारावाहिक दखविण्यात येत आहे.या धारावाहिक प्रसारणा मध्ये मनघडत पद्धतीने ट्रिपल तलाक विषयावर कथानक मांडले आहे तसेच या धारावाहीकाच्या पहिल्या चित्रिकारणा मध्ये ट्रिपल तलाख कायदा विरोधात मोर्चे काढणारे दृश्य,सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करणारे दृश्य,जाळपोळीचे दृश्य चित्रीकरण दर्शविणयात आलेले आहे.सादर धाराविहीका मध्ये ज्या पद्धतीने ट्रिपल तलाक बाबत कथा-कथन हे पवित्र कुरान व हदीसच्या विरुद्ध दखविण्यात आले आहे.सदर धारावाहीक बनवीताना संबंधीतांनी पवित्र कुरान व हदीस मध्ये ट्रिपल तलाक संदर्भातील कोणतीही माहिती घेतलेली नाही तसेच देशातील प्रमुख मुस्लिम धर्मगुरुंशी कोणतीही चर्चा अथवा लेखी माहिती घेतलेली नाही.सदर धारावाहिकामध्ये 19 मार्च 2018 ते 20 मार्च 2018 मध्ये प्रसारित झालेल्या चित्रिकरानामध्ये मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डच्या कार्यवाहिवर चुकीच्या पद्धतीने कथा-कथन करुण समाजाची दिशाभुल करण्याचे व समाजात चुकीचे संदेश देण्याचे कार्य करीत असल्याने निदर्शनास आले आहे.त्यामुळे मुस्लिम समाजाच्या धार्मिक भावना दुखविल्या असून व मुस्लिम समाजाचे अपमान करण्यात आले.आहे. तरी या धारावाहिकवर कायदेशीर कारवाही करुण या प्रसारण तत्वरित बंद करण्यात यावे असे निवेदन महाराष्ट्र मुस्लिम युवक प्रतिष्ठानच्या वतीने देण्यात आले आहे या प्रसंगी मुस्लिम युवक प्रतिष्ठान जिल्हाउपध्यक्ष मोसीन कुरेशी, नगरसेवक इल्यास कुरेशी,माजी सरपंच मोईन कुरेशी,नगरसेवक सिराज खान पठान,फुजेल शेख,इस्माइल राज,सोफियान बागवान अलीम कुरेशी,साजिद पिंजरी,इनुस कुरेशी,शबाब बागवान,अंज़र शेख,आमेर शेख आदि उपस्तिथ होते.

'इश्क सुब्हान अल्लाह' या धारावाहिकावर बंदीची मुस्लिम संघटनाची मागणी


आष्टी पोलिस स्टेशन मार्फ़त मुख्यमंत्रीला निवेदन देण्यात आले.

आष्टी प्रतिनिधी;(मराठवाड़ा न्यूज़ ब्यूरो)झी टीव्ही वर प्रसारित करण्यात येणारा धारावाहिक 'इश्क सुब्हान अल्लहा' या धारवाहिकावर ट्रिपल तलाक व शरीयत विरुद्ध मनघडत पद्धतीने दखवित आहे.व मुस्लिम समाजाच्या भावना व मुस्लिम समाजांना बदनाम करण्याचे षड्यंत्र होत असल्याने जालना जिल्ह्यातील आष्टी तालुका परतुर येथे या धारवा हिकावर कायदेशीर करवाई करुण प्रसारण बंद करण्याचे निवेदन आष्टी पोलिस स्टेशन मध्ये देण्यात आले आहे.

14 मार्च रोजी झी टीव्ही वर प्रसारित करण्यात येणारे हिंदी धारावाहिक 'इश्क सुभानअल्लाह' हा धारावाहिक दखविण्यात येत आहे.या धारावाहिक प्रसारणा मध्ये मनघडत पद्धतीने ट्रिपल तलाक विषयावर कथानक मांडले आहे तसेच या धारावाहीकाच्या पहिल्या चित्रिकारणा मध्ये ट्रिपल तलाख कायदा विरोधात मोर्चे काढणारे दृश्य,सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करणारे दृश्य,जाळपोळीचे दृश्य चित्रीकरण दर्शविणयात आलेले आहे.सादर धाराविहीका मध्ये ज्या पद्धतीने ट्रिपल तलाक बाबत कथा-कथन हे पवित्र कुरान व हदीसच्या विरुद्ध दखविण्यात आले आहे.सदर धारावाहीक बनवीताना संबंधीतांनी पवित्र कुरान व हदीस मध्ये ट्रिपल तलाक संदर्भातील कोणतीही माहिती घेतलेली नाही तसेच देशातील प्रमुख मुस्लिम धर्मगुरुंशी कोणतीही चर्चा अथवा लेखी माहिती घेतलेली नाही.सदर धारावाहिकामध्ये 19 मार्च 2018 ते 20 मार्च 2018 मध्ये प्रसारित झालेल्या चित्रिकरानामध्ये मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डच्या कार्यवाहिवर चुकीच्या पद्धतीने कथा-कथन करुण समाजाची दिशाभुल करण्याचे व समाजात चुकीचे संदेश देण्याचे कार्य करीत असल्याने निदर्शनास आले आहे.त्यामुळे मुस्लिम समाजाच्या धार्मिक भावना दुखविल्या असून व मुस्लिम समाजाचे अपमान करण्यात आले.आहे. तरी या धारावाहिकवर कायदेशीर कारवाही करुण या प्रसारण तत्वरित बंद करण्यात यावे असे निवेदन महाराष्ट्र मुस्लिम युवक प्रतिष्ठानच्या वतीने देण्यात आले आहे या प्रसंगी मुस्लिम युवक प्रतिष्ठानचे आष्टी शहर अध्यक्ष वसीम शेख, आसेफ जमीनदार, इब्राहिम शेख, मोलवी अ.रहीम साहब, मोसिन बागवान, अरबाज काकड़, आदिल शेख, आदि उपस्तिथ होते.

Tuesday, 3 April 2018

मनरेगाची कामे सुरु करण्यासाठी मंठा पंचायत समिती व तहसिल कार्यालयला मजुरांचा घेराव...

मोसीन कुरेशी

मंठा प्रतिनिधी:तालुक्यातील 28 गावच्या मजुरांनी कामाची मागणी केली.. ६ गावात कामे सुरु होऊन पुन्हा बंद पडली. आज दिनांक ३/४/२०१८ रोजी मनरेगाच्या कामासाठी मंठा तालुक्यातील विविध गावच्या मजुरांनी मंठा पंचायत समिती व तहसिल कार्यालयला मजुरांनी घेराव घातला. कामाची मागणी केलेल्या गावात मनरेगाची कामे सुरु करा, रोजगार हमी आमच्या हक्काची, मजुर एकजुटीचा विजय असो अश्या जोरदार घोषणाबाजीमुळे परिसर दणाणून गेला. पंचायत समिती चे गटविकास अधिकारी हजर नसल्याने मजुरांनी निषेध व्यक्त केला. व तहसिल कडे मजुरांचा मोर्चा वळला तहसिलदार गायकवाड यांनी मजुरांशी गाव निहाय सविस्तर चर्चा करुन मनरेगाची कामे सर्व गावात दोन दिवसात सुरु करण्याचे सांगीतले जिथे कामे देण्यास विलंब झालेला आहे तिथे कायद्यानुसार बेरोजगार भत्ता वाटप करण्याचे पत्र काढुन मजुरांना न्याय देऊ असे तहसिलदार यांनी सांगितले. मागण्या मनरेगाची कामे त्वरित सुरु करा. प्रत्येक गावात मजुरांना पुरेल असा सेल्फ तयार करा मंठा तालुका जेसीबी मुक्त करा, मजुरांसाठी काम राखीव करा. गटविकास अधिकारी व तालुका कृषी अधिकारी मंठा यांना मनरेगाच्या कामांना प्राधान्य देण्याचे आदेश द्या. याव इतर मागण्या साठी घेराव घालण्यात आला. या आंदोलनात मारोती खंदारे सचिन थोरात कालिदा प्रधान श्रावण शिंदे कलावती भोंगाळ सखुबाई लाखुळे विक्रम जाधव कैलास भोरसड विष्णू वोटकर गजानन वायसे, गुफाताई पडुळ मंडाबाई घुगे गजानन नागरे मैनाजी पितळे सिध्दार्थ देशमाने, इत्यादी मजुर हाजर होते.

Monday, 2 April 2018

जालन्यात प्रतिष्ठितांच्या जुगार अड्‌ड्यावर धाड; 20 जण अटक. पोलीस अधीक्षक रामनाथ पोकळे यांनी स्वतः टाकली धाड. एसआरपीचे तीन जवान, एक टीसी, सरपंच व व्यापाऱ्यांचा समावेश.

जालना (प्रतिनिधी) - जिल्हा पोलीस अधिक्षक रामनाथ पोकळे यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसचा नेता नूरखान यांच्या भोकरदन नाका परिसरातील वातानुकुलीत जुगार अड्डयावर धाड टाकून 20 प्रतिष्ठित आरोपींना अटक केली आहे. त्यांच्या ताब्यातून रोख एक लाख 20 हजार रूपयांसह आठ मोटर सायकली 20 मोबाईल, विदेशी दारू, फर्नीचर असा एकूण साडेसहा लाखांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे.

या धाडशी कारवाईमुळे अवैध धंदे करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहे.

भोकरदन नाका परिसरातील सकलेचानगर भागात राष्ट्रवादी कांँग्रेसचे नेते नूरखान पठाण यंाची नूरखान प्री-प्रायमरी इंग्लिश स्कूल नावाची शाळा आहे. या शाळेमध्येच गेल्या काही दिवसापासून जुगार अड्डा सुरु असल्याची माहिती पोलीसांना मिळाली होती. त्यानुसार आज सोमवारी (दि.3) रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास पोलिस अधिक्षक रामनाथ पोकळे यांनी मोठ्या फौजफाट्यासह या जुगार अड्डयावर धाड टाकली. यावेळी या शाळेच्या नावाआड चालणाऱ्या जुगार अड्डयावर अनधिकृत विद्युत चोरी करून सहा एसी. बसवून  पत्त्याचे दोन क्लब सुरू होते. या कारवाईमध्ये पोलिस अधिक्षक पोकळे यंाच्यासह उपविभागीय अधिकारी डॉ.सचिन बारी, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरिक्षक राजेंद्रसिंह गौर, सदर बाजार पोलिस ठाण्याचे पोलिस निरिक्षक महादेव राऊत, पोलिस उपनिरिक्षक हनुमंत वारे यांच्यासह सुमारे 50 पेक्षा जास्त कर्मचारी सहभागी झाले होते.

यावेळी जुगार खेळतांना मुख्यसुत्रधार नुरखान पठाण यांच्यासह 19 जणांना रंगेहाथ पकडण्यात आले. यामध्ये शेख मंहमद शेख बुढन (रा.मस्तगड), शेख कदीर शेख रहिमोद्दीन (रा.नरिमान नगर), शाहु कचरू धोत्रेे (रा.माळीपुरा), नरेश पुरूषोत्तम अग्रवाल (रा.रेल्वे स्टेशन रोड), संजय दत्तुलाल अग्रवाल (रा.शिवाजी पुतळा), शेख अल्लाहुद्दीन शेख कासीम (रा.रामनगर), सुरेश चंदुलाल कक्कड (रा.मस्तगड), शेख युनुस शेख इस्माईल (रा.रेल्वे स्टेशन), जगन्नाथ मधवराव नागरे (रा.संभाजीनगर), शेख शब्बीर शेख इब्राहीम (रा.निवांत हॉटेल जवळ), रावसाहेब देवराव इंगोले (सरपंच, रा.धारकल्याण), कैलास सदाशिव गायकवाड (रा.ढोरपुरा), संदीप एकनाथ सराफ (रा.कावडपुरा गल्ली), कुणाल शिवाजीराव शिंदे (रा.मस्तगड), सचिन रूपचंद सांबरे (रा.शिवाजीनगर),संजय गिरमाजी कापुरे (रा.नवजिवननगर), गजानन दिनकर मोरे (एसआरपीएफ जवान), भिमराव अर्जुनराव गायके (एसआरपीएफ जवान) आणि बालाजी बंडुजी कांबळे (एसआरपीएफ जवान, रा.व्यकंटेशनगर) यांचा समावेश आहे. या कारवाईत पोलिसांनी रोख एक लाख वीस हजार रूपये जप्त केले आहे तसेच आठ दुचाकी वाहने तीन लाख वीस हजार रूपयाचे , एक लाख रूपयाचे फर्निचर, वीस मोबाईल एक लाख रूपयाचे असा साडे सहालाख रूपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे.

सर्व आरोपींना अटक करून त्यांना सदर बाजार पोलिस ठाण्यात एका वाहनातून नेण्यात आले. रात्रि उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची कारवाई सुरु होती. या कारवाईमध्ये पोलिस अधिक्षक रामनाथ पोकळे यंाच्यासह उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ.सचिन बारी, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरिक्षक राजेंद्रसिंह गौर, सदर बाजार पोलिस ठाण्याचे पोलिस निरिक्षक महादेव राऊत, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस उपनिरिक्षक हनुमंत वारे , पोहेकॉ. कमलाकर अंभोरे, संतोष सावंत, शेख रज्जाक, विनोद गडदे, गोकुलसिंग कायटे, सचिन चौधरी, सॅंम्युअल कांबळे, सदा राठोड, समाधान तेलंग्रे यांच्यासह अनेक कर्मचारी सहभागी होते

मंठा येथील अवैध पार्किंग बनला प्रवासीयांचा डोके दुःखी


मोसीन कुरेशी

मंठा प्रतिनिधी;मंठा तालुक्यातील मुख्य रास्ता अरुंद असल्याने या रास्त्यांवर नेहमी वाहतुकांची कोंडी होत आहे.अरुंद रासत्यांवरच दुभाजग,अवैध अतिक्रमण धारकामुळे व अवैध पार्किंग मुळे प्रवासीयांना हा मुख्य रास्ता त्रास दायक बनला आहे.तालुक्यातील लोकसंख्याही दिवसे दिवस वाढत आहे.या मुळे नेहमी या रस्त्यावर नागरिकांची गर्दी असते गावातील व खेडेगावातील आलेल्या नागरिक हे आपले दोन चाकी चार चाकी वाहन चाय हॉटेल,ज्यूस सेंटर,पान टपरी,व फल फ्रूट खरेदी साठी रासत्यावरच आपली वाहन उभी करात आहे. या मुळे नेहमी या रात्यांवर वाहतुकाची कोडी होते.व अपघात होण्याची भीति वाटत आहे. वाहतूकांची कोंडीला फुटपाथवरील अतिक्रमणही कारणीभूत आहे.अतिक्रमण हटविल्यास पादचार्यांना चालण्यास हक्काचा मार्ग मिळेल या मार्गावर शासकीय कार्यलय,राष्ट्रियकृत  बँकांच्या शाखा व्यापारी प्रतिष्ठाने ,कनिष्ट महाविद्यलय व जिल्हा परिषद शाळा आहे.या मार्गावर  लहान शाळकरी विद्यार्थी चालतांना घाबरतात.या मुळे पालकांना अपघतांची चिंता वाढली आहे.ही जीवघेणी समस्या सोडवीणार कधी असा प्रश्ण मंठा वासियांना पडला आहे.