Thursday, 23 May 2019

पुन्हा एकदा मोदी सरकारच्या यशाचा मंठ्यात जल्लोष......!!

मोसीन कुरेशी,
मंठा प्रतिनिधी: फिर एक बार मोदी सरकार म्हणत पुन्हा एकदा एकहाती सत्ता मिळवत भाजप आणि मित्रपक्षाचे सरकार केंद्रात स्थापन होणार असून प्रचंड बहुमतासह निवडून आलेल्या सर्व उमेदवारांचे यावेळी भाजप, शिवसेना व मित्रपक्षाच्या कार्यकर्त्यांनी फटाके फोडून जल्लोष साजरा केला.
मोदी सरकारने उत्तम कामगिरी केली होतीच, विरोधकांनी मोदींची प्रतिमा मालिन करण्याचा प्रयत्न केला परंतु जनते पुन्हा एकदा मोदींवर विश्वास व्यक्त केल्याचं दिसून आलं. पालकमंत्री बबनराव लोणीकर यांच्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नांदेड लोकसभेचे प्रभारी म्हणून जबाबदारी दिली होती आणि ती जबाबदारी चोखपणे पार पाडत प्रताप पाटील चिखलीकर यांचा दणदणीत विजय झाला. म्हणूनच यावेळी कार्यकर्त्यांमध्ये देशभरात, राज्यात मिळालेल्या यशाबरोबरच नांदेड आणि परभणी लोकसभेच्या विजयाबद्दल जल्लोष साजरा केला.यावेळी भाजप तालुकाध्यक्ष गणेशराव खवणे, उपसभापती राजेश मोरे, कैलास बोराडे, पंजाब बोराडे, नगराध्यक्ष नितीन राठोड, मा. सभापती संतोष वरकड, सतीश निर्वंळ, बाळासाहेब बोराडे,  अशोक वायाळ, संजय गायकवाड, अनिल खंदारे, एजाज भाई, राधाकिसन बोराडे, नारायण दवणे, जिजाभाऊ झोल, विलास घोडके, माऊली वायाळ, रावसाहेब बाहेकर, प्रकाश मूळे, सखाराम बोराडे, प्रसादराव गडदे, प्रा. सहदेव मोरे पाटील, माऊली गोंडगे, दिनेश सराफ, परमेश्वर शिंदे, विजय चव्हाण, बाळासाहेब तौर, सुभाष बागल, राजू नरवडे, रावसाहेब खरात, चेतन विधाते, पांडुरंग चव्हाळ, राजेश कऱ्हाळे, रामा दहातोंडे, रमेश राठोड, दिनेश राठोड, विनायक चव्हाळ, दिलीप हिवाळे, अरुण खवणे, पिंटू मोरे, श्याम काकडे, गणेश बोराडे, कैलास चव्हाण, विठ्ठल गोंडगे, नायबराव गोंडगे, पांडुरंग शेंडगे, आसाराम काकडे, कैलास खराबे, आकाश कासतोडे यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती.

Tuesday, 21 May 2019

डिगांबर बोराडे याची युवासेना तालुकाप्रमुख पदावरून हकालपट्टी करावी ( मंठा येथील पत्रकारांचे शिवसेना कार्यालयासमोर धरणे आंदोलन)

मोसीन कुरेशी
मंठा/ प्रतिनिधी :  सोशल मीडियावर पत्रकारांची बदनामी व मानहानी करणारी पोस्ट टाकल्या प्रकरणी युवा सेनेचे तालुकाप्रमुख डिगांबर बोराडे यांची युवा सेनेतुन हकालपट्टी करावी या मागणीसाठी मंठा तालुक्यातील पत्रकारांनी शिवसेना मध्यवर्ती कार्यालयासमोर धरणे आंदोलन करून शिवसेना जिल्हाप्रमुख ए जे पाटील बोराडे यांना निवेदन दिले. यावेळी अंकुशराव अवचार , उपतालुकाप्रमुख माऊली सरकटे यांची उपस्थिती होती शिवसेना ही सामाजिक कार्य करणारी संघटना असली तरी मंठा तालुक्यात मात्र डिगांबर बोराडे सारख्या गुंड प्रवृत्तीचे व्यक्‍तींना या पक्षात थारा दिला जातो, सामाजिक भावनेतून लिखाण करणाऱ्या पत्रकारांबद्दल सोशल मीडिया सारखे फेसबुकवरून गलिच्छ शब्दांचा वापर करणे ही बाब शिवसेनेसाठी अशोभनीय आहे पत्रकार हा लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ असून सर्व पत्रकारांना उद्देशून अशा प्रकारची गलिच्छ पोस्ट टाकने ही दुर्दैवी घटना आहे. डिगांबर  बोराडे याने टाकलेल्या पत्रकारांबद्दल च्या पोस्टमुळे तालुक्यासह जिल्हाभरातील पत्रकार बांधव  निषेध व्यक्‍त करीत आहेत त्याची युवा सेना तालुका प्रमुख पदावरून तात्काळ हकालपट्टी करावी अशी मागणी पत्रकार बांधवांच्या वतीने शिवसेना जिल्हाप्रमुख बोराडे यांच्याकडे करण्यात आली यासंदर्भात त्यांनी आपला अहवाल युवा सेना जिल्हाप्रमुख यांच्यामार्फत शिवसेना भवनात पाठविण्यात येईल असे सांगितले. यावेळी संतोष दायमा,नागेश कुलकर्णी, पांडुरंग खराबे, पंडितराव बोराडे, बाबासाहेब कुलकर्णी, बाबूजी तिवारी, दिनेश जोशी,प्रदीप देशमुख, कृष्णा भावसार,तुकाराम मुळे ,रणजीत बोराडे, डाॅ. अशिष तिवारी, बालाजी कुलकर्णी, विजयकुमार देशमुख, हाफेज शबाब बागवान ,रमेश देशपांडे ,अनिल बा.खंदारे मोसिन कुरेशी ,अमोल राऊत, अतुल खरात, प्रवीण दीक्षित, आसाराम शेळके, अरुण राठोड, लखन जयस्वाल, रवी पाटील ,  कैलास पवार ,प्रदीप पाटील, केशव येऊल, रवी पाटील , प्रकाश भावसार यांची उपस्थिती होती..

Monday, 20 May 2019

पत्रकारांबद्दल सोशल मीडियावरून मानहानीकारक पोस्ट टाकल्या प्रकरणी डिगांबर दत्तात्रय बोराडे विरुद्ध गुन्हा दाखल                    

मोसीन कुरेशी,
मंठा /प्रतिनिधी : मंठा येथील युवा सेनेचे तालुकाप्रमुख डिगांबर बोराडे याने सोशल मीडियावर स्वतःच्या फेसबुक अकाऊंटवरून पत्रकारांची बदनामी करणारी पोस्ट टाकण्यावरून मंठा पोलिसांनी 294, 500, 504 कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे .याविषयी सविस्तर वृत्त असे की, येथील युवा सेनेचा पदाधिकारी डिगांबर बोराडे याने सोमवार ता  20 रोजी आपल्या फेसबुक अकाऊंटवरून पत्रकारांची बदनामी करून मानहानी व अब्रू नुकसान करणारी पोस्ट टाकल्यामुळे सर्व पत्रकारांच्या भावना दुखावल्या गेल्या त्यामुळे तालुक्यातील सर्व पत्रकार बांधवांनी एकत्र येत मंठा पोलीस स्टेशन गाठून डिगांबर बोराडे विरुद्ध फिर्याद दिली. या फिर्यादीवरून मंठा पोलिसांनी करम 294, 500 ,504  अन्वये गुन्हा दाखल केला आहे पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रदीप त्रिभुवन यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक नितीन गट्टूवार हे करीत आहेत त्यांना पोहेकॉ श्याम गायके ,रामचंद्र खलसे, सुभाष राठोड हे सहकार्य करीत आहेतयावेळी नागेश कुलकर्णी, संतोष दायमा, कृष्णा भावसार, प्रदीप देशमुख, बाबासाहेब कुलकर्णी, बाबूजी तिवारी, पांडुरंग खराबे ,रंजीत बोराडे, दिनेश जोशी, बालाजी कुलकर्णी, अनिल बा. खंदारे ,विजयकुमार देशमुख, पंडित बोराडे ,रमेश देशपांडे ,मोसिन कुरेशी, प्रवीण दीक्षित,  शबाब बागवान ,तुकाराम मुळे अमोल राऊत अरुण राठोड लखन जैस्वाल, मोसिन कुरेशी अतुल खरात किरण अवचार आसाराम शेळके यांचे सर्व पत्रकार बांधव उपस्थित होते..

Tuesday, 14 May 2019

मंठ्यात शंभूराजे जमोत्सव सोहळ्या निमित्त विविध आयोजन...

मोसीन कुरेशी,
मंठा प्रतिनिधी  : मंठा येथे छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्ताने [ता.१४ मे] मंगळवार रोजी संभाजी बिग्रेडच्यावतिने आयोजित शंभूराजे जमोत्सव सोहळ्यात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.जयंती निमित्ताने सांयकाळी ५ वाजता शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकातुन मुख्य रस्त्यावरून छत्रपती संभाजी महाराज चौकापर्यंत वाद्यांच्या गजरात भव्य रथयात्रा काढण्यात येणार आहे.तसेच विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.या जमोत्सव सोहळ्यास शिव-शंभु प्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन संभाजी बिग्रेडच्या वतिने करण्यात येत आहे...