मंठा प्रतिनिधी;मोसीन कुरेशी,बदनापुर येथील पत्रकार अकरम खाँ पठाण यांच्यावर गाव पाथडीवर लोखंडी पाईप, लाठी काठीने, हत्याराणे प्राणघातक हल्ला केला या हल्ल्याचा निषेधार्थ मंठा तालुकातील मराठी पत्रकारसंघाच्या वतेने तहसिल कार्यालय येथे नायब तहसीलदार राखे साहेब,यांचा उपस्थित पेशकार पी.व्ही. दवणे यांना दि.17 मार्च 2018 शनिवार रोजी दुपारी 1वाजता निवेदन देण्यात आले. निवेदनात म्हटले आहे की पत्रकार अकरम खाँ पाठाण यांच्यावर हल्ला करणारे आरोपीवर पत्रकार सरक्षण कायदा अंतर्गत लवकरात लवकर गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी या निवेदन दवारे करण्यात आली आहे या प्रसंगी निवेदन देताना मंठा पत्रकार संघाचेध्यक्ष नागेश कुलकर्णी, संतोष दायमा, रंजीत बोराडे, हाफेज शबाब बागवान,मोसीन कुरेशी,अतुल खरात, टी.जी.मुळे, कृष्णाजी भावसार,अनिल बा खंदारे, आदी उपस्थित होते.
No comments:
Post a Comment