Friday, 12 July 2019

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ मंठा च्या वतीने भाविक भक्तांना उपवासाच्या फराळाचे वाटप

मोसीन कुरेशी
मंठा प्रतिनिधी :  मंठा येथे महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या वतीने आषाढी एकादशीनिमित्त ता 12 रोजी उपवासाचे फराळ साबुदाणा खिचडी आणि केळीचे वाटप करण्यात आले यावेळी पंढरपूर येथे पांडुरंगाच्या दर्शनासाठी जाणाऱ्या  भाविक भक्तांनी प्रसादाचा लाभ घेतला पत्रकार संघाच्या वतीने दरवर्षी विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन केले जाते याप्रसंगी  माजी उपनगराध्यक्ष बालासाहेब बोराडे, शिवसेना शहर प्रमुख प्रल्हादराव बोराडे, बाजार समितीचे संचालक वैजनाथ बोराडे, पत्रकार संघाचे अध्यक्ष संतोष दायमा, जिल्हा कार्यकारिणी सदस्य पंडितराव बोराडे, ज्येष्ठ पत्रकार बाबासाहेब कुलकर्णी ,जिल्हा कार्यकारिणी सदस्य तुकाराम मुळे, बालाजी कुलकर्णी ,रमेश देशपांडे डॉ आशिष तिवारी, अनिल बा खंदारे, आसाराम शेळके , मोसीन कुरेशी ,प्रवीण दीक्षित ,सदाशिव घोरपडे ,किरण अवचार, सय्यद रफिक ,भगवान कुरधने  ,अर्जुन खरात ,अशोक नरवडे, विश्वनाथ वाघमारे, परमेश्वर हिरे, कृष्णा शेंडगे, आकाश घोरपडे यांच्यासह पत्रकार बांधव व
ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते

Monday, 8 July 2019

उभ्या असलेल्या टिप्पर धडकून तिघांचा मृत्यू...

मोसीन कुरेशी,
मंठा प्रतिनिधी:- मंठा शहरापासून उत्तरेस असलेल्या अगदी हाकेच्या अंतरावर तळणी रोड वरील जगदंबा हॉटेल समोर उभ्या असलेल्या टिप्पर क्रमांक(MH.04DK.6757) ला पाठीमागून एकापाठोपाठ एक अशा दोन मोटारसायकल ने धडक दिल्यामुळे या मध्ये मंठा येथील बॅटरी मेकॅनिक रशीद अबास पठाण याव्यतिरिक्त अनिल विक्रम राठोड मिराबाई विक्रम राठोड रा. हिवरखेडा यांच्याही मोटरसायकल धडक दिल्यामुळे दोघांचा जागीच मृत्यू झाला. इमरान सिकंदर पठाण यांच्या फिर्यादीवरून सदर वाहन चालकावर गुन्हा दाखल झाला असून मंठा पोलिस निरीक्षक यांच्या आदेशावरून अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक रमेश चव्हाण यांच्याकडे सोपवण्यात आला.