मंठा प्रतिनिधी:मंठा येथे बँक ऑफ महाराष्ट्र शाखेत चोरट्यांनी चोरीचा पर्यत्न केल्याने खळबळ उडाली आहे. मंठा येथे जालना महामार्ग मुख्य रस्त्यावरील बँक ऑफ महाराष्ट्र शाखा आहे दी. 31मार्च शनिवारी रात्री 2:15 च्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी बँकच्या मेन गेटचे शटर वाकडे करुन,चँनल गेट मध्ये मोठा दगड टाकून चोरी करण्याच्या पर्यत्न केला होता.व बँके मध्ये लावलेले सीसीटीव्ही कँमेऱ्याची दिशा वर्ती केल्याचे निदर्शनास आले बँकेतील इतर कोठल्याही प्रकारचे नुकसान झाले. नसल्याची फिर्याद बँक मैनेजर प्रमोद सोपानराव सदाफुले यांनी मंठा पोलिस ठाण्यात दिली आहे.पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहिती नुसार बँक मैनेजर हे आपल्या घरी असतांना बँक मध्ये दप्तरी करणारे तुकाराम जाधव यांनी सकाळी 8:30 वाजता मैनेजर साहेबाला फोन लावुन सांगितला की आपली बँक उघडी दिसत आहे.आपन बँकेत काम करत आहे का मैनेजर यांनी सांगितले मी घरी आहे त्यानंतर मैनेजर घरातून पायी बँकेत आले असता मेन गेटचे शटर वाकडे करुन,चँनल गेट मध्ये मोठा दगड टाकून चोरी करण्याच्या पर्यत्न केला असल्याचे बँके मैनेजर प्रमोद सोपानराव सदाफुले यांना कडतच त्यांनी मंठा पोलीस ठाण्यात माहिती दिली या प्रमाणे मंठा येथील पोलिस निरीक्षक त्रिभवन साहेब व पी.एस.आई.चव्हाण साहेब यांनी बँकेत तपास केले असता बँके मध्ये लावलेले सीसीटीव्ही कँमेऱ्याची दिशा वर्ती केल्याचे व निदर्शनास आले बँकेतील इतर कोठल्याही प्रकारचे नुकसान झाले नसल्याचे निदर्शनास आले.बँके मैनेजर प्रमोद सोपानराव सदाफुले यांच्या फिर्यादि वरुण मंठा येथे अज्ञात चोरट्यां विरुद्ध मंठा पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.पुढिल तापस केशव चव्हाण हे करत आहे.
200
Followers
Sunday, 31 March 2019
मंठा येथे बँक ऑफ महाराष्ट्र शाखेत चोरीचा पर्यत्न..

Saturday, 23 March 2019
छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्व जाती-धर्माच्या लोकांना सोबत घेऊन स्वराज्याची स्थापना केली...... जिल्हाप्रमुख ए जे बोराडे ------
मंठा प्रतिनिधी : छत्रपती शिवाजी महाराज हे शूरवीर आणि पराक्रमी होतेच त्यांनी सर्व जाती-धर्माच्या लोकांना सोबत घेऊन स्वराज्याची स्थापना केली खऱ्या अर्थाने ते रयतेचे राजे होते असे प्रतिपादन शिवसेना जिल्हाप्रमुख ए जे बोराडे यांनी केले. मंठा येथील शिवसेना मध्यवर्ती कार्यालयात छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली शिवसेना जिल्हाप्रमुख श्री बोराडे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन केले. यावेळी अंकुशराव अवचार माजी सभापती तथा शहरप्रमुख प्रल्हादराव बोराडे, माजी सभापती संतोष वरकड, तालुकाप्रमुख अजय अवचार, सुरेश सरोदे, पंचायत समिती सदस्य बाबा राठोड, तुळशीराम कोहीरे, उपशहर प्रमुख गजानन बोराडे, उदयसिंह बोराडे, दिनेश चव्हाण, अनिल घुले, कृष्णा खरात, विजय तनपुरे, रवी खजुरे, बाळासाहेब भोसले, दीपक बोराडे, सरपंच महादेव खरात ,किरण बोराडे यांच्यासह शिवसैनिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. पुढे बोलतांना जिल्हाप्रमुख श्री बोराडे यांनी सांगितले की, छत्रपती शिवाजी महाराजांनी जातीपातींमध्ये कधी भेदभाव केला नाही मुस्लिम समाजाचे मावळेही त्यांच्यासोबत होते, शूरवीर आणि पराक्रमी राजे म्हणून ते जगभरात प्रसिद्ध झाले असे त्यांनी सांगितले या वेळी छत्रपती शिवाजी महाराज की जय अशा गगनभेदी घोषणा देण्यात आल्या
Friday, 22 March 2019
मंठा-वाटुर रोड वर भीषण अपघात 1 ठार दोन जख्मी..
मोसीन कुरेशी,
मंठा प्रतिनिधी:मंठा वाटुर रस्त्यावरील शीळ फार्म येथे महेंद्रा पिकअप याने दोचाकी सवार यांना धड़क दिल्याने भीषण अपघात होऊन 1 जणांचा मृत्यु झाला तर दोन जण गंभीर जख्मी झाले आहे.सविस्तार माहिती अशी की कृष्णा रोहिदास पवार,सुनील सुभाष आळे,गणेश रमेश राठोड़ सर्व रा. भो.दहिफल हे मंठा येथे आठवाडी बाजार करुण गावा कडे दोचाकीने जात होते दरम्यान मागून महेंद्रा पिकअप जीप क्र Mh 28 A.B.4173 भरधाव जालना देशने जात असतांना दोचाकीला धळक.दिली यावेळी कृष्णा रोहिदास पवार युवकाचा जागीच मृत्यु झाला व दोन जन जख्मी झाले तर जखमींना जालना येथे उपचारार्थ घाटी रुग्णालयात हलविण्यात आले.महेंद्रा पिकअप चालक गाड़ी घेहुन फरार झाला.काही युवकांनी त्या गाड़ीचा पाठलाग करुण गाड़ीचा नंबर पोलिसांना दिला.अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.प्रकाश रामकिशन राठोड़ यांच्या फिर्यादीने मंठा पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
Saturday, 9 March 2019
ना. लोणीकरांनी मंठा बसस्थानकाच्या नवीन इमारत मंजुरीचे श्रेय लाटू नये----- जिल्हाप्रमुख ए जे बोराडे ... मंठा
प्रतिनिधी : मंठा बसस्थानकाच्या नवीन इमारत बांधकामासाठी राज्याचे परिवहन मंत्री ना.दिवाकर रावते यांच्याकडे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख म्हणून मागील सहा महिन्यांपासून पाठपुरावा केल्यामुळे बसस्थानकाच्या नवीन अद्यावत इमारतीसाठी निधी मंजूर झाला या कामात ना. बबनराव लोणीकर राजकारण करीत असून त्यांनी श्रेय लाटण्याचा प्रयत्न करू नये असा इशारा शिवसेना जिल्हाप्रमुख ए जे बोराडे यांनी दिला.ना. लोणीकर यांनी आचारसंहितेचे कारण पुढे करीत अत्यंत घाईघाईने नवीन बसस्थानकाच्या इमारतीचे भूमिपूजन उरकून घेतले या निमित्ताने त्यांनी महामंडळाच्या कार्यक्रमातच भाजपचा कार्यकर्ता मेळावा घेतला अशी घणाघाती टीका जिल्हाप्रमुख श्री बोराडे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात केली आहे. ना. दिवाकर रावते शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आहेत तसेच राज्याचे परिवहनमंत्री म्हणून मंठा बसस्थानकाचा प्रश्न मार्गी लावावा अशी मागणी तालुक्यातील जनतेतून होत होती .यासंदर्भात ना. रावते यांचेकडे मागील सहा महिन्यांपासून जिल्हाप्रमुख म्हणून आपण सातत्याने पाठपुरावा केला यासाठी वेळोवेळी मंत्रालयात बैठका झाल्या या बैठकांमधून ना. रावते यांनी या नवीन इमारतीच्या बांधकामासाठी मंजुरी सह निधी उपलब्ध करून देण्याचे मान्य केले .या कामासाठी तीन कोटी 31 लक्ष रुपये निधी मंजूर झाला . फक्त शिवसेनेमुळेच मंठा बसस्थानकासाठी निधी मिळाला मात्र ना. लोणीकर यांनी जनतेची दिशाभूल करून घाईघाईने भूमिपूजनाचा कार्यक्रम उरकून घेतला भविष्यात त्यांनी राजकारण करताना शिवसेनेमुळे मंजूर झालेल्या विकास कामाचे श्रेय लाटण्याचा प्रयत्न करू नये आणि विकास कामात राजकारण आणू नये असे प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात शेवटी म्हटले आहे.
Thursday, 7 March 2019
पत्रकारांचा आर्थिक स्तर उंचावण्यासाठी प्रयत्न करणार ---जिल्हाध्यक्ष दिगंबर गुजर (पत्रकारांना हक्काची घरे मिळावीत यासाठी चळवळीच्या माध्यमातून अग्रेसर भूमिका ........ॲड मधुकरराव मोरे.मंठा)
किरण अवचार , कैलास पवार, गौतम सदावर्ते, प्रवीण दीक्षित, आसाराम शेळके आदी पत्रकार बांधव उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनिल बा. खंदारे यांनी केले तर सरचिटणीस मोसिन कुरेशी यांनी आभार मानले