मोसीन कुरेशी
मंठा प्रतिनिधी:परतुर तालुका वकिल संघाचे सचिव,आष्टीचे उपसरपंच अँड़ वसीम भाई जमींदार यांची महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या विधी विभागच्या प्रदेश सचिव पदी निवड करण्यात आली काँग्रेस पार्टी व संघटना मजबूत करण्यासाठी तसेच पक्षाची ध्येय धोरणे सर्व सामान्य पर्यंत पोहोचविण्यासाठी महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस विधि कक्ष महाराष्ट्र सचिव आणि राज्यविधी कक्ष विभागाच्या नुकत्याच नियुक्त्या करण्यात आल्या आहेत या मध्ये युवक काँग्रेसचे पदाधिकारी म्हणून भविष्यात आपल्यासमोर गंभीर आव्हाने आहेत असे काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे सोनिया गांधी राहुलजी गांधी यांनी दिलेल्या
नियुक्तीपत्रामध्ये म्हटले आहे की पक्षाचा वाढ आणि विस्तार आपल्या जिल्हा विधी कक्षाच्या माध्यमातून करण्यात यावा व आपण हे काम परिपूर्ण कराल ही आम्हाला खात्री आहे असे दिलेल्या नियुक्ती पत्रात म्हटले आहे.या निवडी बदल काँग्रेस जिल्हाध्यक्ष राजे भाऊ देशमुख मा आ सुरेशकुमार जेथलिया अन्वर देशमुख संतोष दिंडे बाबासाहेब गाडगे इंद्रजित घनवट शकेर मापेगांवकर मंजुळदास सोळंके आदी एजाज जमीनदार वकील संघ परतूर सर्वांनी अभिनंदन पर शुभेच्छा दिले